मध्यंतरी मला मैत्रीणींच्या ग्रुप मधे खुपच निवडुन टाकल्यासारखे वाटायला लागले. काय बोलतात एकमेकींशी तेच कळायचे नाही. बरे म्हणावे मला कळाले नाही तर आपले अज्ञान दाखवावे लागणार. 
खालील वाक्य एकली की खरच मैत्रीनी बदलल्या आहेत असे वाटायचे. कधी कधी तर यांनी पुर्ण लाज सोडली आहे असे वाटे. बघा तुम्हाला पण माझे म्हणने पटेल. कंसात माझ्या मनात आलेले विचार लिहीले आहेत.
मैत्रीण : "मला मेल कर."
(आता ही काय जादुगार आहे का फिमेल ची मेल करायला)
मैत्रीण : "तुझ्या ऑफिसात नाही ना ग हॉटमेल नी जीमेल वर बंदी?"
(:अओ:)
मैत्रीण : "बॉस आला की मी नेटची विन्डो बंद करते. उगी स्मायली पाहुन भडकायचा"
(पण मी म्हणते कशाला खिडकी उघडी ठेवायची)
मैत्रीण : "मला सर्फींग आवडते"
(वर्क चे वर्कींग तसे सर्फ चे सर्फीग असेल.. माझ्या डोळ्यासमोर दिप्ती नवल आणि फारुक शेख आले चश्मेबद्दुरमधे साबनाचे फुगे खेळताना)
मैत्रीण : "माझ्या नेटला प्रॉबलेम आहे... कॅफेत जाउन येते जरा."
(त्यासाठी कॅफेत जायची काय गरज
गुड नाईट लावले की झाले)
मैत्रीण : "तु नळी वरचे गाणे आहे"
(आजी चिडल्यावर "यडी फुकणी" म्हणायची ते आठवले..नळी म्हणजे मॉडर्ण फुकणी असेल)
मैत्रीण : उद्या १० वाजता ये चॅटीगला.
(आता १० ही काय चॅट खायची वेळ आहे)
तुम्हीच विचार करा असे हे बोलणे एकले की मला माझा चेहरा नॉर्मल ठेवायला किती कष्ट पडत असतील. पण काही दिवसात माझ्या लक्षात आले हे काहीतरी इंटरनेट संदर्भात आहे. मग मी निश्चय केला आपण पण इंटरनेट शिकुन घ्यायचे.
आता शिकायचे म्हणजे कुणाला गुरु करावे हा मोठा प्रश्न. तसे गुरुंची कमी नव्हती, नवरा, मुलगा, मैत्रीणींपैकी कुणीतरी. पण मला माझी टिंगल केलेली चालणार नव्हती. मग त्यातला त्यात बरा पर्याय म्हणुन मुलाला निवडले.
बरेच वर्षात नविन काही शिकले नव्हते. मुलाला मात्र अभ्यासावरुन नेहमी पिदडायचे. सगळा वचपा काढला त्याने. माकडाच्या हातात कोलीत म्हणतात ना तसे झाले. शेवटी कसेबसे त्याने मला इमेल कसे करायचे, रिप्लाय कसा द्यायचा हे शिकवले. मग मी एटीत सगळ्यांना माझा इमेल आयडी दिला. मैत्रीणींनी पण मला मस्त मस्त इमेल केल्या. कविताने एक रेसीपी पाठवली. नाव जरा विचित्रच होते "नानबा स्पेशल पोह्यांची उकड".
उद्या सोसायटीचा भोंडला म्हणुन हा वेगळा पदार्थ करायचा ठरवला प्रसादासाठी. आणि कविताच्या इमेललाच रिप्लाय करुन तिला सांगितलासुध्दा माझा बेत. संध्याकाळी माझा प्रसाद ओळखायची वेळ आली तेव्हा सगळ्या एका सुरात ओरडल्या "नानबा स्पेशल पोह्यांची उकड". मी पुरती गोंधळुन गेले. मला कळेना या सगळ्यांना माझा मेनु कसा कळाला
मग एकीने मला सांगितले मी रेप्लाय तु इमेल करायच्या एवजी रेप्लय टु ऑल केले म्हणुन माझी इमेल त्या सगळ्यांना मिळाली होती. 
सहिये........
सहिये........
मस्त!
(No subject)
अरे हे मिसलं होतं मी. मस्त
अरे हे मिसलं होतं मी.
मस्त वर्षू, मी पण साबांना चॅटींग चे धडे दिले आहेत. ते आठवलं 
माई पन तेच गत होति आता जरा बर
माई पन तेच गत होति आता जरा बर हाय
कंसातल्या
कंसातल्या कमेन्ट्स.......सुपर्ब
मस्त! अजून मोठा लेख असता तरी
मस्त!
अजून मोठा लेख असता तरी चालला असता.
आज वाचले हे. मस्तच!
आज वाचले हे. मस्तच!
Pages