चंद्र-कळा
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
18
चंद्र फुलांचे हार गळा
रात्र सजविशी अंग-कळा || धृ. ||
धुंद धुंद मन, बहर-बंध तन
स्पर्श रेशमी, घुसमटतो घन
छेड काढता, लटक्या रागे
म्हणसी मजला 'कृष्ण-काळा'! || १ ||
देह उमलले, मिठीत रमले
श्वास केतकी, गुंफून पडले
रात्री मधूनी, कळीकाळाच्या
रंगला हा रास खुळा || २ ||
एकतनुता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफीलीतह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ ||
विषय:
प्रकार:
शेअर करा
सुरेख!
सुरेख!
मस्त .पु.ले.शु.
मस्त .पु.ले.शु.
रंगला हा रास खुळा रास च्या
रंगला हा रास खुळा
रास च्या ऐवजी "खेळ" अजुन छान वाटलं असतं..
रास ही स्त्रिलिंगी आहे त्यामुळे ती खुळी आहे...:)
"रास खुळा" जर कृष्णाला
"रास खुळा" जर कृष्णाला म्हंटलं असेल तर बरोबर आहे..
एकतनुता, एकतानता, द्वैत
एकतनुता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफीलीतह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ ||>>>>>>>>>> जबरदस्त! क्या बात है!
कुठे ब्रेकवर होतास रे जया ?
कुठे ब्रेकवर होतास रे जया ? वाचल्यावर जाणवते कि तुझा गारुड किती मिस झालय इतके दिवस .....
आहा !!!
आहा !!!
क्या बात है पेशव्या. वेलकम
क्या बात है पेशव्या. वेलकम ब्याक रे..
सुंदर!
सुंदर!
<< एकतनुता, एकतानता, द्वैत
<< एकतनुता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफीलीतह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा >>
अप्रतिम!
रास ही स्त्रिलिंगी आहे
रास ही स्त्रिलिंगी आहे त्यामुळे ती खुळी आहे...
>>
आं? रास स्त्रीलिंगी? ऐ.ते. न.
मस्त !
मस्त !
वा ! वा!
वा ! वा!
मस्तच. आता लवकर लवकर लिहित
मस्तच. आता लवकर लवकर लिहित चला इथे!
सुंदर!
सुंदर!
मस्त रे!
मस्त रे!
एकतनुता, एकतानता, द्वैत
एकतनुता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफीलीतह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा.................... सुरेख !!!!!!!!!!!!!!!
वाह !
वाह !