मायबोलीकरांचे ग्रंथालय

Submitted by हर्ट on 29 March, 2010 - 03:18

देणार्‍याचे देत जावे, घेणार्‍याने घेत जावे; घेता घेता घेणार्‍याने, देणार्‍याचे हात घ्यावे -- असे तुमचे-आमचे विंदा असे म्हणालेत. जगभराच्या कानाकोपर्‍यात वसलेल्या मायबोलीकरांनी आपली पुस्तके एकमेकांसोबत वाटून घ्यावीत असे इथे कित्येक वाचकांना वाटत असेल. इथे तुम्ही तुमच्याकडील पुस्तकाची यादी करा. तुम्ही कुठल्या गावात-शहरात-देशात राहतात ते लिहा. पत्ता लिहू नका. फोन न. लिहू नका. फक्त यादी लिहा. म्हणजे पुस्तके देता-घेता येतील आणि त्यातून नवीन मित्रही जमतील. ही कल्पना मीनूने सुचवली आहे. मी फक्त अमलात आणत आहे. हे जर तुम्ही करू शकलात, वेळ असल्यास, तर तेच तुमचे विंदांना मी देणे म्हणेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! बी धन्यवाद. आधी हा उपक्रम कसा राबवता येईल याची चर्चा करावी लागेल ना? मग आपण पुस्तक याद्या देऊ यात.

माझ्याकडच्या पुस्तकांची यादी मी कधी केली नाहीये आता करेन. Happy

https://www.billmonk.com
ह्या संकेतस्थळावर तुम्ही आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची वर्गवार यादी करु शकता. मग समजा ते पुस्तक जर तुमच्याकडून दुसरा कुणी घेउन गेला तर चेक्ड आउट असे स्टेटस लावू शकता. त्यामुळे ज्याने पुस्तक नेलेले आहे त्याच्याही लक्षात राहते आणि तुमच्याकडेही तुमची पुस्तके कुणाकुणाकडे आहेत ह्याची नोंद राहते. तुम्ही पुस्तक परत हवे असल्यास आठवण-पत्रदेखील पाठवू शकता. फक्त सर्व सदस्य ह्या संकेतस्थळावर सभासद असावे लागतील.

मी व माझे मित्र हे संकेस्थळ अतिशय नियमितपणे वापरतो, पण ते पार्ट्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी.. Happy

मी इन्टरेस्टेड आहे. सुरुवातीला पुण्यामधे तरी करुन पहायला हरकत नाही. टण्या मी लिंक चेक करते रे. धन्यवाद.

मित्रानो मी पण असाच एक पुस्तक प्रेमी आहे. तुमची आयडीया खुपच चान्गली आहे. तुमची हरकत नसेल तर मी पण एक लिस्ट देउ शकतो.

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सगळ्यानी नुसती तारीफच केलीय यादी कशी दिली नाही.?
मी कोल्हापुरात राहतो.माझ्या कडे खालील पुस्तके आहेत-
१) वटवट वटवट- पु.लं.
२) खोगीरभरती.- पु.लं
३) मीना प्राभुंची सर्व पुस्तके- माझं लंडन, मेक्सिकोपर्व, दक्षीण रंग, इजिप्तायन, ग्रीकांजली, तुर्कनामा,चिनी माती, गाथा ईराणी, रोमराज्य १&२,
४) एक होता कार्व्हर- वीणा गावाणकर
५) एका रानवेड्याची शोधयात्रा- क्रुष्ण्मेघ कुंटे
६) सखा नागझिरा
७) किमयागार- अच्युत गोडबोले
८) प्रुथ्वीवर माणुस उपराच!

यादी कशी दिली नाही.?>>> यादी इथंच द्यायच्ये का? बी / मीनू ?

कुलू ते खालच वाक्य वर टाकाल का? की तेही पुस्तकाचच नाव आहे? Wink

मी सुद्धा ह्या उपक्रमात भाग घेण्यासाठी इच्छूक आहे. विभागवार लोकांकडून ह्या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळेल.

एक होता कार्व्हर : वीणा गवाणकर

ऑनलाइन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

पृष्ठक्रमांक : १-११८
एक होता कार्व्हर:1

पृष्ठक्रमांक : ११९-२०७
एक होता कार्व्हर:2

पृष्ठक्रमांक : २०८-२२५
एक होता कार्व्हर:3

चांगला उपक्रम. माझ्याकडे सुमारे १०००० जुनी, नवी, दुर्मिळ पुस्तके आहेत. वाचण्यासाठी कोणते पुस्तक हवे असल्यास नाव कळवावे. असल्यास वाचण्यासाठी पुण्यात उपलब्ध कधी करून देउ शकेन ते इमेलवर सांगू शकेन.
टण्या, लिंकबद्दल धन्स.

मस्तच! माझ्या आवडत्या १०त!

मला कोणीतरी पु.ल.च्या 'ती फुलराणी' तले भक्ती बर्वेंच्या 'स्वगत' चे स्क्रिप्ट द्या प्लीज! किंवा ऑनलाईन असेल तर लिंक द्या! यु ट्युब वरील नको ....माझ्या हपीसात बॅन आहे यु ट्युब!

अमित जी..
छान दुवा दिला...वाचुन काढला ..एक होता कार्व्हर...ग्रेट

मी उत्सुक आहे .पण माझ्याकडे पुस्तक फारशी नाहियेत. मला वाचायची पुष्कळ आवड आहे. मी दुसरी कुथलिही मदत कराय ला तयार आहे.

पुस्तकांचे आदानप्रदान हे आपल्या जवळपास राहणार्‍या मायबोलीकरांबरोबरच करता येईल. तेव्हा हे पान कारपुलिंग करणारे लोक जसे रजिस्टर करण्यासाठी/शोधण्यासाठी वापरतात, तसे वापरता येईल.
इच्छुकांनी आपले राहण्याचे ठिकाण आणि आपल्याकडे असलेल्या तसेच वाचायला आवडतील अशी वाङ्मयप्रकाराची नोंद करावी. म्हणजे एकमेकांशी संपर्क साधून देवाणघेवाण करता येईल. कुणाला एखादे पुस्तक उसने नव्हे तर कायमचे द्यायचे/हवे असल्यास तशी पण व्यवस्था होईल .

मी भरत मयेकर : बोरिवली मुंबई.
वाचायला आवडतात : मराठी कविता, self-help, diy books.
माझ्याकडे असलेली पुस्तके : वर दिल्याप्रमाणे + इंग्रजी रहस्यमय कादंबर्‍या (जेफ्री आर्चर, ली चाइल्ड इ.), हॅरी पॉटर.

माझ्याकडे खालील पुस्तके आहेत

श्रीमानयोगी

छावा

पानिपत.

युगन्धर

स्वामी

अग्निपन्ख.

नाझी भस्मासुराचा उदयास्त

महोत्सव:- व.पु.

रन्गपन्चमी :- व. पु.

वपुर्झा:- व. पु.

अर्थातः- अच्युत गोडबोले.

The magic of thinking big

Seven habits of highly effective people

Rich dad poor dad

The monk who sold his ferrari

India 2020

Wings of fire.

मी रहायला पुण्यात आहे. कोणाला वरिल पैकी पुस्तके वाचायला हवी असल्यास कळविणे.

माझ्याकडे असलेली पुस्तके:
why men don't listen and women can't read maps
New earth
Power of Now
Stillness speaks

अग्निपंख
मी पुण्यात राहते पिंपळे सौदागर येथे पुस्तके वाचावयाची असल्यास अव्श्य सांगा

why men don't listen and women can't read maps

हे तर चाळुन झाल आहे. काहि खास नाही वाटल.

बाकी ३ कोणाची आहेत ?

Stillness speaks नाव वाचल्यासारख वाटतय. कस आहे? आणि कशावर आहे ?

मी औन्ध ला सानेवाडी मधे रहायला आहे.