नाते

Submitted by VivekTatke on 15 March, 2008 - 12:16

शीवारातील हिरव्याकंच पिकांना आलाय यौवनाचा बहर
कोवळे कणिस टिपण्यास पक्ष्यांनी केलाय कहर
कोठूनशी आली वार्‍याची मंद मंद हलकिशी लहर
गंध पसरतोय घायाळ करतोय रात्रीचा प्रहर

तरूणाईच्या संगीतावर बासरीची ती मधूर धुन
मृगाच्या पावसाने थंड केले ते वैशाखाचे ऊन
दूरवर पाखरांची कुजबुज लागते प्रेमाची कुणकुण
शामच्या संगतीत होणारी राधेच्या पावलाची रुणझुण

लहरीवर उठणारे शांत जलाशयातील तरंग
निळ्याशार आकाशाचा- पाण्याला आला निळा रंग
जोडलेले नाते तोडावयाचे प्रयत्न केले होऊन नि:संग
पण पुरता हरलो-पुरता बुडलो तुझ्या नावात होऊनी दंग

गुलमोहर: 

व्वा..
शीवारातील हिरव्याकंच पिकांना आलाय ....
पहिल कडव जास्त आवडल.