
पनामा,होय! ,जेथे असलेल्या पनामा कालव्यामुळे हे शहर पहिल्यांदा आपल्याला प्रायमरीच्या भूगोलाच्या पुस्तकातून भेटायला येते तेच हे !!
तर पनामापासून १७६किमी.अंतरावर असलेले, पनामाचे एक प्रॉव्हिंशिअल बेट आहे,'बोकास देल तोरो'
इथली बोलीभाषा 'स्पॅनिश'आहे. 'अलमिरांते'च्या खाडीत असलेल्या ३२० बेटांतील हे एक बेट आहे.
'बास्तीमेंतोस' बेट हे 'बोकास देल तोरो'चा एक जिल्हा आहे.

बास्तीमेंतोस चा सूर्योदय

बास्तीमेंतोस ची पहाट

बास्तीमेंतोस चं पाण्यावरचं हॉटेल

The only mode of transport

आमच्या पाण्यावरच्या हॉटेलातील अत्यंत चोख मॅनेजर 'मौरा'

धुकं उतरलेला अलमिरांते चा रस्ता.

बास्तीमेंतोस च्या दोन गोड लोकल बहिणी

स्नॉर्कलिन्ग करताना जवळून गेलेला मासा

एस्ला कोलोन बेटावरचे स्टार फिश बेट. जिथे पाणात असंख्य स्टार फिश आहेत.

स्टार फिश बीच - एस्ला कोलोन.

'एस्ला कोलोन' बोकास चं राजधानी असलेलं बेट

कोलोन मधलं 'इंडिअन(रेड इंडिअन) हस्तकलेचे नमुने विकत असलेले दुकान

रेड फ्रॉग बीच-बास्तीमेन्तोस- या बीच च्या आसपास घनदाट ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात डेंजरस मानला जाणारा बोआ अजगर आहे. हे पिल्लू भर दुपारी किनार्या लगतच्या एका झाडाच्या फांदीवर गुंडाळी करून गाढ झोपलं होतं

हे विषारी ,लाल रंगाचे बेडूक या बीच च्या आसपासच्या जंगलात दिसून येतात. जेमतेम दोन्,सवा दोन सेंटीमीटर लांबीचे हे बेडूक ,लोकल मुले पानाच्या द्रोणात घेऊन टूरिस्ट्स ना १,२ डॉलर्सच्या मोबदल्यात
दाखवत असतात . टूरिस्ट्स कसचे शिरतायत या घनदाट जंगलांमधे बेडूक शोधायला.. भलतचं काही सामोरं यायचं 

रेड फ्रॉग बीचच्या किनार्यावरच्या पाण्यात असंख्य जेली फिश सुळसुळत होत्या. त्यातली एक ,आमच्या बोटचालकाने पटकन पकडली. पण आम्हाला हात लावायची मनाई केली.. कारण जेली फिश चावली तर प्राणावरही बेतू शकते.

बोटप्रवासाचा आनंद लुटतांना 'नील'
फोटो बरोबर जरा प्रवास वर्णन
फोटो बरोबर जरा प्रवास वर्णन पण येऊ दे की...
फोटो जबरी आहेत.. तो अजगराचा तर खलासच..
मा. नील साहेब फुल्ल एन्जॉय
मा. नील साहेब फुल्ल एन्जॉय करताय्त दिसतंय

जेली फिश, साप
पनामा
लोकलाईट्स चे फोटो मस्त वाटतात. रंगीबेरंगी!!
रच्याक
तुम्ही चायना मधे असता नव्हे? आत्ता तिथे सुट्टी म्हणुन 'बोकास देल तोरो' दिसतंय.. ?!?!
बोएनास!
बास्तीमेंतोस मधला अजून एक
बास्तीमेंतोस मधला अजून एक भुलवणारा क्षण.
'१५०२ मधे पॅसिफिक मधे शिरायचा रस्ता शोधत असता ना कोलंबस ने अलमिरांते या बे चा शोध लावला. या बेस्तीमेन्तोस आयलॅण्ड वरून त्याला खाद्यान्न,शस्त्रास्त्र या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असे. म्हणून त्याने या आयलॅण्ड चे नाव बास्तीमेन्तोस ( इन्ग्लिश मधे सप्लाईज) नाव ठेवले
सगळेच फोटो मस्तच... खास
सगळेच फोटो मस्तच... खास करून तो पाण्यावरच्या हॉटेलचा... आणि शेवटचा मुलाचा मिनी टायटॅनिक पोजमधला..
वर्णनहि वाचायला आवडेल.
ऋयाम, हिम्सकूल.. चायनालाच
ऋयाम, हिम्सकूल.. चायनालाच राहते .. पण फेब्रुवारीत चायनीज न्यू ईअरच्या सुट्टीत पनामा ला गेले होते.
भारीच आहे.
भारीच आहे.
थॅन्क्स.. जुई ,झकासराव
थॅन्क्स.. जुई ,झकासराव
व्वा!!! खुप मस्त फोटो..खास
व्वा!!! खुप मस्त फोटो..खास करुन सगळ्या माश्यांचे आणि वन्य जीवांचे..खुप मस्त!!
वा मसतच फोटो वर्णन ही आवडेल
वा मसतच फोटो वर्णन ही आवडेल वाचायला
वर्षू, मस्तच सगळे फोटो.
वर्षू, मस्तच सगळे फोटो. बास्तीमेंतोसच्या सूर्योदयाचा आणि पहाटेचा फोटो खास वाटतोय.
अजगर, साप वै प्राणी नावडत्या कॅटेगरीत आहेत
त्यामुळे न बोलणे इष्ट.
सगळे प्राणि आवडले खास करुन
सगळे प्राणि आवडले खास करुन जेली फिश.....काय एक एक रचना असते ना निसर्गाची.....
खासच आहेत फोटो अजुन वर्णन
खासच आहेत फोटो
अजुन वर्णन वाचायला आवडेल मला 
व्वा!!! खुप मस्त
व्वा!!! खुप मस्त फोटो..खास..!!
थॅन्क्स मंडळी.. वर्णन लिहायला
थॅन्क्स मंडळी.. वर्णन लिहायला सुरु केलं होतं पण खूप लांबलचक वाटत होतं म्हणून फोटोंपुरती माहिती लिहिली. परत प्रयत्न करते..
अरे ! मस्त फोटो आहेत.
अरे ! मस्त फोटो आहेत. नेहमीच्या टुरिस्ट स्पॉट्सपेक्षा वेगळं आहे हे वर्षूताई
वर्णन पण लिहीच.
वॉव.. पनामा! कधी कोणी (माझ्या
वॉव.. पनामा! कधी कोणी (माझ्या ओळखितलं) गेल्याचं आठवत नाही... सही फोटो. पनामा कॅनाल बघायला मिळतो का? त्यातुन बोट राईड वै?!
छान आहेत फोटो. आता असंच सुंदर
छान आहेत फोटो. आता असंच सुंदर आणि तपशीलवार वर्णन येउ देत.
वा! छान फोटो.
वा! छान फोटो.
बोट राईड्स आहेत पण फक्त कनाल
बोट राईड्स आहेत पण फक्त कनाल च्या जवळ जाऊन त्यातून पास होणार्या कमर्शिअल शिप्स जवळून पाहण्यासाठी..
पनामावर सेपरेट ललित टाकतेच .. लवकरच!!
खूप छान फोटो!!!
खूप छान फोटो!!!
सुंदर!
सुंदर!
मस्तच फोटो तुम्ही भरपुर
मस्तच फोटो

तुम्ही भरपुर भटकंती करता अस दिसतय
छान छान!!! सुंदर सफर घडवलीत
छान छान!!!
सुंदर सफर घडवलीत
बास्तीमेंतोस ची पहाट फोटो तर अ प्र ति म!!!!!!
मस्त, वेगळचं डेस्टीनेशन
मस्त, वेगळचं डेस्टीनेशन
भारी आहेत फोटोज.. नक्की कुठं
भारी आहेत फोटोज..
नक्की कुठं आहे हे ठिकाण?
मस्तच आहे भटकंती!! फोटोज खूप
मस्तच आहे भटकंती!! फोटोज खूप आवडले!
आवडले.. मस्त!! नारळाच्या
आवडले.. मस्त!! नारळाच्या झाडांचा शेजार असलेला किनारा मस्त, जेलीमासा पण. पाण्यावरचे हॉटेल तर खास.
छान फोटो (पण त्रोटक माहिती
छान फोटो
(पण त्रोटक माहिती :()
खास लोकाग्रहास्तव वर्णन टाकच
स्नॉर्केलिंग केलात ? त्यावर
स्नॉर्केलिंग केलात ? त्यावर खर तर एक वेगळा लेख हवा. राहूदे, तिथे पाहिलेल्या आणि खाल्लेल्या प्राण्यांवर मिळून एक लिहिलात तरी चालेल.
फोटू मस्तच, नीलची मस्ती वाढलेली दिस्तेय, आजीला काही लिहायला वेळ मिळत नाहिये म्हणून म्हंटल. जरा अजून लिवा की ... नुस्तेच फोटू दावून का जळवताय.
बादवे त्या तीन बहिणींचा फोटू मस्तच आलाय
मस्त
मस्त
Pages