Submitted by VivekTatke on 17 March, 2008 - 00:40
अश्रूंचा बांध आवरता आवरता
माझा एकेक अश्रू गालावरून
तुझ्या ओंजळीत पडू लागला
नि भावनेने हळवा होऊन जीव
ओला हिरवा श्रावण झाला
शब्द थबकले,ओठात अडकले
बोलू म्हटलं तरी कंठातून स्वर निघेना
बंध नाजूक तोडतो म्हटलं तरी तुटेना
उलट धाग्यांच्या या रेशीम जाळ्यातून
सुटू म्हटलं तरी जीव सुटेना
नको म्हणून समजावले तरी हट्टी बाळाप्रमाणे
मन माझे, तुझी याद रंगवत राहीले
आपुलकीचे,मायेचे,कर्तव्याचे रंग
अधिकच गहीरे होऊ लागले
गुलमोहर:
शेअर करा