Submitted by samurai on 12 March, 2008 - 10:24
उधळला मी डाव का? ते आठवे फिरुनी मला,
निश्चयाची ती उतारी मज कळे चुकली पुन्हा
दोन आले चार गेले , हात हाती मोजता,
मिळ्वण्यातिल ती गुलामी घातकी ठरली आता
हाय ! झाला आज एक्का , हुकुम असुनी एकटा,
एकट्याची शून्य किम्मत नेमकी दिसली आता
'डाव सरला' ते म्हणाले, मीच हरलो तेव्हढा,
मिसळुनी पानांत पाने, हार मी पिसली आता
डाव येती - डाव जाती , जाणिले पुरते पुन्हा,
धुर्ततेची नेक खेळी आतुनी रुजली आता
गुलमोहर:
शेअर करा
छान!!
छान!!
खुप दिवसनी..
'डाव सरला' ते म्हणाले, मीच हरलो तेव्हढा,
मिसळुनी पानांत पाने, हार मी पिसली आता
डाव येती - डाव जाती , जाणिले पुरते पुन्हा,
धुर्ततेची नेक खेळी आतुनी रुजली आता
सुंदर... और एक दावं हो जाये...
सुरेख ...
... खुपच छान !!
छान............!!!
छान............!!!