Submitted by रेणू on 22 February, 2010 - 02:22
-मंगेश पाडगावकर यांची माफी मागून..
सांगा कस शिकायचं?
सांगा कस शिकायचं?
रडत खडत की प्रेमात पडत
तुम्हीही चिडवा!
पाढे म्हणून आमची वाट
कोणीतरी लावतच ना?
भूण-भूण दोन तास
आमच्यापुढे करतच ना?
लाथ खात बसायचं की चणे खात हसायचं
तुम्हीही गिरवा!
कळ्याकुट्ट परीक्षांत
जेव्हा काही सुचत नसतं
तुमच्यासाठी कोणीही
कॉपी घेऊन उभं नसतं
कळोखात पडायचं की प्रकाशात सडायचं
तुम्हीही बडवा!
शाळेत 'दाते' टपून बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि "फ़ुलं" फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
दात्यांवर् चिडायचं की फुलांकडे बघायचं
तुम्हीही बिघडा!
वर्ष आर्ध सरलं आहे
असं सुद्धा म्हणता येतं
वर्ष आर्ध उरलं आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरलं आहे म्हणायचं की "भरलं" आहे म्हणायचं
तुम्हीही तुडवा!
सांगा कस शिकायचं?
रडत खडत की प्रेमात पडत
तुम्हीही ठरवा!!!
-रेणुका खटावकर (रेपाळ)
गुलमोहर:
शेअर करा
वा ! क्या बात है . रेणू ...
वा ! क्या बात है . रेणू ... आम्ही ठरवलं ... छानै ..
शुभेच्छा !!
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना !
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना !
तुम्हीही चिडवा! गिरवा!
तुम्हीही चिडवा! गिरवा! बडवा! तुडवा .....
म्हणजे काय ?
मी मंगेशकरांची कविता वाचलेली
मी मंगेशकरांची कविता वाचलेली नाही
पण ही कविता ग्रेटच........