जलते है जिसके लिए

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 28 March, 2010 - 05:41

तिचं हसणं, तिच्या चेहर्‍यावर उमटणार्‍या सुरेख भावछटा, तिचं डोळ्यांतून चांदणं बरसणं....नूतन म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुमधुर काव्य होतं.

nutan.jpg

नूतनचे सर्वच चित्रपट एक से एक होते. पण तिचा ''सुजाता'' फार गाजला. मला विशेष लक्षात राहिला. चित्रपटाचा विषय हे त्यामागचं मूळ कारण असलं तरी नूतनचा त्या कृष्णधवल चित्रपटातील सर्वांगसुंदर अभिनय विशेष भावला. चित्रपटातील तिची देहबोलीच सारे काही सांगून जाते. तिच्या सुखात, दु:खात, स्वप्नांमध्ये आपण नकळत गुंतत जातो.

त्याच चित्रपटातील हे एक सदाबहार गाणं.......

जलते है जिसके लिए
तेरी आंखोंके दिये
ढूंढ लाया हूं वही गीत मैं तेरे लिए....

ह्या गाण्यातला एकेक शब्द भावनेने ओथंबलेला....त्या गाण्यातील नूतन आणि सुनील दत्तच्या मुद्राभिनयावर मी जाम फिदा झाले होते. दोघांचा तो उत्कट अभिनय, एकमेकांसाठीची ओढ, तळमळ, गाण्यातील ती आर्तता, तलतचा तो किंचित थरथरणारा आवाज.... सर्व काही हृदयास स्पर्शून गेलेले....अप्रतिम!

ते गाणे इथे पहावयास मिळेल :

http://www.youtube.com/watch?v=CnF-tO2WYBI

आणि आता अजून काही....

हेच गाणे एका मल्ल्याळम चित्रपटात नायिकेच्या मुखातून गाववून घ्यायचा मोह संगीतकाराला आवरला नाही. विद्यासागर ह्या संगीतकाराने पुन्हा एकदा हेच गाणे, संथ लयीत, गायत्री असोकन ह्या अत्यंत प्रतिभावान गायिकेकडून ''कैयोप्पू'' ह्या मामुटी व खुशबू सुंदर ह्यांचा अभिनय असलेल्या २००७ साली प्रदर्शित गाजलेल्या चित्रपटात मोठ्या खुबीने गुंफले आहे.

सध्या सुप्रीम कोर्टाच्या 'लिव्ह इन रिलेशनशिप' निकालामुळे चर्चेत आलेली हीच ती तमिळ अभिनेत्री खुशबू. तिला नूतनच्या नखाचीही सर येणे अवघड. पण तिच्या परीने तिने ह्या गाण्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. मामुटीचा पायर्‍यांवर बसलेला शॉट मला खूप आवडला.

आणि सर्वात खास गोष्ट ही की हे गाणे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मैत्रिणीने, गायत्रीने गायले आहे! त्यामुळे मी ते अनेकदा ऐकत असते. आज तुम्हीही ऐका/ पहा :

http://www.youtube.com/watch?v=wjMJrEubBXY

गायत्रीची स्वतःचीही वेबसाईट आहे. पुण्याच्या अलकाताई मारुलकरांकडे तिने काही वर्षे हिंदुस्थानी संगीताचे प्रशिक्षण घेतले व त्यानंतरही बंगळूर येथे तिचे पुढचे संगीत शिक्षण चालू आहे. अतिशय गुणी, प्रतिभासंपन्न अशी ही गायिका अनेक मल्ल्याळम, तमिळ, कानडी चित्रपटांत गायली तर आहेच, शिवाय येशूदासांबरोबर, शंकर महादेवन, हरीहरन, चित्रा अशा दिग्गजांबरोबरही गायलेली आहे व गात असते! तिच्या विषयी अधिक जाणून घ्या तिच्या संकेतस्थळावर, व तिच्या सुश्राव्य आवाजातील गाणीही ऐका :

http://www.gayatriasokan.info/

-- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

गुलमोहर: 

तलत ने गायलेल्या काही उत्कॄष्ट गाण्यांपैकी एक गाणं. त्याच्या आवाजाला असलेल्या मर्यादा ओळखून त्याकाळच्या संगीतकारांनी त्याला सुरेख गाणी दिली.
माझ्या माहितीप्रमाणे गझल युग सुरु करण्यात तलतचा मोठा वाटा होता.
नूतन आणि खुशबू यांची तुलना कोणत्याही निकषावर होऊच शकत नाही.
गायत्रीचा आवाज आज प्रथमच ऐकला.

अरे वा, गायत्रीचे गाणेही मस्त वाटतेय. मुख्य म्हणजे आवाजात एक खरे पणा आहे जो या गाण्याची जान आहे. धन्यवाद हे गाणे ऐकवल्याबद्दल. अन मुळ गाण्याबद्दल काय बोलणार... अतिशय तरल अन सच्चे गाणे आहे ते, त्यातली नुतन अन सुनिल दत्तही ! जुने चित्रपट किती सच्चे वाटायचे नाही ? हम्म्म्म गेले ते दिवस ....

छान आहे बर्का तुझ्या मैत्रिणीचा आवाज!
बॅकग्राऊंड म्युझिक नसल्यानं छान वाटतय गाणं!

वा!! आज सक्काळीच ऐकलं..गोड आहे गायत्री चा आवाज..कोइन्सिडेंटली काल रात्री आम्ही सुजाताचं हेच गाण डी वीडी वर पाहात होतो आणी तलतच्या मखमली आवाजाच्या जोडीला नूतन आणी सुनिल दत्त चा अभिनय... हरवून गेलो होतो नुसतं Happy