गाणे शिकवण्यासाठी गुरू हवाय

Submitted by साधना on 24 February, 2010 - 12:38

मला क्लासिकल गाणे शिकायचेय आणि त्यासाठी नव्या मुंबईत गुरूचा शोध चालु आहे. गांधर्व संगित महाविद्यालयातुन मी मध्यमा पर्यंत शिकलेली आहे, पण ते वर्षाला ८ राग, परिक्षा वगैरे प्रकार झेपले नाहीत. एक राग निवडुन तो मला थोडाफार कळेपर्यंत घोटायचाय आणि त्यासाठी योग्य तो गुरू पाहिजे.

बेलापुर, नेरुळ मध्ये राहणारे कोणी असेल तर बरेच झाले, पण इतरत्रही कोणी असेल तरी चालेल. मुंबईला मात्र येजा करणे मला शक्य नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ठाणे, मुलुंड मधील उत्तम संगीत शिक्षक/ शिक्षिकेची माहीती हवी आहे. मी गांधर्व महा. ५ परिक्षा उत्तीर्ण आहे. पहिल्यांदा सुगम पण चालेल.
मा. बो. करांनी मदत करावी.

www.shadjamadhyam.com - ही साईट बघा... इथे ऑनलाईन शिकायची पण सोय आहे. तसेच बर्‍याच गुरुंचीही नावे आहेत .

साधना,
नेरुळ्हून उलवे येथे जाताना,बेलापूर ब्रिज क्रॉस केल्यावर पनवेलसाठी डावीकडे एक वळण येते.या रस्त्याने पनवेलकडे जाताना कोंबडभुजे,गणेशपुरी,मोहा,अशी गावे गेल्यावर ''पारगाव'' लागतं. या गावात गांधर्व महाविद्यालयाचे क्लासेस चालतात. शशिकांतबुवा पारगावकर बहुधा हे क्लासेस घेतात. माझ्याकडे त्यांचा नंबर नाही.....अधिक माहिति मिळाल्यावर पोस्टतोच.

बाफबद्दल आभार

मला पण मुलीसाठी गाणं शिकवणारं कुणी हवं आहे. सहा वर्षांची आहे. घरी येऊन किंवा क्लासेस मधे कसंही चालेल.

स्थळ : पुणे रेसकोर्सच्या आसपास किंवा मग
शनिवार रविवार : सिंहगड रोड, वारजे, एरंडवणा, म्हात्रे पूल या भागात