एक अनोळखी नजर अशी मलाचं शोधत राही,
दिसेल ती कुठे कशी पण, मज ती चोरुन पाही.
घाबरलेली भेदरलेली अशी ती नजर होती,
मज पाहुनी झुडुपामध्ये हळुच लपत होती.
कोमल होते पाय तिचे अन् छाया गोंडस होती,
स्मरुनि ऊरे स्मरती ती अन् रेशमासंवे नाती.
कशी आली ती भूतलावर , स्वर्गलोकी नक्षत्रि,
मन झाले वेडे माझे बघुन अशी ही महती.
असाच मी स्तब्द राहिलो तीच्याकडे पाहत,
एक पाऊल पुढे जाहली ती,झुडुपा पाठूनि पाहत.
चोरटी ही तिची नजर आखेर माझ्यावर तरली,
जिंकले मी जग माझे अन् तिची मैत्री ऊरली.
ती होती एक गोड आनामीक वासरू त्या गाईचे,
होती सुंदर अन् सुंदर छाया प्रती तिच्या आईचे.
मित्र आहे मी तिचा आणि मैत्रिण ती माझी,
निशब्द होऊनि ती बोले मज् खेळ खेळूया साझी.
आठवणं येते तिची मज अन् डोळे पानावते,
आता कशी आसेल ती का मज पासुन दुरावते.
भेटेन मी तीला आता, मन माझे सुखावत होते,
नकळत काळ असा आला अन् क्षण्-क्षण् दुरावत होते.
पाहिले मी तिला आज एका दशकानंतर,
ओळखले तिने मला अन् हंबरली मी दिसल्यानंतर.
आहे माझी ती मैत्रिण अशी अन् मी तिचा मित्रं,
घट्ट बिलगलो मी तिला अन् कसे पाणावले हे चित्र........!
घट्ट बिलगलो मी तिला अन् कसे पाणावले हे चित्र........!
मी लहान होतो त्यावेळी,माझ्या
मी लहान होतो त्यावेळी,माझ्या आजीने मला अचानक घरी बोलावले. आजी म्हनाली "आपल्या गाईला वासरू झले आणि ती ही मुलगी". मी आनंदाने तिथे गेलो अन मला पहुन ते वासरू अचानक झुडपा पाठी लपले. ते हळुच चोरुन माझ्याकदे बघत होते... तिचं ती माझी मैत्रिण...त्यानंतर मी तिला तब्बल १० वर्षा नंतर पाहीले... मला वाटले ती मला विसरली असेल्.....पण....!
<< पाहिले मी तिला आज एका
<< पाहिले मी तिला आज एका दशकानंतर,
ओळखले तिने मला अन् हंबरली मी दिसल्यानंतर..! >>
याला मुक्या जनावराचे प्रेम म्हणतात.
तसेही प्रेम कशाला म्हणतात ते जनावरांकडून शिकण्यासारखेच.
खरं आहे गंगाधर
खरं आहे गंगाधर तुमचे......!
चोरटी ही तिची नजर आखेर माझ्यावर तरली,
जिंकले मी जग माझे अन् तिची मैत्री ऊरली.
अ - प्र - ती - म.
असे वाटते की कोना मुली बद्दल बोलत आहात... पण जशी - जशी कविता पुढे जाते खुप छान ऊतरते...
खुप छानं.....
खुप छानं.....