मायबोली चित्रपट महोत्सव, ११-१८ फेब्रूवारी २०१०. नागपूर

Submitted by अजय on 6 February, 2010 - 22:39

hoarding-2A.jpg

मायबोली चित्रपट महोत्सव

११-१८ फेब्रूवारी २०१०.
सुदामा सिनेमा,
धरमपेठ, नागपूर

संपर्कः ९७६६४९००८१

hoarding-1A.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या 'मेघे एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड' चा पहिला सिनेमा 'इरादा पक्का' सुद्धा दाखवला जात आहे ह्या चित्रपट महोत्सवात... ज्यातलं एक प्रमोशनल गाणं मी लिहीलं आहे... 'आता मागे न जाणे... पुढे पहाणे इरादा है पक्का' ह्यात २० सेलीब्रिटी कपल्स आहेत... जसे श्रेयस तळपदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, संदीप कुलकर्णी इ. १२ फेब्रुवारीला हा चित्रपट दाखवला जात आहे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे.

छानचं! पण 'मायबोली' नी हे कसे केले ते कळेल का आणि कुठले चित्रपट आणि प्रयोग दाखविण्यात येतील त्यांचे नावे कळतील का?

११ ते १फेफेब्रुवारी असा हा चित्रपट महोत्सव आहे. हरिश्चंद्राची फक्टरी, रिटा, इरादा पक्का, शिक्षणाच्या...., गैर, जोगवा, झेंडा, सुखांत, नटरंग, विहीर, रिंगा रिंगा, ... असे विविध चित्रपट दाखवले जात आहेत. नागपूरकरांसाठी मोठी मेजवानीच !

शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभार.

मजा आहे नागपुरकरांची..............
पुण्यात पण हवा....... हो ना पुणेकर मंडळी???????????????

लई भारी! घरी कळवलं पाहिजे. (स्थानिक पेपरात जाहिराती येत असाव्यात, तरी.)

सरोज टॉकीजचं 'सुदामा' झाल्याला युगं लोटली तरी आजही 'सुदामा' म्हणजेच सरोज हे डोक्यात यायला वेळ लागला. Happy

वा! Happy

खूपच छान ! इथे US मध्येही पाहिजे असे काहीतरी. एखाद्-दुसरा अपवाद वगळता मराठी चित्रपट इथे theatreला जाउन बघणे होत नाही.
शुभेच्छा !!

बंगलोर मध्ये पण पाहिजे........
(भ्या........... भोकाड काढणारी बाहुली)
कैक वर्षे झाली मराठी चित्रपट बघून. Uhoh

छान Happy

सही... धरमपेठ नाव जरी दिसले कि मन थेट नागपुरला जाते. काँलेज के दिन, जंक फुड, शंकर नगर चौकत पहाटे ४.०० ला गरम चहा, पोहे मिळायचे... अभ्यास करतान्नि कंटाळा/झोप आली कि सरळ शंकर नगर चौक... कोइ लौटादे मेरे बिते हुये दिन...

Pages