आजकालच्या 'एक ग्रॅम-गोल्डन नेकलेस' आणि 'इमिटेशन ज्वेलरी'च्या काळात 'बावनकशी सोन्याचा चपलाहार' दुर्मिळच झालाय! 'हार'च कशाला घेऊन बसता? 'सोनंच' महाग झालंय म्हणा ना..
कितीही 'टुकार' सिनेमा असला तरी 'वन टाईम सी' आहे असे म्हणत बघण्याच्या आजच्या काळात आत्ताच 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहिला आणि थेट 'बावनकशी सोन्याचा चपलाहार'च आठवला!
कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत...
म्हणजे खरंच नाहीत.
अख्खा सिनेमा संपेपर्यंत बसल्या जागेला माणुस खिळुन राहिलेला.
कुठेच 'रॉकेलचा वास' नाही हो या 'साखरेला'... खरंच....
आणि गोड, गोड साखर! वाह!
'ते, अमुक-अमुक होतं, ते असं नाही करायला हवं होतं.... '
'बाकी सारं ठिक आहे, पण ते तमुक-तमुक जे होतं ते काही नाही पटलं.... '
'जाउद्या हो.. आपला मराठी सिनेमा आहे. थोडं घ्या सांभाळुन...'
अशा कसल्याही कुबड्यांची जराही गरज नाही इथे!!!
नट-नट्या, दिग्दर्शक, संगीतकार, सेटवाले, जे कोणी असतात या कामात, सर्वांचेच 'प्रचंड' कौतुक करायला हवे.
जुना काळ अगदी जसाच्या तसा उभा करुन दाखवलाय!
आणि शेवटी दस्तुरखुद्द 'जादुगार केळफा'.
तो काळ, तेव्हाची परिस्थिती, त्यांनी घेतलेले 'परिश्रम', अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही त्यांना मिळालेली त्यांच्या पत्नीची साथ आणि या सार्याचं मुळ, त्यांचं 'ध्यासपर्व'!
'एखाद्या गोष्टीचा 'ध्यास' घेतला की कुठलीही गोष्ट आड येऊ शकत नाही', याचं उत्तम उदाहरण इथे दिसलं..
'सोन्याचा हार' तर उत्तमच बनलाय. पण याचं मुळ श्रेय त्या 'बावनकशी सोन्यालाही' आहेच की!
त्यामुळं, हा 'हार' म्हणजे त्या 'सोन्याला मानाचा मुजराच' आहे म्हणायचा!
फाळके, 'भारतीय सिनेमाचे जनक'. आपल्या १९वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शंभराहुन अधिक सिनेमे बनवले.
त्यांच्या या कार्यामुळेच आज दर वर्षी जवळपास ९०० चित्रपट, २० भाषांमधे बनवले जातात...
... जिथे ३०लाख लोकांना रोजगार मिळतो.
भारतीय सिनेमा ही जगातील सर्वात मोठी सिनेसृष्टी आहे.
* इतका सुंदर सिनेमा पाहिल्यावर "'चित्रपट कसा वाटला' मधे याची नोंद करुन सोडुन द्या" असं करावसं वाटलं नाही, म्हणुन स्वतंत्र लिहीलं....
* जवळजवळ १२:३० होऊन गेलेत, पण खरंच... झोपच उडालीये!
* (संदर्भ : साखरेला रॉकेलचा वासः - रेशनच्या साखरेला कधी कधी रॉकेलचा वास लागतो.
पण साखर चांगली असते.... म्हणुन तशीच वापरतात साखर... )
त्या आजींचे डायलॉग्ज पण सह्ही
त्या आजींचे डायलॉग्ज पण सह्ही झालेत! नंतर कळाले की त्या माझ्या काकूला औरंगाबाद येथे शाळेत शिकवायच्या. <<
त्या आज्जी म्हणजे विदुला जवळगेकर जाम उत्साही आहेत. 'वॉटर' मधे पण होत्या. नवीन शिकण्याचा त्यांचा ध्यास आपल्यातल्या कुणालाही लाजवेल इतका सही आहे.
थँक्स नी... त्यांचे नाव आठवतच
थँक्स नी... त्यांचे नाव आठवतच नव्हते बघ, पण त्यांना माझ्या काकूचे नाव ती जेव्हा अनेक वर्षांनी त्यांना पुन्हा भेटली तेव्हा मात्र व्यवस्थित आठवत होते. असे लोक पाहिले की खरोखरीच स्वतःची लाज वाटते. त्यांचे चित्रपटातील काम छोटेसेच आहे, पण ठसक्यामुळे छान लक्षात राहते.
>> विनोदी पद्धतीने प्रसंग
>> विनोदी पद्धतीने प्रसंग घेणे म्हणजे गांभिर्य कमी करणे
अजिबात नाही.... पहा Life is Beautiful
त्याचे जे काही हाल झाले (असतिल), त्यानी हे काही धाडस केलं (होतं) त्याची कल्पना (केली तर) तुम्हाला येतेच ना... मग मुद्दाम सगळं पडद्यावर का दाखवायचं? (साउथच्या सिनेमांसारख!!)
(फाळक्यांच्या बायकोने एकदा विरोध केला असेलह पण दहादा साथही दिली ना... मग तो एकच विरोध का दाखवायचा?)
.. "चिडलोक का मी?" हे जे फाळके चिडुन ओरडतात ते जबरा!!!
आज्जींचा एक डायलॉग मला जाम
आज्जींचा एक डायलॉग मला जाम आवडला. आम्ही तर सारखा वापरतो तो हल्ली...
अग अटक होइल... टिळकांसारख मंडालेला पाठवतील.
मला हा पिक्चर आणि फाळके
मला हा पिक्चर आणि फाळके पाहताना, काही सीन्स पाहताना खूप चार्ली चाप्लीनची आठवण झाली. (विशेषतः मधे काही सीन्स अगदी मूकपटासारखे आहेत. फाळकेंची वेशभुषासुद्धा थोडी चाप्लिनसारखी वाटली.. मिशी, कपडे वगैरे..)
आत कितीही संघर्ष्/त्रास असला तरी वरून हसतमुख , मिष्किल जादूगार केळफा .
बस्के इथे जेव्हा ह.फॅ. चा खेळ
बस्के
इथे जेव्हा ह.फॅ. चा खेळ आयोजीत केला होता तेव्हा परेश मोकाशीपण हजर होते. सिनेमानंतर त्यांनी काही प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्यांना हा चार्ली चॅपलीनची आठवण येते तो इफेक्ट मुद्दाम आणला गेला का असे विचारला होता, त्यावर त्यांना नाही असे उत्तर दिले. त्यांनी सांगीतले की सिनेमा तयार करतांना त्यांना स्वतःला असे काही वाटले नाही/जाणवले नाही. पण सिनेमा बघीतल्यावर मात्र बर्याच लोकांनी त्यांना काही प्रसंगी चार्ली चॅपलीनची आठवण येते असे सांगीतले.
हा सिनेमा मेलोड्रामॅटीक, इमोशनल, सगळीकडे खूप गरीबी दाखवुन सहानुभूती मिळवत नाही, जो की असा सहज करता आला असता, परेश मोकाशींनी ते करायचे टाळले, त्यांनी तो हलका फुलका चित्रीत केला म्हणून मला आवडला. चार्ली चॅपलीनने आपले सिनेमा विनोदी ढंगाने चित्रीत केले होते म्हणजे ते फक्त आणि फक्त विनोदी आहेत असे नाही. तसच काहीस मला ह.फॅ. बद्दल वाटले.
मलापण हा चित्रपट आवडला. खुपसा
मलापण हा चित्रपट आवडला. खुपसा सरळ साधा, रडारड नसलेला आणि मुख्य म्हणजे हलका फुलका चित्रपट वाटला मला.
हा सिनेमा पाहील्यापासून
हा सिनेमा पाहील्यापासून फाळकेंच्या मुलामुलींनी किंवा पुढे त्यांच्या वंशजांनी काय केलं काय करताहेत याची एक उत्सुकता लागून राहीली आहे? कुणाला माहीती आहे का काही? तसेच परेश मोकाशीने हा चित्रपट कुठल्या पुस्तकावरुन काढलाय?
खुपच छान चित्रपट ...... >>>
खुपच छान चित्रपट ......
>>> पहा Life is Beautiful <<<
सॅम, मलाही याच चित्रपटाची आठवण झाली.
अजुन पाहिला नाहिये हा
अजुन पाहिला नाहिये हा चित्रपट.. पण ज्यांनी ज्यांनी पाहिलाय त्यांच्याकडुन भरभरून ऐकतोय या चित्रपटाबद्दल.. तेव्हा आता पहाणारच लवकर..
आताच पाहिली ही फॅक्टरी..
आताच पाहिली ही फॅक्टरी.. अप्रतिमहे काम आह सर्वाचेच..
"असं बोलतात का आंधळयाला?". माझा तूफान आवडलेला संवाद.
रुयाम, येव्ह्डी स्तुती चालली
रुयाम, येव्ह्डी स्तुती चालली आहे तर नक्की पाह्तो
नितीन मित्रा, मी लिहीलेला एक
नितीन मित्रा, मी लिहीलेला एक अन एक शब्द खरा आहे

मी उगाच कधीच कशाचं कौतुक करत नाही. अप्रतिम आहे , जरुर बघ
आतिशय अप्रतिम चित्रपट.
आतिशय अप्रतिम चित्रपट. प्रत्येकाने जरूर पहावा आणि सिनेमाग्रुहातच.
सगळ्यांना अनुमोदन. मस्त
सगळ्यांना अनुमोदन. मस्त चित्रपट. मस्ट वॉच. त्यांचा आणि पूर्ण कुटुंबाचा पॉझिटीव्ह अॅटीट्यूड जबरदस्त होता!
चित्रपट खूप आवडला. कालच
चित्रपट खूप आवडला. कालच पाहीला.
दादरला जंगल?

अरे हे इतके दिवस कसे वाचले
अरे हे इतके दिवस कसे वाचले नव्हते?
सिनेमातला मला सगळ्यात आवडलेला सीन, कॅमेरामन फाळक्यांना म्हणतो; 'शंकराच्या मागे फणसाचं झाड येतयं,त्यावेळी असतील फणसाची झाडं?' फाळके क्षणभरच विचार करुन म्हणतात,'ते जाउदे,गोष्ट महत्वाची!'- क्या बात है!
मला वाटतं ह्या एका वाक्यात भारतीय चित्रपटाचा सगळा इसेन्स उतरला आहे, कपडे,मेकअप,लोकेशन,रिसर्च,सेट यासर्वापेक्षाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कथा,ती जर उत्तम,पकडून ठेवणारी असेल तर आपले प्रेक्षकही इतर डीटेल्सकडे लक्ष देत नाहीत.
अमर अकबर अँथनीमधे ते तीघे निरुपा रॉयला रक्तदान करताहेत,तिघांचेही रक्त गुरुत्वाकर्षणाच्याविरुद्ध दिशेने वर टांगलेल्या बाटलीत जाते आणि तिथून या महामातेच्या अंगात,असा सीन आहे.या अशक्य प्रसंगाबद्द्ल मनमोहन देसाईंनी म्हटलयं, 'मला माहिती आहे की हे चूक आहे,पण लोक जेंव्हा हा प्रसंग पाहतात तेंव्हा ते ह्या कडे लक्षच देत नाहीत,कारण त्यांच्यासाठी आईपासून दुरावलेली तीन मुले तिलाच नकळत रक्त देऊन वाचवतात यातले प्रचंड नाट्य,मेलोड्रामा इतका भारावून टाकणारा असतो' मला वाटतं इथे देसाईदेखील फाळक्यांचाच मुद्दा मांडत आहेत-'गोष्ट महत्वाची'
saykot यांच्या या अभिप्रायात
saykot यांच्या या अभिप्रायात खूपच तथ्य आहे असं मला वाटतं -
" मलाही खुप आवडला हा सिनेमा.
आणि विनोदी ढंगाबद्द्ल एक असही वाट्लं की समजा तुम्ही तुमच्या आवडिची गोष्ट करत असाल आणि तुमच्या Passion साठी तुम्ही काम करत असाल तर ते Struggle पण एवढं हलकं फुलकं होऊन जात असेल. (direction point)
बाकी सिनेमा मस्तच."
मलाही वाटतं कीं रुळलेल्या वाटेने जाण्याची घृणा असणारा फाळकेंसारखा बुद्धीमान माणूस रुढीप्रिय समाजात विनोदाचं कवच घेतल्याशिवाय कांही साध्य करूं शकला असता ? अत्यंत मर्यादित बजेटमध्ये
इतक्या सहजसुंदर व प्रभाविपणे एक ऐतिहासिक घटना व पात्र सिनेमारुपाने पहायला मिळाली, हेच भाग्य.
कालच हा सिनेमा बघितला २ दा ,
कालच हा सिनेमा बघितला २ दा , खुपच छान सिनेमा
आज्जींचा एक डायलॉग मला जाम आवडला. आम्ही तर सारखा वापरतो तो हल्ली...
अग अटक होइल... टिळकांसारख मंडालेला पाठवतील >>>>> खुप हसलो या वाक्यांवर
अप्रतिम सिनेमा. आपण आंधळे
अप्रतिम सिनेमा. आपण आंधळे झालो याचं दु:ख नाही पण आता सिनेमा कसा करणार याचाच ते विचार करत होते ह्यातच त्यांच्या सगळ्या भावना व्यक्त झाल्यात.
खूप धन्यवाद ऋयाम, या
खूप धन्यवाद ऋयाम,
या चित्रपटावर कोणी कसे लिहिले नाही असे वाटत असतानाच हा लेख वाचला व खूप म्हणजे प्रचंडच समाधान वाटले. मला स्वतःला तरी या चित्रपटाबद्दल "या सम हाच" असे म्हणावेसे वाटते.
ज्या प्रकारे हा चित्रपट मांडला आहे ती पध्दत, पात्रयोजना, तो काळ दाखविणारे सेटिंग्ज, कथानक, पूर्ण विनोदी अंगाने मांडत असताना फाळक्यांच्या कर्तबगारीकडे अजिबात न झालेलं दुर्लक्ष - कशा कशाचे कौतुक करावे हेच समजत नाही.
चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, प्रसंग यावर एक एक लेख लिहिता येईल इतका अप्रतिम आहे हा चित्रपट.
या चित्रपटाची विनोदी पध्दतीने केलेली (पण मुख्य गोष्ट नजरेआड न करता) हाताळणी हा याचा आत्माच वाटतो. संपूर्ण फाळके कुटुंबियांना ज्या दिव्यातून जावे लागले आहे ते इतक्या उत्तम प्रकारे दाखवले आहे की बस्स. घरातील वस्तू विकणे, फाळक्यांचे डोळे खराब होणे, परदेशात अतिथंडीत त्यांचे कानाला रुमाल लावून फिरणे, मुलगा बेशुद्ध असताना तो सीन पुरा करणे - वानगीदाखल एवढेच देतो.
शेवट तर कळस आहे - ते हलती खेळणे -फाळके खेळणी म्हणून कौतुकाने हातात घेतलेला "हत्ती" -गजांतवैभव लाभलेली ही आताची मुख्य इंडस्ट्री व विस्तार दर्शवणारे हे प्रतिक- अहाहा ..........
हा संपूर्ण चित्रपट कितीही वेळा पहा - नवनवीनच कळत जाते - आपण सुखावत जातो.
दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ - सर्व टीमलाच सलाम........
ऋयाम, तुझे कसे आभार मानावे कळत नाहीत.........हॅट्स ऑफ!
(ते पूर्वीसारखे राजा - महाराजा असतो तर त्या सर्व टीमला अर्धे राज्य व तुला २ - ४ गावे इनाम दिली असती रे !)
मी, नवरा आणि ३ वर्षाचे पिल्लू
मी, नवरा आणि ३ वर्षाचे पिल्लू यांचा आवडता चित्रपट. आता ३ वर्षाचे पिल्लू एका जागेवर बसुन पहाते ह्यातच सर्व आले!!!!
> तसेच परेश मोकाशीने हा
> तसेच परेश मोकाशीने हा चित्रपट कुठल्या पुस्तकावरुन काढलाय?
ह्याचे उत्तर आपल्याला आम्ही परेश मोकाशी इथे २००९ मधे आले असतांना त्यांची मुलाखत घेतली होती, त्यात ~८:४५ मिनीटावर सापडु शकेल. उत्तर विस्तृत असल्यामुळे इथे लिहीता येत नाही.
Pages