(या लेखात काही वैज्ञानीक संदर्भ घेतले आहेत, ते मी वाचलेल्या माहितीवर आधारीत आहेत, ते चुकलेले असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावेत. )
स्वप्ने - ड्रिम्स...
स्वप्ने ही आपल्याला "घडणाऱ्या, घडत असलेल्या किंवा घडून गेलेल्या" घटनांबद्दल काहितरी सूचवत असतात हे आजपर्यंत अनेकांनी अनुभवले आहे आणि मान्य केले आहे. स्वप्नातले जसेच्या तसे घडत नसले तरी ते प्रतिकात्मक सुद्धा असू शकते व त्यातून योग्य अर्थ लावता आला पाहिजे. स्वप्न आणि त्यांचे अर्थ यावर भारतात पूर्वीपासून संशोधन झाले आहे.
परदेशांतही सिग्मंड फ्रॉइड याने यावर "इंटर्प्रिटेशन ऑफ ड्रिम्स" असे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. म्हणजे स्वप्ने आपल्याला एक प्रकारचा पूर्वाभास देत असतात. म्हणजे इंट्यूशनचाच हा एक प्रकार म्हटला पाहिजे.
तसेच-
पूर्वाभास - इंट्यूशन किंवा एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन (इएसपी)
आणि मनकवडेपणा - तसेच दूरवरच्या व्यक्तीच्या मनातले विचार ओळखणे (टेलिपॅथी)
बाधा/पुनर्जन्म - म्हणजे एखादा जीवंत व्यक्ती मृत व्यक्तीप्रमाणे बोलायला लागणे व त्याविषयी माहिती देणे.
मल्टिपल पर्सनॅलीटी डिसऑर्डर - एकाच व्यक्तीत आलटून पालटून अनेक व्यक्तीमत्वे राहात असणे.
.... या सगळया गोष्टींचे स्पष्टीकरण वैज्ञानिक दृष्ट्या एकाच पद्धतीने आपण देवू शकतो असे मला वाटते.
माणसांच्या मनात दिवसभर अनेक विचार चक्रे सुरू असतात. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की मानवाच्या विचारांच्या प्रकारानुसार व तीव्रतेनुसार काही विशिष्ट प्रकारची किरणे/लहरी डोक्याबाहेर कमी अधिक प्रमाणात पडत असतात. त्या अदृश्य प्रकाशकिरणांना औरा म्हणतात. कुणी एखादा बेत तडीस नेण्याचा विचार करत असेल, तर कुणी काही इतर विचार करत असेल. विचार जेवढे तीव्र तेवढे जास्त वेळ ते वातावरणात साठून राहातात व तितक्या दूर प्रवास करतात, असे आपण गृहित धरले तर ते विचार एखाद्या संवेदनक्षम माणसाच्या मेंदूत प्रवेश करून अशा प्रकारे त्याला काहितरी पूर्वाभासात्मक सूचना देवू शकतात. ते विचार स्विकारण्याकरता त्यावेळी मेंदू विशिष्ट स्थितीमध्ये ट्यून्ड असला पाहिजे. (जसे टेलीकम्यूनिकेशन मध्ये रेडियो लहरी प्रक्षेपीत केल्या जावून त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सी- वारंवारिता असलेल्या रेडीयो स्टेशन वर ट्यून होवून ऐकायला मिळतात त्याचप्रमाणे. ) मग याद्वारे टेलिपथीचा ही उलगडा होतो, मनकवडेपणाचाही आणि स्वप्नांचाही अन बाधा/पुनर्जन्म या गोष्टींचाही!!!
म्हणजे, मृत व्यक्तीचे विचार एखाद्याचा मेंदूत शिरून त्याच्या मेमरीत आपोआप साठवले जावी शकतात.
(कुठेतरी मी असे वाचल्याचे आठवते की आपण जे बोलतो ते सुद्धा म्हणे वातावरणात सूक्ष्म रूपाने कायमचे कोरले जाते. म्हणजे नैसर्गिक रेकॉर्डींग. ते पुन्हा कसे ऐकायचे हे मात्र कुणी सांगू शकत नाही. भविष्यात विज्ञानाच्या आधारे यावर संशोधन होईलही! )
मग पुढे कदाचीत या सर्व गोष्टींवर आपल्याला त्यावर नियंत्रण मिळवणे सुद्धा शक्य होईल...म्हणजे असे की कोणत्या प्रकारच्या व्यक्तीचे कोणत्या प्रकारातले विचार नेमक्या कोणत्या माणसाकडे व कसे पोचवायचे वगैरे. मग ही "ह्युमन टेलीकम्युनीकेशन" नावाची एक क्रांतीच होईल असे वाटते.
आपल्याला काय वाटते?
इन्टेरेस्टिन्ग विषयावरचा
इन्टेरेस्टिन्ग विषयावरचा धागा..
लिहितो आठवतील तसे अनुभव...
मजा घ्या. शास्त्रीय चर्चा
मजा घ्या. शास्त्रीय चर्चा दुसरीकडे करा.>>> पूर्ण अनुमोदन, फक्त ते विज्ञानाचे शेपूट लावलेय तेवढे काढून टाका म्हणजे मजा घ्यायला मजा येईल!
सुक्या, मस्त उदाहरण. >>>>ते
सुक्या, मस्त उदाहरण.

>>>>ते परत येणार नाहीत असे फीलींग येत होते. <<<
सामान्य व्यवहारात गुन्तलेल्या सर्वसामान्य व्यक्तिन्चा प्रॉब्लेम हाच होतो, की अशा प्रकारे मिळालेली पूर्वसूचना, याच बरोबर, मेदूने अनेकानेक ग्रहण केलेल्या बाबींचे भासमान पुनःप्रक्षेपण (वा प्रोसेसिन्ग) यामुळे निर्माण होणारे विचार्/स्वप्ने इत्यादिक बाबीन्मधुन, नेमकी खरी पूर्वसूचना कोणती, व मेन्दूचा निव्वळ (प्रोसेसिन्गमधिल आवश्यक) खेळ कोणता याचा फरक करता येत नाही व संभ्रमावस्था वाढते. असे माझे मत. निरनिराळी कर्मकाण्डे, हीच संभ्रमावस्था कमी करण्याकरता तर वापरात आलेली नाहीत ना याचा मी विचार्/अभ्यास करतो आहे.
असो. चान्गला धागा आहे, अजुन्पर्यन्त तरी चान्गला चालला आहे.
> असं म्हणतात की मृत्यूची
> असं म्हणतात की मृत्यूची जाणीव माणसाला सहा महिने आधीपासुन होते....!
मी_आर्या, बहुतेक गणितातल्यासारखे इथेही असेल " if n < x then ..."
कारण जी अनेक बालके ६ महिने वय व्हायच्या आधीच मरतात, ती खरेच बिचारी असतात. मरतात तर मरतात, त्यांना पूर्वसुचना पण मिळत नाही. विज्ञानामुळे बालमृत्युची संख्या बरीच कमी झाली आहे. मनात नसला तरी जनात उपयोग होतो म्हणायचा विज्ञानाचा.
गापै, ते बेबल मास्यासारखे नाही ना पण - वन टु वन आहे.
मेंदूत इलेक्ट्रीकल दळणवळण असतंच पण ते लांब पल्ल्यापर्यंत आपोआप ब्रॉडकास्ट नाही होऊ शकत. नाहीतर सगळ्यांचे विचार लोणचेच नाही तर भुगा करुन टाकायचे मेंदूचा.
ते विद्युतचुंबकीय लहरींचे
ते विद्युतचुंबकीय लहरींचे दळणवळण कन्ट्रोल करणारी पण काही एक शक्ती आहे, ती फिल्टर करत असते सगळे, नाहीतर मेंदूचा भुगाच झाला असता एवढ्या लहरींच्या वाहतूकीने.
खूपच बेकार (as in निरुद्योगी)
खूपच बेकार (as in निरुद्योगी) दिसते आहे ही शक्ती, नास्तीकांचा मेंदु भुगा होण्यापासून थांबवायला

हलके घ्या नाहीतर मनातल्या मनात उच्चारेलेले शेलके शब्द इतरांना नाही तरी त्या शक्तीला ऐकु जातील.
हलके घ्या नाहीतर मनातल्या
हलके घ्या नाहीतर मनातल्या मनात उच्चारेलेले शेलके शब्द इतरांना नाही तरी त्या शक्तीला ऐकु जातील>>
ते तसे ऐकू न जाउ देणारी पण एक शक्ती असेलच की!!!
>ते तसे ऐकू न जाउ देणारी पण
>ते तसे ऐकू न जाउ देणारी पण एक शक्ती असेलच की!!!
अवटॅर मधील पानापानांवर बसलेले देव आठवले ...
निरनिराळी कर्मकाण्डे, हीच
निरनिराळी कर्मकाण्डे, हीच संभ्रमावस्था कमी करण्याकरता तर वापरात आलेली नाहीत ना याचा मी विचार्/अभ्यास करतो आहे.>>>
लिंबुजी आपण म्हणता ते खरे आहे. कदाचीत ही पुजा, कर्मकांडे ही सगळी मनाची समजुत काढण्यासाठी केलेले उपाय वाटतात. आपण सत्यनारायण करतो. आपण ग्रहशांती करतो, ग्रुह शांती करतो. हे सगळे त्या मनाला शांती द्यायला. मनात कुठेतरी एक दुसरे अंतर्मन असते. जे हे सगळे कंट्रोल करत असते.
हे अंतर्मन खुप शक्तिशाली असते. मला स्वतःला ह्या अंतर्मनाच्या शक्तिचा प्रत्यय आलेला आहे. एकदाका आपल्याला त्याची शक्ति समजली की आपण निर्धास्त बनत जातो. अंतर्मन जाग्रुत करणे महा कठीण आहे. मला वाटतं संतांना ही शक्ति जाग्रुत झाली असावी. कारण बहुतेक संत ऐहीक सुखापेक्षा ही अध्यात्मिक सुखाला महत्व देतात. ज्ञानेश्वरांना कदाचीत फार लहानपणीच समजलं असावं की त्यांचं जिवीत कार्य काय. नाहितर फक्त १६व्या वर्षांपर्यंत येवढे महान कार्य? आजही त्याच्या काव्याचा आपण अर्थ लावतो आहे.
काही संतांमध्येही ही टेलीपथी ची शक्ति प्रचंड जाग्रुत असावी. काही ज्योतीषां मध्ये ही दिसते. प्रसिध्ध ज्योतिषी कै.वसुधा वाघ ह्यांच्याशी बोलल्यावर मला हे जाणवले. त्या पत्रिका फक्त २-३ मिनीटे हातात धरुन अचुक भाष्य करीत. टेलीपथी चे उदाहरण डॉ. भा. नी. पुरंदर्यांच्या पुस्तकात " शल्य कौशल्य" मध्ये अढळते. मागे एका धाग्यावर मी ह्या बद्दल लिहिले आहे.
त्यांच्या कडे एक मुसलमान पेशंट डीलीव्हरी साठी आली. त्यांनी तीची नाडी बघुन ३-४ तास अवकाश आहे. हे नीदान केले. केबीन मध्ये गेल्यावर, त्यांना काय जाणीव झाली कळले नाही. त्यांनी त्या पेशंटच्या नातेवाईकां कडुन तिचे नाव, जन्म तारिख, वेळ, जागा वगैरे मागुन घेतले. ( ते उत्क्रुष्ट ज्योतीषी होते)त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने सहज म्हणुन प्रश्ण कुंडली मांडली. आणि धक्का दायक अनुमान निघाले. त्या बाईच्या जीवाला धोका होता. पुढील १ तासात ऑपरेशन केले नाही तर बाई व मुल दोन्ही दगावणार. त्या काळात ( हे साधारण १९६०-६५ च उदाहरण आहे) अधुनीक साधने काहीच न्हवती. म्हणुन डॉ. स्वतः धावत गेले. पेशंट्च्या नातेवाईकांना विश्वासात घेउन ताबडतोब ऑपेरेशन केले. खरोखरीच गंभीर प्रॉब्लेम होता. त्या बाईचं अपेंडिक्स फुटायच्या बेतात होत. ज्या कळा येत होत्या त्या त्याच्या होत्या, लेबरला अजुन वेळ होता. दोघेही सुखरुप वाचले. अशी अनेक उदाहरणे त्यांनी त्या पुस्तकात दिली आहेत.
ह्यात त्यांची टेलीपथी आणि ज्योतीष दोन्ही कामाला आलं.
निरनिराळी कर्मकाण्डे, हीच
निरनिराळी कर्मकाण्डे, हीच संभ्रमावस्था कमी करण्याकरता तर वापरात आलेली नाहीत ना याचा मी विचार्/अभ्यास करतो आहे
अगदी अनुमोदन. मिळालेल्या सिग्नल्स्पैकी खरे कोणते किंवा खोटे कोणते, तसेच चांगले सिग्नल प्रत्यक्षात कसे घडतील आणि वाईट सिग्नल्स कसे टळतील, याचा काहीतरी अभ्यास पूर्वजान्नी केला असणार..
पुनर्जन्मा बद्दल काही अनुभव
पुनर्जन्मा बद्दल काही अनुभव नाहित का कोणाकडे? असतिल तर लगेच टाका. खुप उत्सुकता आहे ह्या विषयात.
मी बरीच पुस्तके वाचली ह्या विषयी. पण कोणाला प्रत्यक्ष अनुभव असेल तर अधीक उत्सुकता आहे.
माझा अनुभव.. आम्ही लहानपणी
माझा अनुभव..
आम्ही लहानपणी खुप खेळ खेळायचो.. चाळीत राहत असल्याने मी माझे दोन भाऊ, शेजारचे तिघे जण असा आमचा ग्रुप झालेला. त्यात मी आणि शेजारची राणी आम्ही खास. आमचे खेळ पण विचित्र. घर्-घर, खजिना- खजिना वैगेरे..(:इश्श:) एका रात्री मला एक स्वप्न पडलं. कै च्या कै मधे मोडणारं..(गच्चीवरून एका कापडी विमानातुन आम्ही जग बघायला निघालोय. आमच्यासाठी एक खास पायलट पण आहे. मग तिथुन निघाल्यावर आम्ही एका गोलाकार बिल्डिंग ला वळसा घालुन एका जत्रे च्या ठिकाणी येतो. तिथे आमचे हे कापडी विमान अपघातग्रस्त होतं. अर्थातच आम्हाला काही होत नाही. मग तिथुन आम्ही पळत पळत घरी येतो.) डिटेल्स देण्याचे कारण म्हणजे मला आणि राणी ला हेच स्वप्न एकाच रात्री पडलं. जे सांगितले आहे जसेच्या तसे. आम्हाला अजुनही आश्चर्य आहे की हे कसे घडले. जाणकारांनी प्रकाश टाकावा..
मला एकाद्या जागेचे स्वप्न
मला एकाद्या जागेचे स्वप्न पड्ते आनि मग भविश्यात तो रस्ता किंवा ति जागा माझ्ह्या संपक्रात येते
असे बर्याच वेळा माझ्या बरोबर
असे बर्याच वेळा माझ्या बरोबर घड्ते
aschig, >> मेंदूत इलेक्ट्रीकल
aschig,
>> मेंदूत इलेक्ट्रीकल दळणवळण असतंच पण ते लांब पल्ल्यापर्यंत आपोआप ब्रॉडकास्ट नाही होऊ शकत. नाहीतर
>> सगळ्यांचे विचार लोणचेच नाही तर भुगा करुन टाकायचे मेंदूचा.
तुम्हाला action at a distance असं म्हणायचं होतं का? मला वाटतं की मेंदूत विचार उत्पन्न होणं ही एक पुंजीय घटना (quantum mechanical event) मानायला हवी. कारण ती फार तरल आहे. भले तिच्यातून उत्पन्न झालेल्या विद्युच्चुंबकीय लहरींना पारंपारिक (classical) पद्धतीने पकडता येत असतील.
विचार उत्पन्न होण्याच्या क्रियेला मग Quantum Entanglemant चे नियम लागू पडत असावेत. त्यामुळे एकंच विचार दोन डोक्यांत (=दोन ठिकाणी) एकाच वेळेस येणं शक्य दिसतं.
मी या बाबतीत तत्ज्ञ नाही. त्यामुळे माझ्या अज्ञानास क्षमा करणे!
आ.न.,
-गा.पै.
मी आधीहि मायबोलीवरचं कुठेतरी
मी आधीहि मायबोलीवरचं कुठेतरी लिहिलेला अनुभव परत लिहितोय.
दहा वर्षापुर्वीची घटना आहे. त्यावेळी शिक्षण संपवुन नुकताच पुण्यात आलो होतो. नोकरी सुरु झाली होती.
कॉट बेसीसवर असलेल्या रुम वर रहात होतो. फक्त काहि कॉलेजचे मित्र सोबत असल्याने त्रास काहीच नव्हता.
उलट वेगळं आणि नवीन लाइफ मस्त सुरु होतं.रुटीन अगदी पर्फेक्ट होतं. हास्य विनोद मजा अस मस्त सुरु होतं.
एक दिवस पहाटेच मला स्वप्न पडल. त्यात माझी आई आजारी आहे अस दिसत होतं. तिल्या गळ्याजवळ काहीतरी प्रॉब्लेम आहे अस मला जाणवत होत. त्यातच तिकडे फुलपाखराच्या आकाराचे खुप सगळे हेलिकॉप्टर्स आले होते आणि ते म्हणत होते मी तुझ्या आईला नेणार आहे. ती आजारी आहे.
त्यावेळी मी स्वप्नातच आईला घट्ट पकडुन रडत होतो. माझ्या बाबाना मी म्हणत होतो तुम्ही पण आईला पकडा आपण त्याना आईला घेउन जाउ द्यायच नाही. आता हे लिहिल हे फार कमी शब्दात पण एखादा चित्रपट दिसावा तस सगळ दिसत होतं. अचानकच जाग आली. किती वाजले होते ते कळत नव्हतं पण पहाट (४ त४ ५) झालेली असावी. त्यानंतर झोपच लागली नाही. त्यावेळी मोबाइल नव्हते. माझ्या गावी घरी लॅन्डलाइनसुद्धा नव्हता. शेजारी असलेल्या लॅन्डलाइनला फोन करुन बोलण व्हायच ते ही आठवडञातुन एकदा शक्यतो गुरुवारी सुट्टीच्या दिवशी. फोन एसटीडी बुथवरुन करावा लागायचा. मला तर त्या स्वप्नाने चैन पडत नव्हता. अस्वस्थ वाटत होतं. बरं इतक्या सकाळी फोन करुन आईशी बोलणं शक्यही नव्हत. त्यात मला ऑफिसला जाण्याची बस सकाळी ७:३० वाजताच यायची. त्यामुळे ऑफिसला गेलो. दिवस कसाबसा संपला आणि संध्याकाळी फोन केला.
आई घरी नव्हती. जवळच राहणारी मावशी फोनवर सांगत होती ती दवाखान्यात गेली आहे. मग मी डिटेल विचारुन घेतल तर तिने फारसं काही सांगितल नाही. दुसर्ञा दिवशी फोन केला आणि आईशी बोललो.
मग जरा बर वाटल. तिला स्वप्नाच सांगितल तर तिलाही आश्चर्य वाटल कारण तिला गळ्याचा खाली एक गाठ आली होती आणि ती त्यासाठीच गेली होती दवाखान्यात. मग माझ्याच आग्रहाखातर त्या गाठीच निदान लवकरात लवकर करुन घेतल. सगळ नॉर्मल होतं. त्यावेळी सगळी अस्वस्थता गेली.
असाच काहिसा अनुभव बाबा आजारी असताना देखील आलेला आहे. त्यावेळी मोबाएल फोन असल्याने लगेच बोलण तरी झाल होत.
हा धागा बघितला आणि लिहू कि
हा धागा बघितला आणि लिहू कि नाही यांवर बराच मनोव्यापार झाला. कारण कुणालाही यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे . कुणाला यात भाबडेपणा वाटेल . लिहिण्याची सवय नसल्याने विस्कळीत वाटेल लग्न ठरले ते रोहिणी तून . त्यामुळे सासर माहेर ओळख काहीही नव्हती . लग्न झाल्यावर एक दिवस झोपेत घोड्यांच्या टापांचा आवाज आला आणि कानात कुजबुज एकू आली. --------व्यक्ती खोटी बोलते .ताडकन उठले आणि नवर्याला विचारले अर्थात तो म्हणाला तुला भास झाला असेल ती व्यक्ती तशी नाही . पुढे याच गोष्टींमुळे मी खूप काही सहन केले.२००० ते २००५ मी मुलांना घेऊन एकटीच भारतात होती . नवरा इथे (us मध्ये) सासर सगळे एकाच इमारतीत . काही कारणांमुळे सबंध खराब झाल्याने माझा कुणाशी संपर्क नव्हता. ऑगस्ट महिन्यात गणपती आगमनाच्या ८ दिवस आधी कुणीतरी कानात कुजबुजले ' गणपती जाळला . भयानक अस्वस्थ झाले . गणपतीचे ते ८ दिवस मी सारखी काही दुर्घटना होऊ नये म्हणून मूर्तीच्या आसपास असायची . नवर्याचा फोन आला कि चुलत पुतणीला cancer चे निदान झाले. तळ मजल्यावर मी आणि पुतणी वरच्या मजल्यावर असे राहयचो . २००६ ला मी इकडे आले. २०११ मार्च , इथे apartment मध्ये आमच्या वर तीन लहान मुलगे असलेले कुटुंब आहे .परत रात्री कानात कुजबुज " coffin आण " या कुटुंबात काहीतरी घडले असे
स्वप्नात जाणवत राहिले . सकाळी भयानक अस्वस्थता . रात्री भारतातून फोन पुतणीचे तिसरी शस्त्रक्रिया झाली serious आहे. जून मध्ये भारतात सगळ्यांनी जायचे ठरले .आचानक मुलीचे आणि नवर्याचे भारतात येणे रद्द झाले . पुतणीला कसे भेटायचे हे प्रश्नच होता. पण शेवटी भेट झाली . माझ्या मुलीने मला विचारले ती कशी आहे . मी सहजतेने म्हंटले गजानन महाराज दिसते . बहुतेक मुलीच्या लक्षात आले मी विचित्र बोलले तिने फोन ठेवला. लग्नाच्या आधी मी ज्या ठिकाणी रहायची तिथे गजानन महाराजांचे मंदिर होते . या भारत भेटी
तिथे जायचे असे ठरवत होती पण जाणे राहिले. मी भेटल्यानंतर १५ दिवसात पुतणी गेली. एक दिवस रात्री अचानक जाग आणि गजानन महाराज पुतणीच्या रुपात दिसले कां असे दोन मिनिटे जाणवले .
कधी कधी वाटत हा मनाचा कमकुवत भाग आहे कि काय पण स्वप्नाचा धाक वाटत राहतो हे मात्र खरे .
हा एक खजिना असणार आहे! अनेक
हा एक खजिना असणार आहे! अनेक नावे/चेहरे एकत्र दिसतील.
http://www.movies.com/movie-news/james-randi-documentary/6640
हा धागा सुटला होता. मागच्या
हा धागा सुटला होता.
मागच्या जन्माच्या आठवणी या योगसुत्र या पंतजली मुनींनी लिहलेल्या ग्रंथातल्या सुत्रात वर्णन केले आहे तश्या समजतात.
मायबोलीकर श्री नरेंद्र गोळे यांच्या एका लेखातला छोटासा भाग या संदर्भाने खाली देत आहे. ज्यात योगसुत्राचा एक श्लोक व त्याचे विवेचन आहे. http://www.maayboli.com/node/12306
१८. संस्कारसाक्षत्करणात् पूर्वजातिज्ञानम् ।
चितामधे अनंत जन्मार्जित वासनांचे संस्कार असतात. ह्या संस्कारांवर संयम केल्याने त्यांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार झाल्यावर त्यामुळे त्या योग्याला कोणत्याही पूर्वजन्माचे ज्ञान होते.
अनेक जण मागच्या जन्मीचे प्रबळ संस्कार घेऊनच जन्माला येतात. या संदर्भात http://www.maayboli.com/node/50744 हा लेख मी लिहला होता.
मागच्या जन्माचे शोध घेण्यासाठी योगमार्गाशिवाय आणखी एक तंत्र उपलब्ध्द आहे ज्यात सेल्फ हिप्नोटाइझ्ड होऊन ते साध्य होते. मला तरी ते जमले नाही.
माझ्या मुलीच्या एका मैत्रीणीला मात्र हे जमले. तीला मागच्या जन्मी ती स्वतः कोण होती. तिचे वडील कोण होते आणि माझी मुलगी मागच्या जन्मी कोण होती आणि दोघिंचे काय नाते होते हे स्पष्ट समजले.
माझंही सिक्स्थ सेन्स खूप
माझंही सिक्स्थ सेन्स खूप तीव्र आहे असे मला वाटते.
गेले काही वर्ष मात्र विचित्र गोष्टी घडत आहेत. उगाच एखाद्या माणसाच्या मृत्यूबद्दल मनात विचार येऊ लागतात. ती व्यक्ती आजारी असल्याची काही बातमी नसते, किंवा तब्येतीच्या लहान मोठ्या कुरबुरीही कानावर आलेल्या नसतात. तरीही उगाच अचानक मनात तसे विचार सतत येऊ लागतात. आणि मग काही दिवसांनी त्या व्यक्तीला खूप बरे नसल्याची, इस्पितळात दाखल केल्याची, किंवा ती व्यक्ती गेल्याचीच बातमी येते. मला जाम भीती वाटू लागली आहे या प्रकाराची.
बाकी लहान सहान premonition च्या घटना आहेत. आठवतील तशा देतो.
पुर्वाभासाची समज पश्चात होते
पुर्वाभासाची समज पश्चात होते (जेव्हा पुर्वाभास खरा होत असतो तेव्हा) मग त्याचा उपयोग काय ?
एकूण १०० पुर्वाभास झाले आणि त्यातले २-३ खरे झाले तर पुर्वाभासावर आधारीत निर्णय घेणे चूकीचेच ठरेल.
पुनर्जन्म वगैरे ह्या मनोरंजनाच्या गोष्टी आहेत ते तेवढ्यापुरतेच ठेवले तर उत्तम
असं म्हणतात की मृत्यूची जाणीव माणसाला सहा महिने आधीपासुन होते....!.. नाही पटत
मग अपघाती मृत्युचे प्रमाण ब-याच अंशी कमी झाले असते.
असो धागा आणि प्रतिसाद इंटरेस्टींग
असं म्हणतात की मृत्यूची जाणीव
असं म्हणतात की मृत्यूची जाणीव माणसाला सहा महिने आधीपासुन होते....!.. नाही पटत
मग अपघाती मृत्युचे प्रमाण ब-याच अंशी कमी झाले असते.
>>
पण मृत्यू कसा होणार आहे हे नाही समजत ना. होणारा मृत्यू होतोच. ती केवळ पूर्वसूचना असते. त्यात टाळता येण्यासारखे काही नसतेच.
त्यासंदर्भातली एक कथा आहे जशी आठवली तशी देतोय. लिंक मिळाली तर नंतर देईनच.
एक राजा असतो. त्याच्या मुलाचा मृत्यू डुकरामुळे की रानडुकरामुळे होईल असे भविष्य एक ज्योतिषी वर्तवतो. राजा राजधानीतली सगळी डुकरे मारुन टाकण्याचे आदेश देतो आणि राजकुमाराला एका भव्य महालात कडक सुरक्षिततेत ठेवतो. तिथे असलेल्या भव्य सजावटीत मात्र वराहांचे पुतळे असतात. एक दिवस राजकुमार आराम करत असताना त्यातलाच एक पुतळा त्याच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू होतो.
अगदी अलिकडची घटना आहे. मी १६
अगदी अलिकडची घटना आहे.
मी १६ जुलैला आमच्या बाजूला राहणार्या वाघमारे काकूंना १ वाजता फोन केला आणि विचारले काकू माझ्या भावाचा माझ्या बहिणीला फोन नाही आला तीन दिवस झालेत तुम्ही जाऊन बघाल का? तर काकू म्हणाल्यात आज सकाळीच ते दिसले होते. गाडी अंगणात पार्क केली आहे. मला फार हायसे वाटले. कारण भाऊ एकटाच राहत होता.
१७ जुलैला म्हणजे अगदी दुसर्याच दिवशी मी ६ वाजता उठणार तेवढ्यात मला अंधुक असे स्वप्न पडले माझा भाऊ तोल जात जात खाली पडला आणि गेला. फक्त ३० सेकंदाचे हे स्वप्न असणार. मी धपकन उठून बसलो. कालच तर आपण वाघमारे काकूंना फोन केला होता हे आठवून मला त्या स्वप्नाचे फारसे वाटले नाही. २१ तारखेला मला सकाळी बहिणीचा फोन आला की १७ किंवा १८ तारखेला माझा भाउ गेला. आणि मला माझे स्वप्न परत आठवले. जर मी त्या दिवशी काकूंना फोन नसता केला तर नक्की मी भावला फोन लावला असता. निदान त्याची बॉडी लवकर मिळाली असती.
इतके वाईट वाटले ना.. आणि आयुष्यभर वाईट वाटत राहील. असे म्हणतात, पहाटवेळी पडलेली स्वप्ने खरी ठरतात.
बी
बी
(No subject)
एक राजा असतो. त्याच्या मुलाचा
एक राजा असतो. त्याच्या मुलाचा मृत्यू डुकरामुळे की रानडुकरामुळे होईल असे भविष्य एक ज्योतिषी वर्तवतो. राजा राजधानीतली सगळी डुकरे मारुन टाकण्याचे आदेश देतो आणि राजकुमाराला एका भव्य महालात कडक सुरक्षिततेत ठेवतो. तिथे असलेल्या भव्य सजावटीत मात्र वराहांचे पुतळे असतात. एक दिवस राजकुमार आराम करत असताना त्यातलाच एक पुतळा त्याच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू होतो. >>>>>>>>>>>>.
हा ज्योतिषी म्हणजे महान ज्योतिषी वराहमिहिर होय .या घटने मुळेच लोक त्यांना लोक वराह मिहिर म्हणू लागले.
डुक्कर हे त्या राजाचे राज चिन्ह होते .
धन्यवाद अत्रेजी. मी नाव
धन्यवाद अत्रेजी. मी नाव विसरलो होतो.
स्वप्न, पूर्वाभास ह्या
स्वप्न, पूर्वाभास ह्या दोन्हींचा अनुभव आई-वडील गेले तेव्हा अनुक्रमे आला. आईच्या वेळेला ती स्वप्नांत येऊन सांगून गेली - मी काही जगत नाही आता. माहेरी गेले होते, भेट झाली. वडिलांच्या वेळेस एक जनरल फिलिंग होतं की आता ह्यानंतर काही आपल्याला बाबा परत दिसत नाहीत. त्यानुसार त्यांची परत भेट झाली नाही. ते दिवाळसणासाठी माझ्याकडे आले होते. दिवाळी झाल्यावर आम्ही फिरायला गेलो आणि ते स्वगृही परत. नवर्याला सांगितले की बाबा गेल्यापासून असं वाटतयं की मला आता ते परत दिसणार नाहीत. ठरवलं की फिरून परत आलो की लगेच पुढच्या विकेंड्ला जाऊन भेटून यायचे. आम्ही शुक्रवारी परत आलो आणि रविवारी सकाळी फोन बाबा झोपेत गेल्याचा.
Pages