प्रिती

Submitted by sarangi on 22 March, 2008 - 06:31

फेर धरुनी थकले रे
किती करु तुझा धावा
रविवर्या तुझ्या असुयेतच
वसुधेचा जन्म जावा

नदीलाटा झुळझुळती
गात निसर्गाचे गीत
धावते अनामीक ओढीने
मनी रत्नाकराची प्रित

कधीचा चातक तहानलेला
तरिही अंतर देउन पाण्यास
सरीत पहील्या श्रावणाच्या
चिंब भिजुन जाण्यास

अशीच दैवी प्रित ही
अवतरली आपुल्या मनी ?
नदी,वसुधा,चातक तर
रत्नाकर,रवी,श्रावण कुणी.

गुलमोहर: