Submitted by कौतुक शिरोडकर on 4 March, 2010 - 06:51
(शरदराव, http://www.maayboli.com/node/14391 या सर्वसामान्य माणसाला माफी असू द्या. )
प्यालो चहाच आज मी, रोजच्याप्रमाणे..
तोंडास पोळलेच मी, रोजच्याप्रमाणे!
गेली सुटून रेलही, रोजच्याप्रमाणे,
दुसरीस लटकलो परी, रोजच्याप्रमाणे!
भंगार, फालतू , रडी, शेअरींग टॅक्सी,
पंक्चरली मधेच ती, रोजच्याप्रमाणे!
घायाळ जाहलो किती, लेटमार्क बघता
अर्धा पगार लाटला, रोजच्याप्रमाणे!
ठाऊक हे असे मला, कलिग तो रजेवर,
फाईलच्या ढिगात मी, रोजच्याप्रमाणे!
होणार तेच व्हायचे, चुकला उशीर ना,
चिडते घरात बायको, रोजच्याप्रमाणे
खपतो सकाळ सांज मी, गाढव खरच बरा,
ओझे उशीस ना तया, रोजच्याप्रमाणे
गुलमोहर:
शेअर करा
मला वाटलेलंच होतं की विडंबन
मला वाटलेलंच होतं की विडंबन येणार.
पण इतक्या लवकर अपेक्षित नव्हतं.
छानै!!
छान कौतुक.. पण लिंक चुकली
छान कौतुक.. पण लिंक चुकली बघा..
एकदम जबरी.......रोजच्या
एकदम जबरी.......रोजच्या प्रमाणे
खरचं छान ...
खरचं छान ...
(No subject)
(No subject)
(No subject)
झकास विडंबन आहे,
झकास विडंबन आहे, रोजच्याप्रमाणे ;०