त्या तिथे, पलीकडे, तिकडे

Submitted by मंदार-जोशी on 24 February, 2010 - 01:42

त्या तिथे, पलीकडे, तिकडे
माझिया प्रियेचा फ्लॅट रे

इमारती उंच दाट दाट
वळत जाय डांबरवाट
वळणावर दिव्यांचे
खांब उभे वाकडे, माझिया || धृ ||

खिडकीपर्यंत पाईप, जसा वेल
प्रयत्न चढण्याचा, माझा फेल
माझ्या सकट तो कोसळला
त्याचे अन मम हाडांचे, तुकडे ते केवढे, माझिया || धृ ||

तिथेच डोक्याच्या, शिरा भंगल्या
डोळ्यांपुढे दिवसा, चांदण्या चमकल्या
बघ्यांचा हा जमाव सत्वरी
इस्पितळात मला हलवे, माझिया || धृ ||

तिथे मला ती 'बघण्यास' येता
मम वेदना या पळूनी जाता
नाजूक आपुला हात ती
माझिया डोक्यावरून फिरवे, माझिया || धृ ||

गुलमोहर: 

तिथे मला ती 'बघण्यास' येता
मम वेदना या पळूनी जाता
नाजूक आपुला हात ती
माझिया डोक्यावरून फिरवे, माझिया || >>>>>

तिला तिथे बघुन "तसे"
भाऊ तिचा "पेटतसे"
राकट त्याच्या हाताने
मुस्काट हे फोडतसे, माझिया ||

जपुन रे हिरो गिरी
भाऊ दावे भाईगिरी
विडंबने रचण्या ह्या
हात बरा होऊदे, माझिया || Proud

प्रयोग, अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. Wink

माझे लग्न झाल्यापासून मी जिन्यानेच येतो.
कारण खिडकीतून येताना लाटणे लागल्यास.......असो. Proud

Rofl