काही सुरु असलेल्या पोस्ट्स ला कदाचित हे समांतर असेल, पण हि 'खदखद' मला बोलाविशी वाटली म्हणून हा लेखनप्रपंच...
लग्न ठरवताना लग्नाचा खर्च कोणी करायचा,किती तोळे सोने घालायचे असे बरेच ठरते.लग्नाचा संपूर्ण खर्च वधूपक्षाने करायचा पासून सगळ्या वाटाघाटी सुरु होतात. मी तर म्हणेन 'बाजार' भरतो. त्यात वधुकडच्या लोकांनी मुकाट्याने सगळे मान्य करायचे असा एक प्रघात आहे. का? तर आपली मुलगी ज्या घरी जाणार ते लोक नाराज व्हायला नको, तिला कुठलाही त्रास व्हायला नको. खूप सुशिक्षित म्हणवणाऱ्या वरपक्षातील कुटुंबाचा 'सुशिक्षितपणा' अश्या वेळेला गायब होतो. 'आम्हाला काही नको पण लोक काय म्हणतील?' या नावाखाली हा प्रकार रेटला जातो.
तीच गोष्ट झाली 'रुखवताची'. मुलीच्या घरच्यांची इच्छा, परिस्थिती असो वा नसो पण समाजाला दाखवायला रुखवत द्यायला हवाच म्हणून दबाव असतो. 'लग्न' म्हणजे दोघांसाठी नवीन सुरुवात. पण कधी-कधी एक-दोन तोळे सोनं, काही रुपयांसाठी केलेल्या वाटाघाटीचे 'सल' कायम मनात राहून जातात.
तुम्हाला काय वाटते? तुम्हाला असा अनुभव आला का? तुम्ही ती वेळ कशी हाताळलीत?
तळटीप:- हा लेख जर वेगळ्या विभागात हवा असेल तर ते सुचवण्यास मदत करा..
Shilpa_gadmade
मी तर म्हणेन 'बाजार'
मी तर म्हणेन 'बाजार' भरतो.
इथे एकदा हा बाजार भरला होता....
http://www.maayboli.com/node/13149
मुलींनी स्वःतावर विश्वास
मुलींनी स्वःतावर विश्वास ठेवावा. आर्थिक द्रुष्ट्या स्वःताच्या पायावर उभे रहावे. एक आत्मविश्वास असेल तर ठाम पणे असल्या गोष्टींना विरोध करता येतो. आपले आयुष्याचे निर्णय दुसर्याच्या हातात दिले तर मग ते दुसर्याच्या मर्जी प्रमाणे फिरत रहाणार याची जाणीव ठेवावी.
@जागोमोहनप्यारे जुन्या
@जागोमोहनप्यारे जुन्या धाग्याच्या माहितीबद्दल धन्यवाद:-)
पण त्या बाजाराचे स्वरूप वेगळे होते..आणि मी जे मांडू इच्छित आहे त्याचे स्वरूप वेगळे आहे..
इथे फक्त "देण्या-घेण्यावरून" होणाऱ्या वाटाघाटी आणि त्याने मनाला होणारा त्रास,त्यावरचा उपाय अपेक्षित आहे.
मला वाटते 'लग्न' या विषयाला इतके आयाम आहेत कि त्यात बरेच 'उपविषय' चर्चिले जाऊ शकतात.
@ स्वाती..१००% सहमती..
विषय छानच घेतला आहे .. पण खरच
विषय छानच घेतला आहे .. पण खरच देण्या घेण्यावरून कायम साल राहून जाता हे तर अगदी खरा आहे .. तसा बघितला तर दोन घरांची एकमेकांना सोबत देण्याची हि सुरुवात असते.. आणि इथेच गणित चुकता.. त्याचे परिणाम नेहमी करता होतात.. स्वाती हा आत्मविश्वास मला तरी नव्हता (१० वर्ष पण नाही झाले) .. किती मुली मोठ्यांना तोंड देऊन म्हणतील कि हे सगळा नाही करायचा .. .. आमच्या इथे माझ्या नवर्यानी काही गोष्टीत खरच आक्षेप घेतला पण ते घरच्यांना रुचत नाही कारण ते वेळेवर केला.. ह्या सगळ्या गोष्टी पण आधीच ठरवल्या पाहिजे ..आम्ही हे हे नाही करणार या मागची आमची हि भूमिका आहे .. पण बहुदा येणाऱ्या पिढीतील मुली करतील.. मुलांनी हि करावी हि अपेक्षा.. कारण लग्नाच्या वेळी फारच कमी मुला बोलती होतात. हे आमचा क्षेत्र नाही अशा सारखे वागतात..
हल्ली बर्याचदा वधु आणि वर
हल्ली बर्याचदा वधु आणि वर दोघही कमावते असतात. अशावेळी त्यांनी स्वतःच लग्नाचा खर्च करणे जास्त योग्य. मुली घरातील किंवा सासरच्या वडिलधार्या मंडळींना विरोध करू शकत नाहीत. पण होणार्या नवर्याला तरी आपले विचार मोकळेपणे सांगू शकतात. "माझ्याकडे साठवलेल्या पैशातून मी एवढ्याच गोष्टी खरेदी करू शकते/ शकतो. तसचं कर्ज काढून लग्न केलं तर नंतरं ते कर्ज आपल्याला दोघांनाच फेडावं लागेलं" अशी सुस्पष्ट कल्पना असली की मग बर्याचश्या अवास्तव मागण्यांना नकळत आळा बसेल.
<<तुम्हाला काय वाटते?
<<तुम्हाला काय वाटते? तुम्हाला असा अनुभव आला का? तुम्ही ती वेळ कशी हाताळलीत? >>
माझा अनुभव अमेरिकेतला. माझ्या मुलीचे लग्न अमेरिकन मुलाशी झाले. अमेरिकन सासरच्या लोकांना अशी काही कल्पनाच नव्हती की मुलीच्याकडच्यांनी मुलाच्याकडच्यांना काही द्यायचे असते. त्यामुळे तो प्रश्न सुटला. लग्नाचा खर्चः आमचे १५० मित्र नि त्यांचे २५. मग तो खर्च आम्हीच केला. त्याबद्दल मुलीच्या सासरचे लोक खूष.
आणि प्रत्यक्ष लग्नाळू मुला मुलीला एव्हढा घोळ नकोच होता. त्या दोघांना, त्यांच्या मित्रांना बोलावून, लास व्हेगास ला लग्न करायचे होते. त्या दोघांजवळ व आमच्याजवळपण पैसे होते, त्यामुळे खर्च कुणाचा हा मुद्दा गौण! तर त्यांनी तसेहि लग्न केले. तिच्या सासरच्यांनी पैसे देऊ केले, पण आमची "जुनी भारतीय संस्कृति, अभिमान" आडवा आला.
(तसे पैसे असले की असला संस्कृति, अभिमान वगैरेची शेखी मिरवायला अडचण येत नाही. नसते पैसे तर आठवली नसती संस्कृति, वगैरे. तुम्ही देता का? मग आम्ही आणखी चार लोक बोलावतो!)
इतरहि अशी लग्ने झालेली पाहिली. आमच्या भावांच्या मुलांनी अमेरिकन मुलींशी लग्ने केल्याने त्यांनाहि काही मिळाले नाही. पण लग्नाचा खर्च मुलीच्यांनी व दारूचा खर्च मुलाकडच्यांनी अशी एक आपली प्रथा आहे, संस्कृति वगैरे नाही, अपेक्षा पण नाही.
तसे या देशातहि लग्न वगैरे खाजगी गोष्टी मानल्या जातात, त्यामुळे सामाजिक बंधन, दडपण वगैरे नसते. आपल्याला वाटेल तसे करावे.
एका मुलीनी रजिस्टर लग्न केले, तिच्या आईवडीलांनाच काहीतरी वाटले म्हणून त्यांनी सगळ्या १५० मित्रांना जेवायला बोलावले आहे. कुणीहि दडपण आणले नव्हते. वधू वर जेवायला येत नसल्याने, अहेर नको असे ठरले आहे!
मला वाटते की या सगळ्या
मला वाटते की या सगळ्या प्रथान्ना मोडते घालण्यासाठी प्रेम्-विवाहाला जास्त प्राधान्य दिले पाहीजे...
मला वाटते की या सगळ्या
मला वाटते की या सगळ्या प्रथान्ना मोडते घालण्यासाठी प्रेम्-विवाहाला जास्त प्राधान्य दिले पाहीजे...<< माझे स्वतःचा ७ वर्षापुर्वी प्रेम-विवाह झाला आहे. माझा नवरा गुजराथी असूनही त्यांच्या घरून ५ पैशाचीही मागणी नव्हती उलट माझे सासरे आपण साधेपणाने रजिस्टर करू असे म्हणाले शेवटी माझ्या वडिलानी रजिस्टर मान्य केले पण आमच्या घरातले हे पहिलेच कार्य म्हणून इतका गोतावळा बोलावला...शिवाय माझ्या सासरची मोजून २५ माणसे आल्याने प्रत्येकाला भरघोस आहेर करून पाठवले खरेतर मला आणि माझ्या नव-याला हे मान्य नव्हते पण माझी आई म्हणाली तुझ्याचसाठी करतोय हे सगळं उद्या तुला ते नीट नांदवणार नाहीत आता काय बोलायचं?
माझ्या लग्नानंतर माझी जी जाऊ घरात आली तिच्या आईबाबानी फक्त लग्न करून दिलं तेही आर्यसमाजाच्या पधतीने काहीही मान-पान नाही.पण खरच आमच्याकडे कुणालाच काही वाटलं नाही....तिलाही चांगलच नांदवताहेत माझे सासरचे लोक...आता काय बरोबर आणि काय चूक कोणास ठाऊक!!!
(No subject)
खर्च कोणी करावा - मग इथे का
खर्च कोणी करावा - मग इथे का नाही मुली फर्म रहात? फक्त माझ्या आईवडिलांनी खर्च करणं मला मान्य नाही म्हणून. जसं मी लग्नानंतर नाव बद्लणार नाही. मंगळ्सूत्र घालणार नाही तसच माझे आईवडिल लग्नाचा पूर्ण खर्च करणार नाहीत. मानपान दोन्ही बाजूंनी करावा किंवा अजिबात करू नये वगैरे. किती दोन काँट्रास्टींग बीबी चालू आहेत.
...I do agree with Arch upto
...I do agree with Arch upto some extent.. what I feel is that finding/getting a proper match for daughters in arranged-marriages itself is a big difficult thing.. then is it really possible to demand/act so much that we will contribute equally or we will go for Vaidic marriage or we will go for register marriage etc etc? daughter side parents are worried what if due to some petty reasons marriage may not happen at all.. there are cases like this. Another pt is, at the age of 21...25 how mny girls have enough maturity or courage to fight against all our traditions/customs/society rules etc.
जसं मी लग्नानंतर नाव बद्लणार
जसं मी लग्नानंतर नाव बद्लणार नाही. मंगळ्सूत्र घालणार नाही तसच माझे आईवडिल लग्नाचा पूर्ण खर्च करणार नाहीत. मानपान दोन्ही बाजूंनी करावा किंवा अजिबात करू नये वगैरे.<<
इथल्या नाव आडनाव न बदललेल्या, मंगळसूत्र न घालणार्या सगळ्या मुलींच्या लग्नात त्यांच्या आईवडिलांनीच लग्नाचा पूर्ण खर्च केलाय आणि भरपूर मानपान झालेय असं तुला कोणी सांगितलंय का?
की सतत आपला रूढीप्रिय अजेंडा वाजवत रहायचं आणि काही प्रमाणात रूढी मोडलेल्यांना नावं ठेवणे, उपदेश करणे हेच करत रहायचं एवढंच चालवलंय?
मी अशी खमकी मुलगी पाहली आहे.
मी अशी खमकी मुलगी पाहली आहे. जिला सापु झाल्यावर सासरनी कैच्याकै डिमांड्स केलेल्या आवडले नाही. तिने स्वतःह्हून लग्न मोडले. नंतर २-३ वर्ष थांबली. मनासारखा मुलगा-सासर भेटल्यावरच लग्न केले. मधल्या काळात आईबाबांना सांगितले लग्न झाले नाही तरी चालेल पण अस्ली फालतूगिरी सासरच्यांकडून खपून घेणार नाही!
विशेष म्हणजे ती मारवाडी. ज्यांच्यात मुलींचेच काय मुलांचेही लग्न २२-२३ला होते. पैसा पाण्यासारखा जातो (म्हणाजे असल्या डिमांड्स करणे अगदी ती त्यांची संस्कृती असल्यासारखे गृहितक. ( या गोष्टी तिनेच सांगितल्या..) ) तिथे ही खंबीर राहीली.
अशा घटना होतात. मुली लग्नाला-वरपक्ष या कन्सेप्टला-त्यांच्या हुंड्यासद्रुश डिमांड्सना अवास्तव महत्व देऊन आईबाबांना अडचणीत आणू इच्छीत नाहीत आजकाल. बदल होतोच आहे. काही लोकांना तो दिसत नाही वा पचनी पडत नाही एव्हढंच!
माझ्या लग्नात खर्च अर्धा
माझ्या लग्नात खर्च अर्धा अर्धा होता.
लग्नाचे विधी कसे नी किती इत्यादी ठरवण्यासाठी पार जुन्या लिखाणांच्यातून त्याचे अर्थ शोधले. आई संस्कृतची प्राध्यापिका असल्याने ते सोपे गेले. तसेच 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तकही अनेक पातळ्यांवर डोळ्यात अंजन घालणारे ठरले.
शेवटी मी, माझी आई आणि माझा होणारा नवरा आम्ही मिळून सगळा विधि इत्यादींचा कार्यक्रम ठरवला.
मानपान, देणीघेणी या सगळ्याला काट मारलेली होती. आमच्याकडच्या जवळच्या नातेवाइकांना आम्ही काय ते आहेर केले आणि त्यांच्याकडच्या जवळच्या नातेवाइकांना त्यांनी. साड्या, पोशाख इत्यादी ज्याचे त्यांनी केले. माझ्या आईला जेवढी हौस होती तेवढे दागिने तिने मला घालायला मी नकार दिला. अगदीच बेसिक दागिने चालतील सांगितले. आणि त्याच्यापलिकडे घेऊ दिले नाहीत. सासूला सांगितलं होतं मंगळसूत्र केलं नाहीत तरी चालेल. आणि मी तुम्हाला रोज घालायला हवं असेल तर एक छोटसंच करा जे टळटळीत मंगळसूत्र म्हणून जाणवणार नाही. मोठं केलंत तर मी काही घालणार नाही. सासूने दोन केली. लग्नाच्या दिवशीसाठी मोठे आणि एरवीसाठी छोटे.
In our country India, there
In our country India, there are many girls who are just 10th std passed or 12th std passed or somehow completed BA/Bcom etc.. are these girls really in a position to go against these rules! If I put myself into their shoes I will first think of my future and then the future of next generation of girls. It may also possible that the later thought might not come into my mind. But yes for a qualified, professional, earning person its possible to against all these rules!
बी, मला असे वाटतंय आपल्या
बी, मला असे वाटतंय आपल्या देशात वाईट काय आहे किंवा मागासलेले काय आहे हे पाहण्यापेक्षा सुधारलेल्या गोष्टी पाहाव्यात. १०-१२वी पास मुली मी नाही पाहील्या पण असतील नक्की. त्यांना जर आपण तू शिकलेली नाहीस म्हणून विरोध करू शकत नाहीस म्हटले तर ते बरोबर आहे का?
बायदवे, १०-१२वी पास-नापास पोरं मात्र बरेच डिमांड्स करताना ऐकलंय! मुलगी गोरीच हवी, शिकलेलीच हवी , पैशाच्या मागण्या.
जे बरोबर नाही ते नाहीच! [ पूर्वीही सती वगैरे भयंकर प्रथा होत्या. ज्या त्या काळातल्या लोकांना संस्कृती वगैरेच्या गोष्टी वाटायच्या. राजा राम मोहन रॉय सारख्यांनी पावलं उचलली म्हणूनच बंद झाली ना. ] सतीच्या तुलनेत हे तितके एक्स्ट्रीम उदाहराण नाहीये, पण मुद्दा तोच - विरोध केलाच पाहीजे. निदान आपल्याला तेव्हढंच येते...
बी तुमच्या वरच्या विधानात
बी तुमच्या वरच्या विधानात अगदीच तथ्य नाही असे नाही, पण वर सान्गितलेली मारवाडी मुलगी (ज्या समाजात मुलीना मतस्वातंत्र्य फारसे नसते )जर strong stand घेउ शकते तर सगळ्यानाच अशक्य नाही. बर्याचदा पेपरमधेपण अशा बातम्या येतात की कुठल्यातरी खेड्यातल्या लग्नात वरपक्षाने अवास्तव मागणी केली आणि मुलीकडच्यानी लग्न मोडले.मला वाटते आपली भुमिका खंबीर असेल तर शिक्षण , शहर ,खेडे ह्याने फारसा फरक पडत नसावा.
ह्याउलट एक उदाहरण देईल माझ्या आत्याची पुतणी पवई IIT मधुन बी.टेक,पुढे MS अमेरिकेतुन..लग्न तीचे तीनेच एका उत्तर भारतीय मुलाषी जमवले. दोन्हीकडुन विरोध नसल्याने साग्र संगीत लग्न झाले,सासरच्यानी अगदी हुंडा नाही पण उत्तर भारतीय styleने बराच खर्च करायला लावला, इतका की मुलीचे आइवदील म्हणाले आम्हाला परवडत नाही असे नाही पण,एव्हड्यात आपल्याकडची ५ लग्ने झली असती. मुलगी मात्र सगळे enjoy करत होती, कुठेच विरोधात बोलली नाही.
सामुदायिक विवाहांमधून लग्नाचा
सामुदायिक विवाहांमधून लग्नाचा व अन्य खर्च वाचवला जाऊ शकतो. शिवाय अशा विवाहांना सरकार प्रत्येक जोडप्यामागे अनुदान देते व त्यांना संसार उभा करण्यास मदत केली जाते. अशा लग्नांत मानपान - हुंडा - देवघेव - गावजेवण इ. इ. सर्वच गोष्टींना फाटा मिळतो. अगदी गरीब घरांमधील मुलगा - मुलगीही त्यामुळे विधिवत विवाहबध्द होतात, व तेही कमी पैशांत.
''सामुदायिक विवाह'' समाजात रुजले तर लग्नांवरील अफाट खर्च, त्या अनुषंगाने होणारे मानपान -हुंडा ह्या अनिष्ट प्रथा, त्यांपायी चालणारे भ्रष्टाचार (मुलीचा बाप/ भाऊ एवढे सगळे पैसे कोठून आणत असेल? पोरीला भरपूर हुंडा देता यावा म्हणून मजबूत 'खाणारे' लोक मी पाहिलेत!) व नंतर मुलीवर सासरी चालणारे अत्याचार ह्यांना काही प्रमाणात तरी खीळ बसेल असे वाटते.
Mine is exactly other way
Mine is exactly other way round.. I get to see more uneducated people than educated (in a true sense.. not just uni. degree) one. And its so difficult to change their mentality, to push them .. to inspire them to do something good, to help them to realize their own freedom etc etc. They do understand my point but somehow do not adopt it when it comes to them. Thats why I think.. educated person has its world which is quite different than uneducated one. How many female-readers have really supported, digested, assimilated, understood GD's stories? MP's stories? very few if you ever kept track.. its really few.
आमच्या लग्नात बहुतेक खर्च मी
आमच्या लग्नात बहुतेक खर्च मी आणि नवर्याने मिळुनच केला. आई - वडिलांकडुन पैसे घ्यायचे नाहीत असे दोघांनी ठरविलेलेच होते. दाग - दागिने आणि कपडे याचा सर्व खर्च मी स्वतः केला. रुखवत आम्हि ठेवलाच नव्हता.
I spent substantial amt on my
I spent substantial amt on my sister's and her husband's clothing and finally all those clothings are lying somewhere in shelf... both of them haven't even wore it once after the marriage. I am feeling as if I was damn stupid at that time to do so much!
बी तुम्ही इंग्रजी मध्ये का
बी तुम्ही इंग्रजी मध्ये का लिहिताय?
देवनागरी येतं ना तुम्हाला?