सप्रेम नमस्कार-प्रवेशिका २० अ- (साजिरा)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:45

मी वडिलांना लिहिलेले पत्र.

sajira1-page-1.jpgsajira1-page-2.jpgsajira1-page-3.jpgsajira1-page-4.jpgsajira1-page-5.jpgsajira1-page-6.jpgsajira1-page-7.jpgsajira1-page-8.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad मी पुर्ण वाचुच शकले नाही, डोळे भरुन आले की नंतरची सगळी अक्षरच पुसली गेली समोरुन. एका बैठकीत वाचणं अशक्य आहे माझ्यासाठी.

भावना किती सुंदर प्रकारे मोकळ्या केल्या आहेत तुम्ही. तुमचे गुण हे खरंच वडिलांकडून आलेलेच दिसतायत. लिहीण्याची हातोटी, सुंदर हस्ताक्षर.

तुमच्या रुपाने केवढं मोठं आकाश आम्ही पांघरलं होतं>>>> मनापासून आवडलं. आई-वडिल असतात तोवर आपल्याला कोणत्याच गोष्टींची झळ ते जाणवू देत नाहीत.

भोला मन जाने अमर मेरी काया- कुमारांचे एक निर्गुणी भजन आहे.
या क्षणी कुमार/कबीर आठवायचे कारण म्हणजे प्रतिक्रियेसाठी सुद्धा शब्द नाहीत.
.......आपले आईवडिल आपल्या मनात अमरपट्टा घेऊनच आले असतात नाही ?

भावनाच इतक्या असोशीने प्रकट झाल्या आहेत की त्या व्यक्त करणार्‍या वाक्यांना, शब्दांना अप्रतिम म्हणणं हे त्यामागच्या दु:खाला दुय्यम लेखल्यासारखं होईल. त्यामुळे बोलण्यासारखं काही शिल्लकच नाही.. एवढंच म्हणेन चटका लागला.. Sad

खरच डोळे भरुन आलेत साजिरा...! माझेही वडील मागच्या वर्षी 'अक्षय्य तृतीये'ला गेले- ते ही १५च दिवस हॉस्पिटलमधे होते, आणि त्यांनीही आम्हाला त्यांच्या सेवेची काहीच संधी दिली नाही, चुकांची क्षमा मागु दिली नाही... अगदी अगदी! Sad

जाता जाता: मी ही अगदी याच विषयावर पत्र लिहीण्याच्या बेतात होते...पण वेळेअभावी...!

>> हे आकाश असं फाटू कसं शकतं?

साजिरा, या पत्रावर प्रतिक्रिया कशी द्यायची?

Sad फार मनापासून लिहीले आहे.. फार रडले मी.. Sad
यावरून आठवले बाबा सांगतात ते.. माझे आजोबा असेच कॅन्सरने १५-२० दिवसात गेले, तेव्हा बाबांनी पत्र लिहीले होते. त्यानंतर ते दर वर्षी लिहीतात आजोबांना पत्र.

Pages