ज्वेलरी मेकिंग, फुलांचे बुकेज.. याबद्द्ल माहिती हवी आहे

Submitted by juyee on 20 February, 2010 - 05:43

ज्वेलरी मेकिंग , फुलांचे बुकेज, केसात घालायचे वेगवेगळे ब्रॉचेस इत्यादींबद्द्ल माहिती हवी आहे. मला अस वाटत हे कोर्सेस घरी बसल्या आपण शॉर्ट पिरियमध्ये शिकू शकतो, (अर्थात क्रियेटिविटि महत्वाची )
मला अशा कोर्सेसबद्द्ल माहिती द्याल का? म्हणजे मुंबईत कुठे , खर्च किती वगेरे...

( लिहण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, लिहण्याची जागा चुकली असल्यास क्षमस्व... )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुई मला मुंबईचे माहिते नाही पुण्यात डेक्कनला राठी कॉलेज म्हणून आहे तिथे अश्या प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात.
तसच पुण्यात अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज, शिवाजीनगर इथे शासनातर्फे लघुउद्योग करता येतील असे कोर्सेस शिकवले जातात जसे लँडस्केप डीझायनींग, फुलांच्या विविध रचना, ड्रेस डीझायनिंग आणि शिवणकाम इ. तिथे ज्वेलरी मेकींगपण असू शकेल. हे कोर्सेस ४-६ आठवड्याचे असतात. फी पण परवडणारी असते.
मुंबईतल्या अश्या कोर्सची माहिती इतर कोणीतरी देतीलच.
तुम्हाला हे घरच्या घरी शिकायचे असेल तर इंटरनेटवर वेगवेगळ्या साइट्स, यु ट्युबवरचे व्हिडीओ इ. बघून शिकता येईल.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इन्ड्स्ट्री. महिला विभाग. काला घोडा, लायन्स गेट जवळ. येथे नियमित पणे स्त्रियांसाठी असे कोर्सेस घेतले जातात. अगदी मामूली फी असते ( इतर जागांच्या मानाने) चेंबरच्या ऑफिस मध्ये फोन केल्यास नक्की माहिती मिळेल.

जुइ तु पेपर मध्ये छोट्या जाहिराती येतात त्या चेक कर. कदचित तुझ्या घराजवळच तुला काहीतरी मिळेल.

धन्यवाद सगळ्यांना...
अश्विनीमामी नंबर मिळेल का ?
माझ्या मैत्रीणिने विचारलेले , आणि मला देखील शिकायचे आहे.

जुई, खादी ग्रामोद्योग (शिंपोली, बोरीवली) ईथे बरेच कोर्सेस घेतले जातात. चौकशी कर, त्यांची वेबसाईट आहे.