एकटेपणा नक्की काय असतो..
व्याख्या शोधणं तस कठीणच..
कारण उत्तर बदलतात माणसांबरोबर....
कोणाला मित्र नाही म्हणून एकटा..
कोणी मित्रांच्या घोळक्यात एकटा..
कोणाला मुलांनी टाकलं म्हणून एकटा..
कोणाला मुल नाही म्हणून एकटा..
कोणाला परिवार नाही म्हणून एकटा..
कोणाला परिवाराने नाकारल म्हणून एकटा..
प्रत्येकासाठी व्याख्या वेगळी..
मात्र दुःख अगदीच सारख..
हृदयाला पिळवटून टाकणार..
वेदनेची तीव्रता कदाचित असेल कमी जास्त..
पण सल अगदी तशीच..
हळुवार मनात खुपणारी...
ज्याची त्यालाच कळणारी...
पण या जगात प्रत्येकजण एकटाच असतो..
कधी ना कधी तरी..
कुठल्या ना कुठल्या वाटेवर...
खर तर जन्मभरच...
एकटा येतो अन् एकटा जातो..
सोबत असते ती फक्तं स्वतःची...
अमर्त्य सत्य आहे...
सर्वाना माहित आहे...
पण अस सत्य जे...
समजून ना समजलेले..
कळून ना कळलेले...
म्हणूनच तर..
वर्षानुवर्षे...
जस सत्य अबाधित आहे...
तसा एकटेपणा ही...
बदलतात ती फक्तं माणस...
ग्रेट थॉट !!
ग्रेट थॉट !!
धन्यवाद देव..
धन्यवाद देव..
छान........
छान........
एकटेपनात.. असते स्वताचि
एकटेपनात..
असते स्वताचि सोबत..
ग्रेट कविता..