Submitted by nitin_digule on 18 March, 2008 - 05:34
आठवतेय..........
आपण बांधलेले आपले घर?
आता ते थोडे भग्न झालेय.....
भिंती जणु भेगांची रांगोळी झालीय,
आणि आंगण अमावस्येचे आभाळ....
तु लावलेला जुईचा वेलही आता,
जळुन गेलाय.... वाट पहात....
व्रुंदावनातील तुळस अजुनहि,
तग धरुन आहे ! कदाचित तुझ्या
श्रद्धेचा तीला भास होत असेल....
ऊने ही दारातुन परत जातात,
कोमेजुन... आणि वारा,
इकडे फिरकत पण नाही.......
घराचे छप्पर आता,
चाद्रंमौळी झालेय......
तो देव्हारा.... आणि देव,
पोरके झालेत तुझ्यावाचुन,
चुलीतली राख अजुन
तशीच आहे...
प्रेत जळाल्यावर राहते तशी....
माझे मनही आता तेथे रहात नाही....
शरिराचे विचारु नकोस....
ते जिवंत कुठे आहे?
तु मात्र इकडे येउ नकोस,
तुला ते पहावणार नही.....
ते घर आणि मी...
कोणीच आता तिथे नाही!!!
-- नितीन
गुलमोहर:
शेअर करा
हे नक्की काय आहे?
हे ललित आहे की कविता? कविता असेल तर योग्य विभागात का टाकू शकत नाही?
की मुळात आपण काय लिहितोय याविषयीच संभ्रम आहे? तसे असेल तर लिखाण टाकण्याची घाई कशाला?
माफ करा...
ही कविता आहे की ललीत ? हेच समजले नाही. तुम्ही याला मनोगत म्हणु शकता. कारण मी काही मराठी व्याकरण कोळुन प्यालो नाही. त्यामुळे कविते ची सर्व नियमे याला लागु होणार कि नाही हे सांगु शकत नाही. आणि ललित म्हणजे काय हे मला माहीत नाही.
चुकीबद्दल क्षमस्व.