गाण्यातला तात्या - १ - वृक्षवल्ली आम्हा..

Submitted by तात्या अभ्यंकर on 17 March, 2010 - 06:02

प्रभातच्या संत तुकाराम चित्रपटातला अभंग..
'वृक्षवल्ली आम्हा..' (येथे ऐका)

image012.jpg

अगदी साधीसरळ आणि तितकीच गोड चाल, चिपळ्यांचा ठेका, आणि विष्णुपंत पागनीसांची सुरेल, प्रासादिक गायकी. अतिशय सुरेख..!

'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती..'

आज तुम्हीआम्ही जंगलतोड वाचवा, झाडं लावा, झाडं जगवा असं म्हणून जिवाचा आटापिटा करत असतो.. परंतु तुकोबांचा द्रष्टेपणा पाहा..त्यांनी फारा वर्षापूर्वीच वृक्षवल्लींची महती गायली आहे.. नव्हे, त्यांना आपले सगेसोयरे मानले आहे!

'पक्षीही सुस्वरे आळविती..!' किती सुंदर शब्द आहेत, सुंदर भाषा आहे! गाण्याच्या पार्श्वभूमीवर ही पक्षांची सुस्वर गायकी कानाला फार छान लागते!

'आमचा ना, चांगला ६००० स्क्वे.फुटाचा ब्लॉक आहे!', 'आमचं हे भलं मोठ्ठं फार्महाऊस आहे बरं का!' अश्या बढाया तुम्हीआम्ही मारत असतो. परंतु तुकोबांची श्रीमंती पाहा.. ते म्हणतात,

आकाश मंडप, पृथिवी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी!

सहा-सात हजार स्क्वे.फुटांचा संकुचितपणा तुकोबांना जमत नाही! Smile

तुका म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणासि!

किती मोठी गोष्ट सांगून गेलेत तुकोबा! 'मनासी संवाद..' असला म्हणजे पुरे.. कुणाचं कौन्सिलिंग नको, कधीही न संपणार्‍या चर्चा नकोत, मतमतांतरे नकोत, तंटेबखेडे नकोत..

'आपुलाचि वाद आपणासि!'.... हेच खरं!

-- तात्या अभ्यंकर.

गुलमोहर: 

अगदी खरं बोललात तात्या Happy

जे तुकोबांना तेव्हा कळालं होतं ते आपल्याला अजुनही उमजलेलं नाही Sad

आपुलाच वाद आपणासि...
म्हणजे आपणच आपले टीकाकार होऊन दोष काढीत जाऊन स्वतःला शुद्ध करीत जायचे. रोजच स्वतःला तपासायचे आत्मपरिक्षण करायचे. आम्हाला शाळ्त अभ्यासाला होता कधीतरी....

तात्या, तुमचे मिपावरील् गाण्यांचे विश्लेषण मी नेहमी वाचते. तुम्हाला संगीताचे अंग आहे नक्की. छान लिहिले आहे हे पण.

>>>>> आपुलाचि वाद आपणासि!'.... हेच खरं!
याचच प्रकट रुप म्हणजे "स्वगते"
अन ती तर आम्ही यस्जीरोडवर शेकड्यान्नी पाडलीत! Proud
एकही सेव्ह करुन ठेवल नाहीये! Happy
(काही "१ १/२शहाण्या"लोकान्ना आपल उगाचच वाटायच, की आपल्या अनुल्लेखामुळेच बघा कस या माणसाला, सॉरी चूकलो, या ड्युप्लिकेट आयडीला "स्वगतावर" "उतरवायला " लावल... Lol
त्यान्ना काय माहीत, त्यान्ना काय समजतय, की प्रत्यक्षात तो या लिम्ब्याचा "आपुलाचि वाद आपणासिं" होता
अहो अस्ल काही समजायला आधी ते इन्ग्रजी विद्येचे पाटलुन्टोपीकुड्ता काढुन उघडेबम्भ होऊन पन्चा लावुन बसावे लागते! अन ते हो कुठले या टिनपाट चारबुकी विद्वानांस पक्षी कालच्या पोरांस समजणार? Wink
आपणच समजुन घ्यायच झाल!
असो...
तात्या,छान लिहिलत अस म्हणणार नाही, कारण एकतर फारस काही लिहिलच नाहीयेत, Proud
हां पण विषय चान्गला काढलात असे मात्र म्हणतो Happy गुड
अजुनही येऊद्यात

मस्त.. आवडला... तुमचे लेख मिपावर वाचलेत.. माहितीबरोबरच त्यामधिल चित्र सुद्धा एकदम सुंदर असतात. Happy

तात्या, तुमचे "बसंतचे लग्न" यावरचे लेख इथेही लिहाल तर खुप छान वाटेल. खुप सुरेख आणि माहितीपुर्ण लेख आहेत ते. प्रतिक्षेत.... Happy

मस्तच, माझा सगळ्यात आवडता अभंग आहे हा, छान वाटल विश्लेषण वाचायला,
चित्र ही अगदी सुंदर आहे Happy