आयुष्य असावे

Submitted by sarangi on 18 March, 2008 - 10:06

आयुष्य असे मोरपिसागत
डोळ्यावरुन हळुवार फिरावे
इतके सुन्दर इतके सहज
जसे पहटेचे ते स्वप्न पडावे
अलगद खाली गरंगळताना
तळहातावर उचलुनि घ्यावे
सुखद त्या स्पर्शास मी
निरंतर ह्रदयी जपावे
इतके सुन्दर इतके सहज
स्वप्नागत आयुष्य असावे.......

गुलमोहर: 

छान जमली आहे कविता!
आयुष्य खरंच एवढं सहज सुंदर असावे.

धन्यवाद, पहिलाच प्रयत्न होता माझा.