हे विडंबन आणि विनोदी कविता यांचे मिश्रण आहे. म्हणून विडंबन ह्या शीर्षकाखाली टाकतोय.
ही कविता मी चक्क मला डास चावत असताना केली आहे, त्यामुळे ह्याला (मेथड अॅक्टिंग च्या चालीवर) 'मेथड कविता' असेही म्हणता येईल. 

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
डासांचा सुकाळू
मलेरियाचा आधारू
बहुत करावा भ्रष्टाचारू, पालिकेने || १ ||
असे कामगार येती
औषध मारुनिया जाती
तरी डास आम्हां चावती, दिवसाराती || २ ||
असा हा पालिकेचा फवारा
डासांनी पचविला सारा
आम्ही म्हणतो मारा मारा, डासांना या || ३ ||
कासव, गुडनाईट, जेट लावता
घरातले या डास मारता
खर्च होतो पहा, डोंगराएवढा || ४ ||
कानांशी करती पिरपिर
रक्त शोषूनी आमुचे फार
डास होती फुगीर, आवळ्याएवढे || ५ ||
रक्त शोषूनी ड्रॅक्युला थकला
पण मलेरिया त्याने नाही पसरविला
ते काम सोडले आहे, डासांसाठी || ६ ||
अशी ही आमुची डास कथा
आणि आम्ही सोसलेली व्यथा
एकूण तुम्ही झाला नसाल 'बोर'
तर समजू आम्ही आमुचे भाग्य थोर || ७ ||
|| समाप्त ||
वैचारीक डास म्हणायचयं का
वैचारीक डास म्हणायचयं का तुम्हाला
उदय
उदय
वैचारीक डास काहीही काय रे
वैचारीक डास
काहीही काय रे
Pages