प्रिय वड्या,
चटणीचा प्रेमपुर्वक नमस्कार वि.वि.
एका डोळ्याने का होईना, पण गरम गरम तेलात जीव तळला जात असताना तूझं लक्ष मात्र एकटक त्या मिक्सरवर असतं.
मला घिरडले जात असताना तुझ्या जीवाची होणारी घालमेल पाहीलेय मी, माझ्या आधी घिरडण्याचा हाच अनुभव घेतलायसं तू कित्येकदा
तुला भावना आहेत अन् जाणीवही हे मनापासुन जाणवलं, तुझ्या ह्याच गुणांवर तर भाळले मी,
आणि तेव्हापासुन वडा-चटणी वडा-चटणी हे नातं जगजाहीर झालं.
हां, कळलं सर्वांना हे एकार्थी बरचं झालं, या विचारानं मन आनंदात न्हालं
पण नेमकं तेव्हाच आपल्या प्रेमात सांबार कडमडलं, अन् आपल्या प्रेमाचा त्रिकोण झाला.
मी केवळ चटणीचा हे तू तिखट सांबारास कधी सांगुच शकला नाहीस, तरीही सांबाराला न कळता आपण एकत्र यायचं, रहाचयं असं ठरवलं
पण तूच कधी कधी त्या सांबारा बरोबर असायचास हे ही माझ्या कानावर आलं.
म्हणूनच तू नक्की कोणाचा चटणीचा की सांबाराचा असं सांबाराच्या समक्षच विचारलं
तू उत्तर देणारच होतास अन् अचानक एक ऑर्डर आली - `एक वडा चटणी सांबार'
तुला एका ताटलीत अन् आम्हाला दोन वेगळ्या वाटीत घेऊन वेटरनं आपल्याला गिर्हाईकाच्या टेबलावर नेऊन सोडलं
तरीही तुझं खरं प्रेम कोणावर याची उत्सुकता होतीच, शेवटी ते गिर्हाईकचं होतं थर्ड अंपायर
तुझ्या डो़क्यावर सांबाराला ओतून तुमचं नातं एकरूप होताना पाहीलं, मनात सांबाराविषयी रुसवे फुगवे तयार झाले. पण कधी कधी मीच असले की सांबारावरचा राग शांत व्हायचा.
तेव्हापासुन तू कधी चटणीचा तर कधी सांबाराचा , अर्थात मवाळ झालास की चटणीचा अन् जहाल झालास की सांबारचा. तर कधी कधी दोघांचाही ... आणि गुणगुणत राहायचास फिल्मी विडंबन `चटणी का भी वडा वो तो सांबार का भी वडा'
ह्या त्रिकोणाच्या लढाईत दिलासा दिला तो आपल्या यादीत शिरून चौकोन करणार्या इडलीने
इडली आल्यापासुन मी आणि सांबार एकमेकांना समजून घेऊ लागलो.
पण सरड्याची धाव कुंपणापर्यंत ... गिर्हाईकाच्या घशात वारंवारं घिरडत घिरडत आपण सर्वचं शेवटचं क्षण मोजतो आळीपाळीनं.
तेव्हा आपली भेट ही होईल अन् ताटातूट ही ... हे आता मनाने पक्क ही केलं
आज ही आपली ही दंतकथा जो जो ऐकतो त्याच्या मेंदुला झिणझिण्या येतात ... म्हणून तुला कदाचित मेंदूवडा म्हणतात
अन आम्हाला चेटणी, सांभार, इटली अशी नावं पडली.
बरं पुन्हा भेटूच. हो, पण हे पत्र त्या इडली आणि सांबाराला दाखवू नकोस, नाहीतर आपली साथ कायम सोडून डोसा पक्षासी यूती करतील. कारण राजकारण कोणाला चुकलंय, भीती एकच वाटतेय त्यांनी मला जर त्या पक्षात कायमचं ओढलं तर तू अगदीच एकटा पडशील आणि मग ढाळत बसशील अश्रू अर्थात एका डोळ्यानं ... अरे, रडतोयस काय ... गंमत केली ... आपण असं होऊ द्यायचं नाही.
कारण आपण असं केलं तर आपली येणारी पिढी नवा प्रांतवाद सुरु करेलं ... मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय ?
`एक वाटी चटणी ' - चल, येते मी मला ऑर्डर आलेय. ऑर्डर येईपर्यंत तू ही काळजी घे स्वतःची.
विथ लव,
- तुझी चटणी
- देवनिनाद
वा आचारी... मस्त बेत आहे बर
वा आचारी... मस्त बेत आहे बर का !
(No subject)
छान लिहले आहे पत्र..
छान लिहले आहे पत्र..
मस्त
मस्त
(No subject)
मजेशीर आहे.
मजेशीर आहे.
निनादराव... भलतेच फ़ार्मात
निनादराव... भलतेच फ़ार्मात हायसा राव !
लई झकास हो राव ..छानच लिहीलस
लई झकास हो राव ..छानच लिहीलस ..
डोक्यावर सांबार ओतुन ...
एक्श्ट्रा चटणी लावो
हे पत्र वाचुन मी म्हटलं आज
हे पत्र वाचुन मी म्हटलं आज चटणीला न्याय दयायचाच, गेलो हाटीलात आणि एक प्लेट मेंदुवडा मागवला, आणलेला सांबार परत पाठविला म्हटलं दोन प्लेट चटणी लाव, वेटर म्हणाला पुरेल का? की दोन हंडे भरुन चटणी आणू? कसला खुन्नशीने बघत होता तो सांबार माझ्याकडे....
कौतूक, अश्विनी, जूई, शॅकि,
कौतूक, अश्विनी, जूई, शॅकि, चिमूरी, प्रकाश, विशाल, अथक, वैभव
सर्वांचे मनःपुर्वक आभार
धन्यवाद आणि शुभेच्छा
देवनिनाद !!!
लई भारी भौ.. आवडलं...
लई भारी भौ.. आवडलं...
अरे वा! आवडलं हं. आता हे पत्र
अरे वा! आवडलं हं.
आता हे पत्र हाताने लिहून संयोजकांना पाठवल असत तर.?
अरे वा बेत मस्त जमलाय.
अरे वा बेत मस्त जमलाय.
अनिलभाई, आर्च,
अनिलभाई, आर्च, आऊटडोअर्स
सर्वांचे मनःपुर्वक आभार.
धन्यवाद आणि शुभेच्छा
देवनिनाद !!!
एक प्लेट ईडली, वडा \ चटणी ,
एक प्लेट ईडली, वडा \ चटणी , सांबार लाव !
मस्त रे
श्री प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक
श्री प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार.
धन्यवाद आणि शुभेच्छा
देवनिनाद !!!
केवळ आणि केवळ
केवळ आणि केवळ लाजवाब.........!!!