फक्त माझंच डोकं फिरलंय का?

Submitted by माने गुरुजी on 27 March, 2010 - 00:48

आत्ता थोडा वेळेपर्यत मला खात्री होती की मी ठीक होतो.

मराठी साहित्यसंमेलनात काय चाललंय म्हणून नेटवर शोध घेतला तर साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण सापडलं, मला कोण आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात अख्खं भाषण प्रिंट करून घेतलं. म्हटलं वाचूया मस्त बसून.
http://www.sahityasammelan2010.org/sites/default/files/pdf/D_B_Kulkarni_...

ते वाचून मी किंकर्तव्यमूढ किंवा दिग्मूढ किंवा नूसताच मूढ झालोय. हे काय आहे? भाषण आहे का नुसते टाकलेले शब्दांचे तुकडे? मलाच का कळत नाहीये? का मराठीचे जे काही झाले आहे त्याचा परिणाम सांसं च्या अध्यक्षांवरही होतो? का समिक्षक अध्यक्ष झाल्यामुळे असे होते? का नुसते मोठे फारसे प्रचारात नसलेले शब्द वापरले की चांगलं मराठी विद्वत्ताप्रचूर भाषण होतं? हे असलं ऐकायला विंदा नाहित हे चांगलच झालं का एका अर्थी? ज्या ज्ञानेश्वर माऊलींचा त्या भाषणात उल्लेख आहे, त्यांनी गीतेला संस्कृतातून सर्वसामान्य माणसाला कळेल अशा मराठी भाषेत आणलं. आणि हे सर्वसामान्य माणसाच्या मराठीला फक्त समिक्षकानाच कळेल अशा मराठीत का नेत आहेत?

त्याच भाषणातल्या काही गोष्टी त्या भाषणलेखकाला लागू पडतील. (पान ३१ शेवटचा परिच्छेद, बदलून)
त्यात थोडा बदल करतांना त्यांची क्षमासुद्धा मागावी वाटत नाही.

"काय सांगू तुम्हाला ! आजचा मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आपले प्रज्ञाबळ आणि प्रतिभाबळच विसरला आहे. नुसते अवघड शब्द, हळुहळुती भाषा आणि भळभळती भावना यातूनच व्याजसमिक्षक निर्माण होऊन अध्यक्ष होतात हे आपण लक्षात कधी घेणार?"

का वाचलं मी हे भाषण? का फक्त मलाच असं होतंय. माझंच डोक का फिरतंय?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुजी , तुमचे डोके पूर्न ठिकाणावर आहे. कोल्हटकरानी या सा. सं. चे विडम्बन म्हणून चोरांचे संमेलन लोहिले. आता 'वेड्यांचे सम्मेलन ' लोहिण्याची वेळ आहे. राजकारण्याना शिव्या देणारी ही मंडळी , राजकारण , लांगूलचालन, ढोंगीपणा, स्वार्थ, तत्वच्युती , नकलीपणा याबाबतीत राजकारण्यानी यांच्या पायाजवळ बसून धडे घ्यावेत अशी स्थिती. आणि यानी राजकारण्याना साहित्यसम्मेलनापासून दूर ठेवण्याच्या गोष्टी कराव्यात? खरे तर राजकारण्यानी यांच्या वार्‍यालाही फिरकू नये अशी स्थिती. यांच्या विषारी फूत्कारांमुळे राजकारणी मरतील.....

पूर्ण वाचलं कसंबसं आणी आता डोकं इतकं गरगरतय कि कॉम्प बंद करून वस्थ थोडा वेळ बसावसं वाटतय.. शी!! फालतूपणाचा कळस आहे नुसता!!! Sad

आयला? येवढ कठीण आहे का समजायला?
थाम्बा! आता वाचूनच बघतो! Proud
पण मला एक कळत नाही, भाषण ही ऐकायची गोष्ट आहे ना? वाचतात कै बै? शी मेल! Biggrin

रोज एक पान याप्रमाणे रडतखडत वाचते आहे. (मुद्दाम साजिर्‍याकडून मागुन घेतल्याने न वाचणे शोभत नाही) Sad
त्यानंतर त्यावर भेळ करावी की कसे या विचारात आहे. Proud

प्रमुख पाहुण्याने त्याच्याच क्षेत्रातल्या केलेल्या कामाचा भाग म्हणून अग्निपथच्या ओळी (त्याही दुसर्‍याच भाषेत) म्हटल्या तर टाळ्यांचा कडकडाट. आणि अध्यक्षांनी हजारो वर्षे ज्या क्षेत्रात काम केले, ती समीक्षकी (मराठीच) भाषा-शब्द असलेल्या ओळी तुम्हाला खुपतात? शेवटी या ओळींपेक्षा अग्निपथच्या ओळी भारी ठराव्यात ना! च्च.. च्च.. बहुत नाइंसाफी हय ये!! Proud

इथल्या अनेक तज्ज्ञ व बहुवाचकांना हे भाषण आवडले नाही हे वाचून खेद झाला. मान्य आहे की सुरुवातीला ज्ञानेश्वरीवर थोडेसे पाल्हाळ आहे. पण पुढे पुढे समिक्षेची परिभाषा, तिची मराठी सारस्वतात व समाजात झालेली उपेक्षा, परिभाषेचे महत्व, कविता प्रकाराची अनुभूती व रसग्रहण, त्यासाठी आवष्यक असलेली प्रतिभा व तिचे गुणवैशिष्ट्य, साहित्य निर्मितीची अंतःप्रेरणा व त्या प्रेरणेचे वर्गीकरण, मूल्यगर्भ साहित्य, अशा सहित्याची व्यवच्छेदक लक्षणे, साहित्याची भाषा, बोलीभाषा, तिचे महत्व, तिची प्रगती, मराठीचे महाराष्ट्राबाहेरील अध्यापक/तज्ज्ञ, त्यांचे महत्व अश्या अनेकविध विषयांवर सुरेख विवेचन ह्या भाषणात आहे.

पूर्वग्रहदूषित दृष्टीने न बघता हे भाषण जरूर वाचा.

(मी देखील सुरुवातीला जेव्हा अर्धवट/तुकड्या तुकड्यात हे भाषण ऐकले/वाचले तेव्हा वाटले काय म्हातार्‍याचे डोके फिरले आहे. पण एक अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाला माझ्या अज्ञानामुळे/अपूर्ण माहितीमुळे नावे ठेवल्याबद्दल आता वाईट वाटत आहे.)

ओके. चुकलं. सॉरी.
प्रयत्न करेन पुन्हा एकदा समजून घ्यायचा पण तरी आवडलं नाही तर मात्र मी मारुन मुटकुन चांगलं आहे असं म्हणणार नाही. तूर्तास मात्र माने गुरुजींशी सहमत.

हो पण टण्या हे सगळे विद्वज्जडच असावे का? आणि ते भाषण म्हणून ऐकवावे का? तुम्ही विद्वत्ता प्रचुर ग्रंथ लिहा ना. समजणारेच वाचतील . ज्ञानेश्वर तुकारामानी सामान्यांच्या भाषेत ज्ञान आनले हा गाढवपणाच केला म्हणायचे... बरोबर आहे पॉप्युलर ते ते टाकाऊ आणि निकस असा गंड असल्यावर हेच होणार!

या साहित्य संमेलनाचे खर्चाचे आकडे दरवर्षी वाढतच आहेत. सरकारी अनुदानासाठी मंत्रालयात जाऊन अजीजी करून चेक पदरात पाडून घेतल्यावर संमेलनात राजकिय नेते मिरवणार हे तर ओघानेच आले. अध्यक्ष निवडीचा तोच तो घोळ, तीच ती रटाळ अध्यक्षीय भाषणे, तेच ते परिसंवाद यावर कोट्यावधी रुपये खर्चायची खरेच गरज आहे का ? एम ए (मराठी) च्या वर्गात करायचे भाषण हजारो लोकांच्या संमेलनात कसे चालेल? पुर्वी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष दीड दिवसाचा गणपती असे गमतीने म्हणत असत. आजकाल सिनेस्टार, राष्ट्रपती हे संमेलानाला येउ लागल्याने तेही वलय राहिले नाही.

टण्या,
माफ करा पण तुमचे म्हणणे अजिबात पटले नाही. मी स्वतः इथे लिहण्याअगोदर १० वेळा विचार केला, पुन्हा पुन्हा ते वाचायचा प्रयत्न केला. आपण दभींवर अन्याय करतो आहोत का असेही वाटून गेले होते, पण १ मिनिटच.

१. त्यांनी स्वतः ज्ञानेश्वरांना गुरु मानले आहे. अणि ज्ञानेश्वरांनी कसे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहले याचेही कौतुक केले आहे. पण स्वतः मात्र अवघड भाषेत सांगत आहेत. उलट समिक्षक का आवश्यक असतो, समिक्षेची भाषा कशी असते हे सोप्या शब्दांत सांगण्याची एक चांगली संधी त्यांनी दवडली.
२. भाषणात भरपूर तुकडे आहेत. एका भागाचा मूळ शिर्षकाशी /इतर भागांशी कधी संबंध लागतो कधी नाही. सुरुवातीला आणि मधेच स्वतः विषयी उल्लेख आहेत त्याचा विषयाशी काही संबंध नाही.

३. संदर्भ आणि भाषा खूप अभ्यासपूर्ण आहेत. पण जर ते लोकांना पोहोचेल अशा भाषेत नसेल तर माझ्या मते त्याचे फारसे मूल्य नाही. साहित्यसंमेलनाचे भाषण ही साहित्यनिर्मिती नाही. (तेच हवे असेल तर एखादा ग्रंथ लिहावा किंवा कविता संग्रह काढावा. तो सगळ्यांना समजलाच पाहिजे अशी अपेक्षा नसते).
साहित्यसंमेलनाचे भाषण हा एक संवाद आहे. आणि तो जर एकाच बाजूने होत असेल तर त्याचे मूल्य शून्य आहे. हे भाषण सूक्ष्मात जाऊन करण्याचे नाही.
भाषण किंवा संवाद हा अवघड किंवा विद्वत्तापूर्ण लेखनामुळे मोठा होत नसतो, तर एका बाजूचे दुसर्‍या बाजूला किती पोहोचले यावर मोठा होत असतो.

माझे टण्याला अनुमोदन आहे! Happy
माझे मत मोड ऑनः
ज्यान्ना या "महाजनान्च्या विद्वत्ताप्रचुर जड" भाषा समजत नाहीत ते तसेही सरळ तमाशालाच जाऊन बस्तात ना? त्यान्नी साहित्यसम्मेलनाला येऊच नये की! Proud कशाला उगाच डोक्याला खुराक करुन घ्यावा?

उगाच नाही दादा कोन्डकेन्च्या द्वैअर्थी विनोदान्नी तब्बल एक दशक "सामान्य जनतेस भुरळ पाडली", बहुधा माने गुरुजीन्ना, दभीन्नी त्या तस्ल्या द्व्यर्थी भाषेत साहित्य सम्मेलनाचे भाषण करणे अपेक्षित असेल! ज्ञानेश्वरादि सन्तान्ची उदाहरणे उगा आपली तोन्डी लावण्यापुरती, कारण ज्ञानेश्वरीतील मराठी भाषा देखिल समजु न शकणारे आमच्या सारखे गणन्ग इथेच आहेत Wink
असो
माझे मत मोड ऑफः

विसु: घातलेली भर्/बदल ठळक करुन दाखविला आहे

>>>>>>>>>
ज्यान्ना या "महाजनान्च्या विद्वत्ताप्रचुर जड" भाषा समजत नाहीत ते तसेही सरळ तमाशालाच जाऊन बस्तात ना? त्यान्नी साहित्यसम्मेलनाला येऊच नये की! फिदीफिदी कशाला उगाच डोक्याला खुराक करुन घ्यावा?
>>>>>>>>>>>>>>>
उगाच नाही दादा कोन्डकेन्च्या द्वैअर्थी विनोदान्नी तब्बल एक दशक "सामान्य जनतेस भुरळ पाडली", बहुधा माने गुरुजीन्ना, दभीन्नी त्या तस्ल्या द्व्यर्थी भाषेत साहित्य सम्मेलनाचे भाषण करणे अपेक्षित असेल! >>>>>>>>>

मानेगुरुजी ह्या आयडीने वरती संयत स्वरुपात स्वतःची मते व विचार नीट मांडलेले आहेत. तसेच ते इतरही अनेकांनी मांडलेले आहेत. ह्यावर वरची लिंबूटिंबू ह्यांची प्रतिक्रिया ही मुद्दामून विषय भरकटवण्यासाठी व चर्चेचे भांडणात परिवर्तन करण्यासाठी आलेली सरळ सरळ दिसत आहे. कृपया ह्या पोस्टचा समूळ अनुल्लेख करावा म्हणजे चर्चा भरकटणार नाही.

टण्या, जरुर अनुल्लेख कर, (दुसर तरी काय करणार म्हणा? ) Happy

पण "फक्त माझंच डोकं फिरलंय का?" या, तुझ्या दृष्टीने "संयत" लेखाच्या शीर्षकप्रश्नाला जर "नाही" अस उत्तर द्यायच तर प्रश्नातला गर्भितार्थ म्हणजे यान्ची डोकी फिरली नाहीत तर नक्कीच भाषण करणार्‍या साहित्यसम्मेलनाध्यक्षाचे फिरले होते हाच होतो! निदान मराठीत तरी!

अन जर त्याच प्रश्नाला "हो" अस उत्तर द्यायच ठरवल, तर बघा, हा लिम्ब्या (वा अन्य कोणीही) "लोकान्ची डोकी फिरलीहेत" अस बोम्बलत फिरतो असा कान्गावा शक्य!

म्हण्जे इकडे आड तिकडे विहीर! सहनही होत नाही अन सान्गताही येत नाही अशी परिस्थिती! Proud

ज्याला तू "संयत स्वरुप" म्हणतो हेस, त्या बाकी पोस्टचे जाऊदे, शीर्षकाचेच स्वरुप हे वर लिहील्याप्रमाणेच मला तरी भासते! तुम्हा बहुसन्ख्य "अनुल्लेखसम्राटान्चे" माहित नाही! Happy

पटकन वाचायचा प्रयत्न केला पण लक्षात आले की जड मामला आहे, वेळ ठेवून वाचावे लागेल Happy पण निदान एवढे जाणवले की भाषेबद्दल तरी बोलले आहेत. मागच्या वर्षी तर नुसती साहित्यिकांची लिस्टच वाचली होती.

भाषण कळले/आवडले नाही म्हणजे साहित्यसंमेलनाना हजेरी लावण्यास पात्रता नाही! Uhoh

दादा कोंडके, त्यांची तथाकथित प्रसिद्धी, विनोद यांचा उल्लेख अगदीच अस्थानी आहे.. वर ज्यांना भाषण कळले/आवडले नाही त्यांना द्व्यर्थी भाषा हवी आहे हा निष्कर्ष तर सरळसरळ अपमानास्पद! Angry

टण्या तुझे म्हणणे पटले नाही. अशा जड भाषेत दभिंनी अनेक वर्षे समीक्षा केली आहे, ग्रंथ लिहिले आहेत. आणि ते स्वीकारार्ह देखील असावे. पण साहित्य संमेलन हा पूर्णच वेगळा विषय आहे. सामान्य लोकांच सहभाग अपेक्षित आहे. रोजचे जगण्यातले प्रश्न बाजूला ठेवून हजारो लोक भाषणे ऐकण्याचा प्रयत्न करत, पुस्त प्रदर्शनात रमताना बघितले, तेव्हा खरेच नवल वाटलं होतं. यांत खेड्यापाड्यांतून आलेले कॉलेजातली मुले मुली होते, तसे दुरदूरून आलेले पुस्तक-साहित्यप्रेमी म्हातारबुवा पण होते. या लोकांना समजेल अशा भाषेत अध्यक्षांनी त्यांच्या जवळ जाणे अपेक्षित आहे. या वर्षापासून तर अध्यक्षांनी महाराष्ट्रातल्या गावांमध्ये फिरून मराठी बोलणार्‍या-वाचणार्‍या लोकांपर्यंत पोचावे, बोलावे म्हणून एक लाख रुपयांचे अनुदानही सुरू झाले आहे. तिथेही दभि असेच बोलणार का?

दभि अर्थपूर्ण, मुद्देसूद बोलले की नाही, हा इथे विषयच नाही. त्यांची योग्यता किती मोठी आहे, हे सार्‍यांनाच माहिती आहे. जे लोक साहित्यप्रेमापोटी तिथे आले, त्यांना समजेल असं बोलले की नाही, हा मुद्दा आहे. भाषा न कळून लोकांनी पाठ फिरविली, तर हे लोक संमेलने कुठे आणि कुणाकरिता करणार?

पुण्यात आणि आजूबाजूच्या खेड्यांत बोलल्या जाणार्‍या भाषेवर ज्ञानेश्वरीचा, संतसाहित्याचा प्रभाव आहे, असा सिद्धांत त्यांनी मांडला. तिथेही अशी जडबोजड भाषा बोलली जाते का, हेही त्यांना विचारायला हवे.

राजकरणी लोक कितीही फालतू बोलत असले, तरी सामान्यांना कळेल अशा भाषेत बोलतात, म्हणून टाळ्याही मिळवतात. अध्यक्षांनी राजकारणी होणे अपेक्षित नसले, तरी साहित्यसंमेलनात त्यांनी एक लांबलचक भाषण करावे, दुसर्‍या दिवशी पेपरांत त्याचा 'सारांश' छापून यावा आणि पुढल्या वर्षी त्यांनी पुढल्या अध्यक्षांच्या हातात सुत्रे देऊन (दरम्यान सारी मानापानाची, मनधरणीची नाटके पार पाडून) मोकळे व्हावे- एवढेच काम करावे का? या सगळ्यात सामान्य मराठीजन कुठे आले?

>>>> भाषण कळले/आवडले नाही म्हणजे साहित्यसंमेलनाना हजेरी लावण्यास पात्रता नाही! <<<

चिन्गी, मी कुठेही तसे म्हणलेले नाही, तो तुमचा नि:ष्कर्ष

पण, भाषण जड भाषेत आहे, समजायला अवघड आहे, बोलीभाषेतील नाही, छापिल पुणेरी भाषेत आहे वगैरे असे काही आक्षेप अशासदृष शब्दात अस्ते तर मी इकडे फिरकलोही नस्तो,
त्या ऐवजी, आपले वा पक्षी अध्यार्‍हुतरित्या अन्य कुणाकुणाचे डोके फिरले आहे का याची उठाठेव शीर्षकापासून सुरू झाल्याने, माझा आक्षेप त्याला आहे! यालाच सभ्य भाषेत "शालजोडीतून (जोडे) मारणे" असे म्हणतात. यालाच आपण द्वय्र्थी असेही म्हणू शकतो!
अन त्यालाच "संयत" भाषेतील लिखाण म्हणायचे असेल तर मग माझ्यासारख्याने इथे लिहीणेच थाम्बवणे हे बरे! अस्थानी लिखाण होतय माझ!

त्यान्ना त्यान्चे मतस्वातन्त्र्य आहे, ते त्यान्नी वापरले, मी माझे वापरले!

बायदिवे, हा द्वैअर्थी हा शब्द नेमका कसा आहे? मी चूकीचा लिहीतो आहे कुठेकुठे! Happy

मानेगुरुजींच्या सर्व मुद्द्यांना अनुमोदन. विशेषतः-
साहित्यसंमेलनाचे भाषण ही साहित्यनिर्मिती नाही.>>
साहित्यसंमेलनाचे भाषण हा एक संवाद आहे.>>
या नंतर फार काही लिहिण्याची गरज आहे, असं वाटत नाही. Happy

बाकी, शब्दांचा खेळ करून मुद्दे भरकटवून टाकणार्‍यांनी दभिंच्या भाषणातला एखादा मुद्दा इथे परिणामकारकरीत्या मांडून दाखवावा. सगळीकडे करतो, तीच नौटंकी इथे सुरु करू नये.

ज्यान्ना या "महाजनान्च्या विद्वत्ताप्रचुर जड" भाषा समजत नाहीत ते तसेही सरळ तमाशालाच जाऊन बस्तात ना? त्यान्नी साहित्यसम्मेलनाला येऊच नये की!>>>>>> याचा मला तरी दुसरा अर्थ नाही लागत..

यावर "एवढेही कळत नसेल तर माबो वर येऊन मत मांडु नये" असे तुमचे म्हणणे असेल तर तुमची मर्जी!

अन त्यालाच "संयत" भाषेतील लिखाण म्हणायचे असेल तर मग माझ्यासारख्याने इथे लिहीणेच थाम्बवणे हे बरे!

खरे तर आपण इथलेच काय पण मायबोलीवरचेच लिखाण थाम्बवावे असे बर्‍याच मायबोलीवाल्यांचे पांढर्‍या शाईतले मत आहे ...

माने गुरुजींशी अंशतः सहमत कारण अध्यक्षांच्या भाषणातील काही मुद्दे मलाही नाही पटले.
पण त्यांच्या भाषणातील काही मला आवडलेत. सविस्तर लिहू शकणार नाही कारण मला या विषयात फारशी गती नाही. Happy

सासराजी,
माझ्याबद्दल अचानक तुमचे फारच प्रेम उतू चाललेल दिसतय.
दोन मिनिटांच्या अंतरात माझ्या दोन प्रतिसादांना दोन बाफवर उत्तर?
कमाल आहे.
सुपारी घेतल्यागत का लागलेत माझ्यासारख्या पामरामागे? Happy

मुटेजी त्यांच्या मुद्द्याबद्दल वाद नाही. भाषेबद्दल, त्यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीबद्दल आणि स्थळाबद्दल नाराजी आहे.