अस्तित्व

Submitted by VivekTatke on 13 March, 2008 - 13:01

सखे,आताशा मी माझ्यावर प्रेम करण सोडून दिलय
कारण माझ्यातला मीच आता मला सापडनेसा झालाय
पण एवढं मात्र ख्ररं की मी आता आरशावर प्रेम करू लागलोय
कारण प्रतिमेत तुझा चेहरा माझ्याकडे पाहून हसू लागलाय

सखे, आताशा मी वेड्या कविता लिहीण सोडुन दिलय
कारण तुझ्यारुपाने हळवं काव्यच माझ्यात फुलू लागलय
पण एवढं मात्र खरं की शब्दातून गेयता शोधता शोधता
माझ्या जीवनालाच तुझ्या रुपाने गेयता येऊ लागलीय

सखे,आताशा मी आकाशातल्या तारकांचा नाद सोडून दिलाय
कारण, तुझ्या डोळ्यांनी माझ्यावर त्या वर्षाव करू लागल्यात
पण एवढं मात्र खरं की अगणित तारकांचा वेध घेता घेता
माझ्या आयुष्यात तू एक शुक्राची चादंणी बनु लागलीय

सखे, आताशा मी स्वतःला कळतनकळत विसरू लागलोय
कारण तुझ्या लाघव मधाळ मिठीत मी विरघळू लागलोय
पण एवढं मात्र खरं की त्या धुंद क्षणांना वेचता वेचता
मी मात्र एक बेहोश अशी गझल होऊ लागलोय

सखे,आताशा मी तुझ्या अस्तित्वाचा शोध घेण सोडून दिलय
कारण तू खरी कोण---मी का तू का साक्षात ईश्वर??
पण एवढं मात्र खरं की ईश्वराचा शोध घेता घेता
तुझ्यात सामावून मी मुक्तीचा शोध घेऊ लागलोय

गुलमोहर: