शिवजयंती

Submitted by चप्पलचोर on 19 February, 2010 - 06:57

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

"निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"
- समर्थ रामदास

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥

- महात्मा फुले!

असे ज्यांचे वर्णन केले जाते, ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज! अशा ह्या युगपुरुषाला अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

ज्यांनी आम्हाला स्वाभिमान दिला अशा पर्वतासारख्या त्या खंबीर राजाला एकदा स्मरण करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ...

अठरापगड जातींच्या आणि तितक्याच भिन्न विचारांच्या, विखुरलेल्या मराठी समाजाला एका छत्राखाली आणुन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मुहुर्त साधुन तमाम मायबोलीकर जाती-पातीच्या बंधनातुन बाहेर पडणार आहेत कां?

त्या मार्गाने टाकलेलं आजच पाउलच महाराजांसाठी मानाचा मुजरा ठरेल...

जय महाराष्ट्र!!!

अठरापगड जातींच्या आणि तितक्याच भिन्न विचारांच्या, विखुरलेल्या मराठी समाजाला एका छत्राखाली आणुन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मुहुर्त साधुन तमाम मायबोलीकर जाती-पातीच्या बंधनातुन बाहेर पडणार आहेत कां?

त्या मार्गाने टाकलेलं आजच पाउलच महाराजांसाठी मानाचा मुजरा ठरेल...

>> वेल सेड राज!

जय शिवाजी!

ॐ नमः शिवाय
हा मन्त्र जपणे
आणि शिवस्मरण, शिवाजीची आठवण काढणे....
दोन्ही गोष्टी मजकरीता एकच!
लया च्या देवावरती अर्घ्य म्हणून स्वतच्या रक्ताचिच धार धरून शपथ घेणार्‍या व झालेल्या/होत असलेल्या तत्कालिक लयातून स्वराज्याच्या नवनिर्मितीचा आग्रह शिवाकडे धरणार्‍या निखळ गोब्राह्मणप्रतिपालक हिन्दुत्ववादी शिवाजीस मानाचा मुजरा. Happy

अशा ह्या युगपुरुषाला अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!
--- अशा थोर कार्याला केवळ महाराष्ट्राच्या Sad चौकटीत बसवणार ?

ज्यांनी आम्हाला स्वाभिमान दिला अशा पर्वतासारख्या त्या खंबीर राजाला एकदा स्मरण करूया.
--- अगदी शुन्यातुन, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत निर्मीती केलेली आहे. शिवाजी महाराजांना माझे वंदन.

शिवाजी महाराज सर्वांचे आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाबाबत मनात कुठलीही शंका नाही. त्यांच्या विषयी सार्थ अभिमान आहे. त्यांच्या नावाचा उपयोग सर्वांच्या कर्तबगारीला प्रेरणा मिळण्यासाठी व्हावा, हिच सदिच्छा!!!
जय जिजाऊ!!!! जय शिवाजी!!!!!!!