Submitted by अंतर्नाद on 2 March, 2010 - 23:29
प्रेम...
म्हणायला केवळ शब्द दोन..
मनाच्या कोपर्याना जोडणारे कोन..
प्रेम...
कधी कवीची सुखद कल्पना..
कधी चित्रकराची तरल रेखाटना...
प्रेम...
चाँदन्या रात्री फ़िरत हातात हात..
कधी ना सुटावीशी वाटणारी साथ..
प्रेम...
हवीहवीशी वाटणारी अनामिक हूरहूर..
स्वप्नाच्या दुनियेत नेते ती दूरदूर..
प्रेम...
तरुणासाठी लाल गुलाबाचे फूल..
गरिबांसाठी मांडलेली संसाराची चूल..
प्रेम...
एकाच ताटात जेवणाचे दोन घास..
संसार रथाला रेटणारे चार हात..
प्रेम...
वृद्धासाठी फक्त हाताची उब..
शब्दावाचून पोहचवते अर्थ खूप..
प्रेम...
अंधारमयी जीवनातील आशेचा किरण..
मिरेसाठी श्रीकृष्णाचे पावन चरण..
प्रेम...
व्याख्या निराळ्या पण अर्थ तोच..
हृदयाकडून हृदयाकड़े थेट पोच..
गुलमोहर:
शेअर करा
सहज सुंदर. मस्तच
सहज सुंदर. मस्तच
प्रेम... व्याख्या निराळ्या पण
प्रेम...
व्याख्या निराळ्या पण अर्थ तोच..
हृदयाकडून हृदयाकड़े थेट पोच.. >>> हे छानच..
मस्तय कविता..
धन्यवाद
धन्यवाद
इक लफ्ज्-ए-मोहोब्बतका अदनासा
इक लफ्ज्-ए-मोहोब्बतका
अदनासा फसाना है.....
सिमटे तो दिल्-ए-आशिक
बिखरे तो जमाना है ...............!!!!
पुलेशु !!!