माय मराठीचे श्लोक...!! (ध्वनीफ़ित)

Submitted by अभय आर्वीकर on 27 February, 2010 - 01:01

माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

"अभय" एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                             - गंगाधर मुटे "अभय"
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
....................................................................

श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.

ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
----------------------------
गायक - विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
तबलावादक - प्रविण खापरे
हार्मोनियम - सुरेश सायवाने

गुलमोहर: 

अरे वा! मक्ता घेतला - "अभय" मस्त उपनाम आहे.

कविता छान आहे. आवडली. Happy

"अनेकात एकत्व एक परिभाषा" या ओळीत थोडी गडबड वाटते. Sad

शरद

व्वा! मस्त. गंगाधरजी, सगळ्यांच्याच भावना समर्थपणे व्यक्त केल्यात.

वा ! गंगाधरजी. सुपर्ब. आपणास ही आमच्या मनापासुन शुभेच्छा !!!

मराठीचा जय हो !!!!

सहृदय अभिप्रायाबद्दल सर्वांचा आभारी आहे.:स्मित:

"अनेकात एकत्व एक परिभाषा" या ओळीत थोडी गडबड वाटते. - सहमत.
वृत्त कायम आहे पण लय बिघडते.आशय पुर्णतः कायम ठेवून लय साधणे कठीन चाललेय.

माँ या शब्दाशी पण तडजोड झाली आहे. Happy

खरच छान आहे कविता! आवडली!!

नमू मायबोली, नमू तुज मराठी
तुझी बोलगाणी, सदा येत ओठी

नमस्कार.
ही कविता प्रकाशित झाल्यानंतर बर्‍याच महत्वपुर्ण सुचना आल्यात.
त्या सर्व सुचना विचारात घेऊन शक्य तेवढे बदल केले आहेत.
याउपरही सुचना आल्यास स्वागतच आहे. Happy

आता एकदम आपल्या "कुसुमाग्रज" वगैरे कवींसारखी झाली आहे. --> "महान"! खरंच!
शुभेच्छा!!! Happy

अशा चांगल्या गोष्टी(कविता) जास्तीत जास्त लोकांनी वाचायला हव्यात.:दिवा:
बहुतेक वाचत नाहीयेत का? Uhoh

-ऋयाम.

Pages