Submitted by nikhilmkhaire on 18 March, 2008 - 01:27
कुठेतरी अचानक थांबलेल्या, दमलेल्या,
हरलेल्या अन् हरवलेल्या लोकांचा
स्वतःचा एक दूरवरचा देश- एकट्या लोकांचा देश
एकट्या लोकांच्या देशामध्ये
प्रत्येक मी आतमध्ये एकटा
कधी आलाच जर रंगात तर ऐकवतो
स्वतःलाच एकट्या लोकांच्या कविता,
एकट्या लोकांच्या देशामध्ये
सूर पार वर्ज्य
वाटलच कुणाला तर करतात
मारव्यामध्ये अर्ज
एकट्या लोकांच्या देशामध्ये
मौनाला किंमत फार
एक दिवस मौनाला
मिळतात म्हणे सोन्याच्या गुंजी चार
एकट्या लोकांच्या देशामध्ये
वाहतो एक गप्पगप्पसा झरा
बडबडणा-या लोकांचा आजार
त्याच्या पाण्याने होतो म्हणे बरा
एकट्या लोकांच्या देशामध्ये
बंद घरं, दारं बंद
नीट कान देऊन ऐकाल
तर मुसमुसण्याचा आवाज येईल मंद
-निखिल
गुलमोहर:
शेअर करा
इतक्या गहन
इतक्या गहन विषयावर कसं सुचतं रे ? पण मस्त हं .
छान
चांगलीय. लिहीत रहा.
धन्यवाद!
तुम्हाला कविता आवडली हे वाचून आनंद झाला. तुम्ही म्हणता तसा 'ऍब्सोल्युट एकटेपणा' प्रत्येकाला एकदा तरी स्पर्शून जातोच. त्यावर प्रत्ये़काची प्रतिक्रिया भिन्न असते. ज्यांना हा एकटेपणा सोडून जातो ते लौकीक अर्थाने सुखी होतात. अन् एकटेपणा ज्यांना कधीच अंतर देत नाही, हा त्यांचा 'एकट्या लोकांचा' देश.
विंदांच्या
एटू लोकांचा देशची आठवण झाली कविता वाचताना. चांगला वाटला विषय आणि मांडणी.
गप्पगप्पसा झरा
good one
छान कविता
कविता आवडली.
आवडली
निखिल, आवडली कविता.
**वाहतो एक गप्पगप्पसा झरा***..... सुंदर
छान लिहिलस
छान लिहिलस निखिल.
क्या बात है मित्रा..सुरेख !
क्या बात है मित्रा..सुरेख ! जियो यार
खूप छान कविता!!
खूप छान कविता!!
>>एकटेपणा ज्यांना कधीच अंतर
>>एकटेपणा ज्यांना कधीच अंतर देत नाही, हा त्यांचा 'एकट्या लोकांचा' देश.
>>
खूप भिडली कविता आतपर्यंत.. माझ्या आवडत्या १०त गेली..
हे सगळं इतर कुणाबद्दल लिहिलंय
हे सगळं इतर कुणाबद्दल लिहिलंय असं समजून वाचायचं. म्हणजे छान वाटतं!