सचिन, भारत, अभिमान, गर्व ई.

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

माझा देव या संकल्पनेवर विश्वास नाही. सचिनवर मात्र आहे. हो, सचिन माझ्या देवांपैकी एक आहे. त्याचा स्वभाव, चिकाटी, आत्मविश्वास, व प्रवास करत रहायचा निर्धार यातुन शिकण्यासारखे बरेच आहे. त्याच्या आकडेवारीमधुन एक वेगळाच आनंद मिळतो. त्याचा आणि माझा देश एक असल्याने (निव्वळ योगायोग?) जास्तच गुदगुल्या होतात (किंबहुना त्या एकाच कारणामुळे जास्त छान वाटतं). एकदिवसीय सामन्यातील द्विशतक? त्यामुळे होणारा आनंद तर झालाच, पण त्याचबरोबर तो बाद न झाल्याने त्याची सरासरी अर्ध्या टक्क्याने वाढल्यामुळे जास्तच आनंद झाला. धवांची संख्या तर वाढलीच.

अनेकांनी अनेक वक्तव्ये केली. गावस्करची जी अपेक्षा आहे ती जरा जास्तच अवाजवी वाटेल, पण तीच सचिनला साजेशी आहे. वार्न सारखा जे बोलतो ते देखील उगीच नाही.

अनेक ब्लॉग्सवर (आणि मायबोलीवर देखिल) आलेल्या काही कॉमेंट्स मात्र कळल्या नाहीत. सुरुवातीला मला आनंद झाल्याचे बोललो. पण अभिमान वाटला असे मात्र मी म्हणु शकत नाही. अभिमान कशाचा? एका भारतियाने पहिले (एक दिवसीय सामन्यातील) द्विशतक झळकवल्याचे? पण मग सचिनच्या चिकाटीचे व मेहनतीचे काहीच नाही का? की सचिन भारतीय असल्याचा अभिमान? (पण तो तर होताच). ऑफीसमध्ये तिरंगे कपडे घालुन जाणार. त्याने काय होईल?

सचिन जी धिरगंभीरता दाखवतो, एकदा धडपडला तर प्रयत्न करायला पुन्हा सज्ज असतो, क्रँप्स असतांना खेळत रहातो, धावक मदतीला घेत नाही, क्षेत्ररक्षणासाठी इतक्या मोठ्या खेळीनंतर देखील पहिल्या षटकापासुन हजर असतो. त्या खंबीरते मधील थोडासा अंश मला कसा मिळु शकेल? सगळ्या भारतीयांना, ऊंहु, सर्व पृथ्वीवासीयांना तो मीळाला तर स्वर्ग तो काय वेगळा असेल?

विषय: 
प्रकार: 

काल बोलताना तो किती शांत होता. त्याने काहितरी अद्वितीय केलेय हे फक्त तो सोडुन बाकी सगळ्यांच्या चेह-यावर दिसत होते. अगदी स्थितप्रज्ञ वाटला मला तो.. ....... सगळ्या भारतीयांना, ऊंहु, सर्व पृथ्वीवासीयांना तो मीळाला तर स्वर्ग तो काय वेगळा असेल?

ऑफीसमध्ये तिरंगे कपडे घालुन जाणार. त्याने काय होईल? >>> तुम्ही आणि मी इथे बसून कंठशोष केल्यानेही काय होणारे? Wink
घालु देत ना तिरंगी कपडे च्यामारी. आपण आनंदाचे संकेत साजरा कसे करावेत हे डिक्टेट का करावे?
आणि हो लारा किंवा कोणत्याही इतर देशांच्या खेळाडूच्या विक्रमांबद्दल तुम्हाला सचिन एवढाच आनंद होतो का?
नसेल तर त्यातच उत्तर दडले नाही का?
आणि होत असेल तर तुमच्या पायावरच डोकं ठेवलं पाहीजे खरोखर. Happy

एका भारतियाने पहिले (एक दिवसीय सामन्यातील) द्विशतक झळकवल्याचे? >>
माझ्या मते तरी ही गोष्ट अभिमान वाटायला पुरेशी आहे ( मला तरी अभिमान वाटला काल)

रागवु नका पण मला हा लेख कळलाच नाही . आपण तर बाबा ह्या छोट्या छोट्या आनन्दावर आणि अभिमानावरच जगतो . नाहितर अस काय घडत रोज रोज आपल्या आयुष्यात वेगळ ? Happy आणि ६ लाखाच पॅकेज ७ लाख झाल याचा काय अभिमान बाळगायचा ? त्यापेक्षा हे बर ना ? Happy

अभिमान कशाचा? एका भारतियाने पहिले (एक दिवसीय सामन्यातील) द्विशतक झळकवल्याचे? पण मग सचिनच्या चिकाटीचे व मेहनतीचे काहीच नाही का? >>>>>>>>> पहिल्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर "हो" पण तो तिसरा प्रश्न जरा विचित्रच आहे. चिकाटी आणि मेहनती शिवाय तो हे करु शकला असता का?
हा असा जरासा चमत्कारिक किंवा थोडासा वेडगळ अनुमान कुठुन आला की ज्यांना सचिननी ही कामगिरी केल्या बद्दल अभिमान वाटतो तो फक्त सचिन भारतीय असल्यामुळे आहे आणि त्याच्या मेहनत आणि चिकाटी मुळे नाही.

रैना अनुमोदन,

आम्हा सामान्यांना आम्ही भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. सचिनचा तर अभिमान वाटतोच पण सचिन भारतीय असल्याचाही अभिमान वाटतो. खुद्द सचिनालाही भारतीय असल्याचा अतिशय अभिमान आहे.
आता याबद्दल कुणाचा एवढा जळफळाट होणे हे मला काही बुप्रावादी वाटत नाही.

सगळा देश 'आपल्या' सचिनचे कौतुक करण्यात दंग असतांना असा काहीतरी विसंगत सूर लावणे हे ' माझे काहीतरी वेगळे... ' हा अट्टाहास पूर्ण करणारे असले तरी वर वैद्य यांनी म्हटल्याप्रमाणे अगदीच वेडगळपणाचे वाटते.

> आपण आनंदाचे संकेत साजरा कसे करावेत हे डिक्टेट का करावे?
रैना, आपण डिक्टेट नाहीच करायचे, अशा आनंदाच्या क्षणी तर नाहीच. त्यामुळेच मी त्यांचे चूक आहे असे नाही म्हणालो. मला कळले नाही असे म्हणालो Happy

> आणि हो लारा किंवा कोणत्याही इतर देशांच्या खेळाडूच्या विक्रमांबद्दल तुम्हाला सचिन एवढाच आनंद होतो का?
मी त्याबद्दल खरोखरच विचार करत होतो. उत्तर नाही असेच आहे (खेळांच्या बाबतीत तरी). पण तसे वाटण्यात सचिनच्या गुणांचा किती वाटा असावा ते कळत नाही.

> रागवु नका पण मला हा लेख कळलाच नाही . आपण तर बाबा ह्या छोट्या छोट्या आनन्दावर आणि अभिमानावरच जगतो .
केदार, रागावायचा प्रश्नच नाही. त्या आनंदापलिकडे जाऊन जे विचार मनात आले ते उतरविले.

> खुद्द सचिनालाही भारतीय असल्याचा अतिशय अभिमान आहे.
हो तर. पण त्या अभिमानामुळे तो जे करायला उद्युक्त होतो त्याचे रहस्य सर्वांना (निदान मला - जर इतरांना नको असेल तर) मिळाले तर छान होईल असे वाटले आणि ते इथे लिहिल्या गेले ... Happy

अभिमान कशाचा? एका भारतियाने पहिले (एक दिवसीय सामन्यातील) द्विशतक झळकवल्याचे? >>
हो. सईद अन्वरने कुंबळेला चार सिक्सेस मारून १९४ केल्यापासून प्रत्येक वेळी कोणी १५० ओलांडले कि आत्ता कोणीतरी अजून "त्या" १९४ च्या पुढे जातो का ह्याची वाट पाहत होतो. सचिन दोनदा त्या उंबरठ्यावर येऊन थांबला त्यावेळी एकदम हताश वाटले होते. "अजुन थोडासा पुढे गेला असता तर ?" असे दर वेळी वाटले होते.
अगदी मधे जयसुर्या तिथे येऊन टेकला होता तेंव्हाही थोडेसे बरे वाटले होते. Don't get me wrong, I was fan of Anwar's style of play, pure aesthetic pleasure for his leg side play. But he never seemed to be deserved candidate for that record IMHO. सचिनने तो ओलांडला ह्याच्यासारखा दुग्धशर्करा योग नाही, सेहवागने ओलांडला असता तरी आवडले असते (जयसुर्याने केले असते तरी चालवून घेतले असते - आपल्याविरुद्ध नसल्याशी कारण) पण अर्थात सचिनची मजाच निराळी.

१. परत १९४ आपल्याविरुद्ध आहेत ह्याचे दु:ख होतेच, तेंव्हा त्याहिपुढे कोणीतरी एकदाचे गेले ह्याचा आनंद एक भारतीय म्हणून आहे.
2. एक, जवळजवळ ३ दशके भले भले करु न शकलेली गोष्ट, एका भारतीयाने (deserved भारतीयाने) केल्याचा अभिमान परत एक भारतीय म्हणून आहे.
3. अन्वरपेक्षा एका अधिक लायक व्यक्तीच्या नावे आणि एका strong opposition विरुद्ध तो आहे ह्याचा आनंद एका cricket आवडणार्‍या व्यक्तीला आहे.
3a. आणि हो लारा किंवा कोणत्याही इतर देशांच्या खेळाडूच्या विक्रमांबद्दल तुम्हाला सचिन एवढाच आनंद होतो का? >> तिसर्‍या मुद्द्यामधल्या "मी" ला नक्की होतो. पण पहिल्या दोन मुद्द्यांमधला "मी" 'तो विक्रम "against India" नाहिये ना ?' हा filter लावून बघतो. And I'm not complaining about it even tiny bit Happy
४. ही गोष्ट सचिनने केल्याचा आनंद एक त्याच्या खेळाचा वेडा चाहता म्हणून आहे. माझ्या वयाचे बहुतेक जण, We owe him for some of the greatest moments in our lives. त्याचे हे प्रतिबिंब.

पण मग सचिनच्या चिकाटीचे व मेहनतीचे काहीच नाही का? >> नक्कीच आहे. किंवा त्यामूळेच त्याचा अधिक अभिमान नि आनंद आहे. परत ह्या दोन गोष्टी compartmentalize करायला कोणी बंदी घातली आहे ? Wink

की सचिन भारतीय असल्याचा अभिमान? (पण तो तर होताच). ऑफीसमध्ये तिरंगे कपडे घालुन जाणार. त्याने काय होईल? >> Just my way of expressing my emotions ! कोणी मायबोलीवर लिहिते तर कोणी blog वर लिहितेय. मला लिहिण्यापेक्षा कपडे घालून जाणे आवडतेय, अस समजायचे. लाखो लोक रोज कुठल्या ना कुठल्या खेळाला कुठल्या ना कुठल्या टीमचे jerseys घालून येतात त्याचाच हा एक आविष्कार.

>> Just my way of expressing my emotions.
That sums it up!

अस्चिग, तू ही 'किंबहुना त्या एकाच कारणामुळे जास्त छान वाटतं' असं म्हणाला आहेसच की. त्याचंच एक्स्टेन्शन आहे ते.

रैना, जीएस, असामी. अनुमोदन.

<<
सगळा देश 'आपल्या' सचिनचे कौतुक करण्यात दंग असतांना असा काहीतरी विसंगत सूर लावणे हे ' माझे काहीतरी वेगळे... ' हा अट्टाहास पूर्ण करणारे असले तरी वर वैद्य यांनी म्हटल्याप्रमाणे अगदीच वेडगळपणाचे वाटते.
>>
अगदी. त्यातही "त्याचा आणि माझा देश एक असल्याने (निव्वळ योगायोग?)" असली वाक्यं टाकून वेगळेपणा अधिक उठावदार होतो बहुतेक.

लेख लिहून आपण विचार करतोय असं दाखवण्यापेक्षा एकदाचा विचार करून मग लेख लिहा.

हो तर. पण त्या अभिमानामुळे तो जे करायला उद्युक्त होतो त्याचे रहस्य सर्वांना (निदान मला - जर इतरांना नको असेल तर) मिळाले तर छान होईल असे वाटले आणि ते इथे लिहिल्या गेले . >>> आशिष आता तुझा बोलण्याचा सुर बदलला आहे. पण ह्या लेखाचे टायटल सर्व काही सांगून जाते. Happy ह्यावर सकाळी सकाळी उत्तर लिहले पण टाकले नव्हते, ते आत्ता टाकतो. तसेही असामीने ते योग्य मांडले आहे पण देश व भाषा ह्या तुझ्या नेहमीच्या शब्दांबद्दल मला लिहावे वाटले.

मला काल रात्री हे एका शाळेकडुन मेल आलं.

Olympic Day at Watts - Tomorrow

Mr. Baldwin, Grade 2 teacher, has made a wonderful suggestion. He thinks everyone should wear the colors of their native country tomorrow to celebrate the Olympics. We have made a few announcements, but thought I would send a listserve reminder. So for all us who are United States Citizens wear some red, white and blue. But since May Watts in an international school, if your country origin is different than the U.S., proudly wear your country's colors.

Michael Raczak
Principal

असं वाटतय की ९९.९९% लोकांना (त्यात मी ही) देश, भाषा ह्यांचा चौकटी मान्य आहेत. आणि लहानपणा पासून "देशाबद्दल प्राउड" शिकवला जातो. अमेरिकेत, क्युबात, रशीयात अन भारतातही !! कदाचित तुमच्या मते हे चुक असेलही पण मग तुम्हाला देश, भाषा असे बंधन ह्या पृथ्वीवरुन काढून टाकन्यासाठी एक चळवळ सुरु करायला योग्य अशी संधी आहे.

ते होईपर्यंत ...

जर कोणी सचिन भारताचा, त्याही पुढे जाऊन कोबी एलेचा, अन लेब्रॉन क्लिवलंडचा असे म्हणत असेल तर आमच्यासारख्याना ते मान्य होते !! कोबी, लेब्रॉन, सचिन अश्या एकमेवद्वितीय खेळाडूंनी अखंड मेहनत घेतली असते, त्यांचा प्रत्येक खेळीतून ते शिकलेले असतात हे गृहीतच आहे, ते म्हणून दाखवावे लागत नाही, ते असे करतात म्हणूनच तर ते "सचिन" असतात, कोणीही सचिन होऊ शकत नाही, आणि त्यामुळे कदाचित "आमचा सचिन", "आमचा लारा" असे लोकं म्हणत असतात, त्यात सामान्य माणसाला गैर वाटतं नाही.

सचिन भारताचा व ते अभिमानी, त्यावर गर्व असणारे लोक पण भारतीय आहेत हा योगायोग आहे. पण माणवांनी घालून घेतलेल्या भाषा, देश ह्या चौकटीमध्ये ते दोघे मोडतात, त्यामुळे ते दोघे आपोआप "एकच" होतात.

तुमच्या शेवटच्या प्यारा मध्ये लिहील्याप्रमाणे सचिन प्रत्येक खेळीतून शिकतो, पण जेंव्हा जेंव्हा त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळतो, तेंव्हा तेंव्हा तो, मला देशासाठी खेळायचे असे म्हणतोच म्हणतो. कालही तो हेच म्हणाला. कदाचित सचिनला पण ह्या देशाच्या चौकटी मान्य आहेत.

(तुमची उद्विग्नता समजू शकतो, पण रैना म्हणते तसा, आनंदही त्यांनी तसाच साजरा केला पाहीजे का? असो! लिहीणार नव्हतो, पण ते मेल अन तुमचा लेख एकाचवेळी दिसले अन उपयोगी वाटले.)

असामी, केदारः Couldn't agree more and wouldn't have said better... Wink

अरे, ODI सुरु झाल्यापासुन (४० वर्षे?) काल एका भारतीयाने सर्वप्रथम २००चा पल्ला गाठला, तोही एका तगड्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध; मग सगळे भारतीय अभिमान, गर्व, देशाभिमान बाळगुन मिरवणार नाहितर काय थंड, मिळमिळीत प्रतिक्रिया देणार?

असामी, त्या दोन्ही गोष्टींकरता (व्यक्तिगत सर्वाधीक धावसंख्या आणि एक दिवसीय सामन्यातील पहिला पुरुष द्विशतकवीर) सचिनपेक्षा जास्त लायक कुणीही नाही हे निर्विवाद आहे.

केदार(२), बदलायचा प्रश्नच नाही. माझ्या पहिल्याच वाक्यावरून सचिनबद्दल मला काय वाटतं हे दिसायला हवं:
> माझा देव या संकल्पनेवर विश्वास नाही. सचिनवर मात्र आहे. हो, सचिन माझ्या देवांपैकी एक आहे.

बहुदा स्वाती जे म्हणते तसेच असावे ...

>>>>> पण तसे वाटण्यात सचिनच्या गुणांचा किती वाटा असावा ते कळत नाही.
सचिनच्या जिद्द/चिकाटी/कौशल्य इत्यादिक गुणान्मुळेच त्याने तो विक्रम केला
त्या विक्रमाबद्दलचा अभिमान हा पक्षी त्याच्या अन्गभूत्-बाणवलेल्या गुणान्नाच नमस्कार असतो, असे का नाही वाटत तुला? एक भारतीय, माझे देशीचा, देशाकरता, देशाच्या नावाने खेळताना जेव्हा असे विक्रम करतो, तर त्यात देशप्रेमाच्या भावनेने सचिनबद्दलही अभिमान वाटला तर त्यात वावगे ते काय?
अभिमान वाटल्यावर, आनन्द झाल्यावर, तो साजरा करण्याच्या पद्धती, व्यक्तिव्यक्ति/पन्थ/कम्पु/जमाती/जाती याप्रमाणे व "त्यान्च्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे" बदलत जातात, मग अमक्याने अमक्याच पद्धतीने आनन्द साजरा का केला असले प्रश्न विचारण्यात कस्ला आलाय वैचारिकपणा असे नाही वाटत तुला?
वैश्विक एकतेच्या व जग हे एक खेडे मानण्याच्या "गप्पा" मारताना, हेच जग, ऐतिहासिक कालातही व आजही प्रत्यक्षात कुठे चालले आहे हे तुमच्या वैश्विकबन्धुत्वाच्या आन्धळ्या आदर्शवादास कसे काय दिसत नाही हे विचारण्यातच अर्थ नाही!
असो.
तुमचे चालूद्यात! Happy
(हो ना, लगेच कोणीतरी विश्वबन्धू येऊन म्हणायचा की प्रत्येक ठिकाणी तोन्ड खुपसलेच पाहिजे का! Proud उगाच विश्वबन्धुत्वाची ऐशीतैशी करण्याचि सन्धी त्यास का बरे द्यावी? Wink )

aschig ,
मी पहिले पोस्ट लिहिले ते तुमच्यावर चिडलो म्हणून नाही . चुकिच्या ठिकाणि राग निघाला .
पण आपल्या लोकाना सवयच आहे आपल्याच लोकाना वाईट म्हणायची .
उदा . परवा २र्या कसोटी मधे आमला नाबाद राहिला तर त्याच्या लढाऊपणाच कौतुक पण जर हेच सचिनच झाल ( आणि बर्याचदा होत ) तर सचिन सामन जिन्कु शकत नाहि , त्यान tailender ना protect करायला हव होत अस सगळे (अगदि साबा करिम सुद्धा) बोम्बलले असते .
आता त्याने १७५ काढल्यावर बाकि कुणि ५० सुद्धा काढत नाहि यात त्याचि चुक काय ?
सचिन म्हणे बान्गला आणि झिम्बाब्वे बरोबर शतक काढतो म्हणणरर्या किति जणानी त्याचा ऑस्ट्रेलिआ विरुद्ध रेकॉरर्ड पाहिलय ?
आधि आमचा (?)लारा तुमच्या (? )सचिनहुन भारि आणि आता आमचा पॉन्टिन्ग (जो भारतियाना काय किंमत देतो ते माहित आहेच )भारी ..... का बाबा ?

आणि हे सगळ्याच बाबतीत . भारताकडे २० nuclear weapons आहेत म्हटल कि त्यात काय चिन कडे १०० आहेत , जसे काहि हा चिनचा जावई आहे ....
माझ्या मते ही व्रुत्ती जरी बदलली तरी बराच फायदा होइल .

मला पण फार आनंद झाला. निर्भेळ आनंद, नि अभिमान.
अश्या वेळी, का, वगैरे प्रश्न विचारायचे नसतात. दुसरे काही मनात येत नाही. निव्वळ आनंद नि अभिमान!

असे आनंदाचे क्षण थोडे, मुलामुलींचे कॉलेज ग्रॅजुएशन, लग्न, मुलगा, मुलगी जन्माला येतात तेंव्हाचे आनंद हे असे असतात.

अशी निखळ भावना क्वचितच अनुभवता येते.

एरवी आहेच इतर फापटपसारा, तुलना, हेच का नि तेच का नाही.

खरेतर सचिनने २०० पूर्ण केल्याबरोबर मी त्याला निवृत्त व्हायची माझ्या वतीने परवानगी दिली आहे . कारन तेव्हडेच एक शिखर गाठायचे राहिले होते . गेल्या दोन तीन वर्षात विशेष्तः कोपरदुखी पासून हे होईल की नाही अशी एक धास्ती होती किम्बहुना फॉर्माअभावी वगळले जाऊन निवृत्ती घ्यावी लागते की काय अशीही भीती वाटू लागली होती. सचिनच्या निवृतीचा विचार मनात आणणेही पाप असण्याचा त्यापूर्वी चा काळ. पण त्या बॅड पअ‍ॅचच्या काळात सन्मानाने जाण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना करण्याची वेळ आली. सुदैवाने ते मळभ गेले आणि आता तर तो एकदम पदार्पणासारखे खेळू लागला आहे.

आता शतकांचे शतक व्हावे असे एक टारगेट चाहत्यांची स्वतःपुढेच ठेवले आहे. ते बहुधा होईलच. २०११चा वर्ल्ड कप खेळण्याची त्याची स्वतःची इच्छा आहे. शतकांचे शतक आणि वर्ल्ड कप झाल्यावर मग काय करायचे राहणार? त्यावेळी बहुधा तो बॅट खाली ठेवेल असे वाटते , कधीही न ओलांडता येणारा एक हिमालय उभा करून...

त्यावेळी निवृत्त होताना सगळ्यांच्याच(त्याच्या आणि चाहत्यांच्या ) मनात हळहळीच्या ऐवजी ' भरून पावल्याची' भावना असावी एवढीच इच्छा .....

सचिनने २०११ चा विश्वचषक उचलून रिटायर (आई ग!)व्हावे अशी त्याची पण इच्छा असणार. ऑसीज सचिन च्या महानतेला गालबोट लावण्यासाठी त्याच्याकडे विश्वचषक नाही हे सांगतात. त्याला तशी टीम मिलावी अशी प्रार्थना (शुभेच्छांपेक्षाही)
हो आणि टेस्ट मधे अ‍ॅव्हरेज पॉंटिंगच्या पुढे ने असे म्हणणे हावरट्पणा होईल का?