सप्रेम नमस्कार-प्रवेशिका १० अ- (limbutimbu)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:22

१९९३ सालचे, माझ्या मुलीच्या बारशाचे स्वहस्ताक्षरातील आमन्त्रण पाठवित आहे.

(दोन्ही पानावरचा मजकूर वाचता यावा म्हणून एकच इमेज दोन बाजूंनी टाकली आहे.)

For Maayboli Vijaya barase aamantraN 19931.jpgFor Maayboli Vijaya barase aamantraN 1993r.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
हि पत्रिकेची आयडीया आणि रेखटन कोणाचे आहे?

आणि तुमच्या मुलीच [कच्च्या लिंबुच (म्हणजे शाळेत असतांना खेळात लहान मुल आलीत कि आम्ही त्यांना कच्चा लिंबु म्हणत असु म्हणुन)] नाव काय ठेवलत? Happy

सर्वान्ना मनःपूर्वक धन्यवाद Happy
दोन्ही हातान्च्या मुठी वळवलेल्या बाळाचा चेहरा ओरिजनली मी काढलेला नसुन माझ्या पुसट आठवणीन्प्रमाणे तो मूळ चित्रावरुन ट्रेस केलेला आहे/वा मूळ चेहर्‍याची झेरॉक्स वापरली आहे.
बाकी फुलेपानेफुगे, दुसरी बाहुली इत्यादी स्वतःच हाती, त्यावेळच्या नोकरीतील ऑफिसमधे बसून अत्यन्त कमी वेळात केले. एका एफोर आकाराच्या पेपरमधे दोन पत्रिका बसवल्या होत्या व कुमठेकर रोडवरील डीजी कॉपिअर्स मधुन त्यावेळेस पस्तिस रुपये शम्भर या दराने छापुन घेतल्या होत्या. हे आर्टवर्क बरीच वर्षे जपुन ठेवले होते, कदाचित अजुनही असेल कुठे तरी खबदाडीत! यापेक्षा कितीतरी चान्गले बनवता आले असते असे तेव्हाही अन आत्ताही वाटत राहाते.
पण असे का केले? त्याची तत्कालिक कारणे अनेक, पैकी,
१) मुलिचा जन्म व पक्षी तिचे बारसे "आनन्दाने" साजरे केले जाऊ शकते, हे उदाहरणच त्या काळात माझ्या डोळ्यासमोर कुठे नव्हते.
बाजारातुन विकतच्या पत्रिका आणून काहितरी साजरे केल्याचे दाखविण्यापेक्षा, स्वहस्ताक्षरात स्वकष्टाने ते करणे मला योग्य वाटले होते.
"पहिलीवहिल बाळन्तपण अन मुलगीच झाली काऽऽऽ" अशा अर्थाने नाके मुरडणार्‍या काही निवडकान्च्या तोन्डावर फेकायला हा मी बनवलेला, चारोळी(?) सहित माझ्याच मजकुराचा कागद अत्यन्त योग्य आहे यावर लिम्बीचे नि माझे एकमत झाले होते. किती लोक येतिल याची पर्वा न करता, सर्व परिचित/नातेवाईकांमधे हा कागद वाटला होता! परिणाम इतकाच झाला की त्यानन्तर कधीही कुणीही लिम्बीला "मुलगीच झाली का" म्हणून प्रत्यक्ष वा आडपडद्याने टोकायचे धाडस केले नाही.
२) विकतची पत्रिका छापुन घेऊन वाटणे परवडण्याजोगे नव्हते. काटकसर हा स्थायी भाव असल्याने उपलब्ध तेवढ्याच पैशात गम्मत्/मजा/हौस करायची या धोरणात ही पत्रिका सहज बसत होती.
त्याचबरोबर स्वतःच्या हाताने काहीतरी नाविन्यपूर्ण कलाकुसरीचे बनवायचे यातिल आनन्द काही वेगळाच, नाही का?
३) सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने, १९९३ साली इकडे कॉम्प्युटर जरी आले असले, इतकेच नव्हे तर १९९० साली कॉप्म्युटर चक्क भाड्याने घेऊन डाटाएन्ट्रिची कामे केली असली, तरी मला कॉप्म्युटर सहजी उपलब्ध होणे शक्य नव्हते, परवडण्यासारखे नव्हते, अन त्याकाळी मायक्रोसॉफ्ट विन्डोज प्रणाली वा इतर प्याकेजेस प्रचलित व्हायची असल्याने आत्ता सारखे स्वतःच कॉप्म्युटरवर आर्टवर्क करुन छापुन घेणे त्याहून अशक्य होते. जुन्या वर्डस्टार (WS4) मधे मराठि करता एक फॉण्ट होता असे पुसट आठवते. पण यातिल काहीच उपलब्ध नसल्यामुळेच, मी वरील पत्रिका हातीच बनवली, अन ते चान्गलेच झाले. आज इतक्या वर्षानन्तर पोरीने पत्रिका बघितली तेव्हा तिला आनन्दाचे भरते आले होते की "अरे, माझ्या (खडूस Proud ) बाबान्नी माझ्याकरता ही तेव्हा बनवली होती? "

मुलीला एकुण पाच नावे ठेवली, पैकी रेकॉर्डवर विजया हे नाव, तर घरीदारी नातेवाईक/मैत्रिणीन्मधे प्रचलित नाव केतकी.
माझ्याच जन्मतिथीवर व इन्ग्रजी क्यालेन्डरनुसार माझ्या जन्मतारखेनुसार केवळ एक दिवस (खर तर काही मिनिटे) आधी, माझ्या वयाच्या बरोब्बर तिसाव्व्या वर्षी जन्माला आलेल्या माझ्याच राशीच्या माझ्या या अपत्याच्या बारशाचे आमन्त्रण "मराठि भाषा दिवसा" निमित्ताने पुन्हा एकदा प्रकाशात आले, जुन्या आठवणीन्ना उजाळा मिळाला, त्याबद्दल सन्योजकान्चे आभार Happy

(वरील तिथी/रास्/वय हे उल्लेख ज्योतिषतज्ञान्करता इन्टरेस्टेड आहेत म्हणून दिले आहेत)

मस्तच.

Pages