बेंदराचा बैल-जणु त्याचदिवशी सजवलेला
शासनानेच जणु तो दिवस मानलेला
स्त्री मुक्तीचा गवगवा सारा गावभर झालेला
आनंदाने सारा दिवस त्यांनी घालवलेला
नारीविषयी हर एक वक्ता आदराने बोललेला
माता भगिनी या शब्दांचा पाऊस पडलेला
स्त्री विना पुरूष अधुरा--शोध नव्याने मांडलेला
घरच्या ल्क्ष्मीचा आज कौतुक सोहळा चाललेला
नारी मुक्ती-स्त्री शिक्षण याचा उहापोह झालेला
चुल-मुल यात तिचा चेहरा आता न अडकलेला
मदर तेरेसा ते सुनिता विल्यमस यांचा उल्लेख झालेला
स्त्री पुरुष समानतेचा पुल आज पुनः बांधलेला
स्त्री-पुरुष प्रमाण कमी आपल्याकडे कळवळा सर्वांना झालेला
स्त्री-जीव हत्या थांबवण्यात सर्वांनी होकार दिलेला
हुंडाबळी,अत्याचार्,बलात्कार याचा निषेध झालेला
स्त्रीला देव नाही तर माणुसपण द्या ठराव पास झालेला
हे सारे ऐकता ऐकता तिचा उर भरून आलेला
पण डोळ्यासमोर दिसे तिचा पति दारूने धुंद झालेला
तिच्यावर पौरुषत्व गाजवणार्या पतिचा हात उगारलेला
दारूसाठी--लेकराच्या वा तिच्या जीवावर उधार झालेला
स्त्री मुक्ती धुराने तिचा जीव नुसता गुदमरलेला
कुंद हवेत्--सत्य नि भास यातील फरक जाणवलेला
संसाराच्या तत्पपदीवर पाय तिचा पोळलेला
चार वाट्या नि काळया पोतीमुळे जीव तिचा पिचलेला
तिचा जीव एक गणित सोडवण्यात गुंततेला
३६५ वजा ८ मार्च, ऊत्तरात शुन्य आलेला
दिवस हा फक्त तिचा, अस्तित्व साजरा केलेला
आणि इतर दिनी तो कस्पटासमान असलेला
आवडली
खूप वास्तवतावादी आहे कविता.. आवडली..
वास्तववादी कविता..
खरचं विवेक, आपण फक्त भाषणं ऐकतो पण खरी परिस्थिती आहे तशीच आहे.. फार काही बदल झालेला नाही.
हे 'कथा'
हे 'कथा' विभागात का आहे?
चुक भुल
चुक भुल देणे घेणे
सुंदर...
कवितेतून सुंन्दरपणे वास्तव समोर मांडलेले आहे.
खुप छान कविता
कविता खुप आवडली.
दिवस हा फक्त तिचा, अस्तित्व साजरा केलेला
आणि इतर दिनी तो कस्पटासमान असलेला
हे अगदी खरे आहे.
साधना
कविता विभागात हलवली आहे.
तुमची कविता 'कविता' विभागात हलवली आहे.
- अनिलभाई
सर, धन्यवाद
सर,
धन्यवाद.
हे कसं करतात ते मला माहीत नव्हते.
विवेक
सुरेख आणि परखड
सुरेख आणि परखड