पिट्सबर्ग ची माहिती हवी आहे. कोणी मदत करू शकेल का??

Submitted by नविना on 22 February, 2010 - 09:57

नमस्कार,
मला जरा माहिती हवी आहे. आमचं पिट्सबर्गला/कनॉन्सबर्गला मुव्ह होण्याचं चाललं आहे. मला तिथल्या चांगल्या रेंटल अपार्टमेंट्स बद्दल माहिती हवी आहे. शक्यतोवर कनॉन्सबर्गच्या जवळ असं हवं आहे. किंवा कमीत कमी आय ७९ च्या अगदी जवळ राहिल असं तरी.
आम्ही ईंटरनेट वर शोधतोच आहे. एक दोन बरे वाटतात आहेत पण तरिही जर कोणी त्या भागात राहणार्‍या व्यक्तीनी मार्गदर्शन केलं तर उत्तम असेल असं वाटतं आहे. नवर्‍याचं ऑफिस मोस्टली कनॉन्सबर्गलाच राहिल त्यामुळे शक्यतोवर त्याच्या जवळच असलेलं उत्तम असा आमचा विचार आहे.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविना, इथले लोक मदत करतीलच्..पण अजून एक करून पहा, ऑर्कूट वर अकाउंट असेल तर सरळ पिट्सबर्ग आणि इंडियन असा सर्च करा..जे सापडतील त्यातल्या लोकांना, शक्यतो फॅमिली असलेल्यांना मेसेज पाठवा आणि विचारा..मी नेहमीच असे करून घर शोधते.आणि तिथल्या मराठी मंडळाला पण नक्कि विचारा..

धन्यवाद स्नेहा१. नक्की असं करून बघेन, पण मला थोडी भिती वाटते ओरकुट वर वगैरे....मराठी मंडळाला विचारणं चांगलं असं वाटतंय. त्यांची साइट पण पाहिली मी कालच. नक्कीच कोणीतरी सांगेल. पुन्हा एकदा धन्यवाद.