Submitted by प्रसाद शिर on 10 March, 2008 - 02:15
प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले
बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले
दु:खामधेच मिळते संधी पराक्रमाची, आयुष्य जिंकण्याची
जाणून घे तुझ्या तू हृदयी विवंचनांचे भांडार साचलेले
पेरून बीज येथे सोडून देश माझा गोरे निघून गेले
आता सभोवताली दिसतात सर्व काळे साहेब माजलेले
डोळ्यांत स्वप्न आहे, हातात हात आणिक हृदयी दिशा निराळ्या
गंमत अशी तरीही येथे सुखात सारे संसार चाललेले
संपून प्राण गेले जगतो तरी सखे मी आणून श्वास उसने
देतेस हात हाती इतक्याच तारणावर आयुष्य चाललेले
प्रसाद
www.sadha-sopa.com
गुलमोहर:
शेअर करा
वाह !!!
मस्तच प्रसाद. मस्त गझल, शेवटचा शेर सुंदरच आहे..
व्वा!
प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले
पेरून बीज येथे सोडून देश माझा गोरे निघून गेले
आता सभोवताली दिसतात सर्व काळे साहेब माजलेले
संपून प्राण गेले जगतो तरी सखे मी आणून श्वास उसने
देतेस हात हाती इतक्याच तारणावर आयुष्य चाललेले
वावा! हे शेर फार फार आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
प्रसाद :(
बोजड वाटली ही गझल, तुझ्या नेहमीच्या रचानांपेक्शा हे काहीतरी वेगळ आहे . साधं-सोप नाही (मला तरी)
बाहेरच्या जगाचे पचवून वीष
बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले
डोळ्यांत स्वप्न आहे, हातात हात आणिक हृदयी दिशा निराळ्या
गंमत अशी तरीही येथे सुखात सारे संसार चाललेले<<
व्वा