ब्रिटाटा (अर्थात अंडे घातलेल्या बटाट्याच्या काचर्‍या)

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2010 - 14:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मोठा कांदा
१ मोठा बटाटा
आलं, लसूण, मिरची वाटून - १ चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
२-३ अंडी
मीठ

क्रमवार पाककृती: 

कांद्याच्या तिरप्या खापी आणि बटाट्यांच्या काचर्‍या चिरून घ्या.
तेलावर हिंग, हळदीची फोडणी करा.
त्यावर आधी कांदा घालून परता. त्यावर आलं-लसूण-मिरची वाटण आणि गरम मसाला घालून परता. तेल सुटायला लागलं की काचर्‍या घालून परता. चवीनुसार मीठ घाला.
आधणाचं झाकण ठेवून अधूनमधून परतत काचर्‍या शिजवून घ्या.
काचर्‍या पूर्ण शिजल्या की त्यावर अंडी फोडून घाला. आता परतायचं नाही.
झाकण ठेवून मंद गॅसवर अंडी शिजू द्या.
अंडी शिजली की भाजी झाली.
आता गरम पोळी/फुलक्यांबरोबर खा किंवा ब्रेडमधे सँडविच करून.
(खायला घेताना प्रत्येक सर्व्हिंगसाठी तळापासून चमचा खुपसून खाली जमलेली किंचित खरपुडी, भाजी आणि त्यावर एक हाफ-फ्राइड अंडं असं उचलायचा प्रयत्न करा.) Happy

britata.jpeg

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

मीठमसाले आणि अंडी आवडीनुसार कमीजास्त करा.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह.. हेच का ते तिथे वाहुन गेलेल ब्रिटाटा?
चांगली सोपी रेसिपी आहे. ब्रेड बरोबर छान लागेल.

मस्तच आहे .. लवकरच केली पाहिजे
धन्यवाद स्वाती ...(आमच्या सारख्यासाठी अशाच सोप्या पाककृती लिहित जा Happy )

आज मी केली लगेच ब्रेकफास्टला. मस्त झाली. वृत्तांत टाकलाय यो.जा.

ब्रिटाटाची कृती बाईबिबाश्टाईल टाकली असती तर बहार आली असती. हो की नै नंद्या Proud

आज लगेचच करून पाहिली. छान झाली. मुख्य म्हणजे लेकीनेही खाल्ली. नाहीतर ती उकडलेल्या अंड्याखेरीज अंड्याचा दुसरा पदार्थ खात नाही. पण तिनेही भाजी खाल्ली आवडीने.

मस्तच आहे ही कॄती ! आज-उद्यात करुन बघते. एक अत्यंत मूर्ख प्रश्न. अंडी त्या शिजलेल्या भाजीवर फोडून घालायची असं दिलं आहे. म्हणजे ऑम्लेटला करतो तशी एकत्र फेटून ते मिश्रण ओतायचे की बलक आणि पांढरे जसेच्या तसे ठेवून. दोन्ही प्रकारे चव थोडी वेगळी लागेल म्हणून विचारले.

एकत्र करुन नाही. फोडुन टाकायची सरळ भाजीत.

काचर्‍या पूर्ण शिजल्या की त्यावर अंडी फोडून घाला. आता परतायचं नाही.

अगं फ्रिटाटामध्ये अंडी फेटून घेतलेली असतात म्हणून विचारले. स्वाती, आत्ता लगेच केला ब्रिटाटा. यावेळी अंडी फेटून ते मिश्रण ओतले भाजीवर. मस्तच झाला आहे. कांदा, बटाट्याची सुरेख चव आली आहे. पुढच्यावेळी वरुनच अंडी फोडून घालेन. मला ते नुसते पांढरे ऑम्लेट आणि मधून डोकावणारा पिवळा गोल खूप आवडतो. तसं शिजवलं की उकडलेल्या अंड्यातल्या बलकासारखा शिजतो तो. ते आवडतं. अर्धवट शिजवलेला पिवळा बलकही खूपच आवडतो.

एक बावळट प्रश्न पण मला माहीती नाही म्हणुन विचारते बटाटाच्या काचर्‍या म्हणजे नक्की काय? कसा चिरायचा बटाटा???

मी केलं काल. मस्त होतं! ब्रेडमध्ये सँडविच करून तर मस्तच लागतं. Happy
पण मीही न वाचताच अंडी फेटून घातली.

बर्‍याच जणांनी विचारलेलं दिसलं म्हणून :

मी अंडी फेटत नाही. मलाही अगोप्रमाणेच अंडी हाफ-फ्राय टाईप शिजलेली आवडतात. पण हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. आवडत असेल त्यांनी फेटून घालावीत. (मग बहुधा भुर्जीप्रमाणे परतावी लागतील.)

शँकी, मला अंड्याच्या वासाचं अजिबातच वावडं नाही, त्यामुळे उत्तर देणं कठीण आहे. मसाल्यांमुळे थोडाफार दबतो वास, पण ज्याला नाही आवडत त्याला येत असेलच मला वाटतं.

रैना, आलीच आहेस तर नुसत्या काचर्‍या करून बघ मग. Proud

शिल्पा, काचर्‍या म्हणजे एका बटाट्याचे चार भाग करायचे आणि प्रत्येक भागाच्या पातळ स्लाइसेस चिरायच्या.

कालच ब्रिटाटा केल.. ब्रेड बरोबर मस्तच लागल. मी स्वाती म्हणत्ये तशी अंडी न फेटताच टाकली.. मलाही तसल अर्ध शिजलेल अंड आवडत.

मी पण केलं वीक एंडला. मस्तच एकदम. हिरवी मिरची ऐवजी कोथिंबीरीच्या चटणीचा लेयर दिला आणि अंडी फेटून घातली Happy

या रेसिपीने बर्‍याचदा ब्रिटाटा केला आहे. तेव्हा प्रतिसाद दिला होता असं आता आठवतय.. इथे का दिसत नाही कुणास ठाऊक Happy साधी सोपी सुटसुटीत होणारी रेसिपी आहे.

मी आलंलसूण पेस्ट वापरत नाही. त्याऐवजी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला (कोल्हापुरी चटणी म्हणतात ते) घालून करते. मस्त झणझणीत होतो.

ब्रंच आयटम चांगला आहे! असाच पारसी पदार्थ आहे असे आठवतय, पण मला वाटते त्यात बटाटा वेफर्स वर अंडे घालतात. फोटो दोन्ही मस्त!

याचं कांदा टोमाटो पेपर्स वालं वर्जन (Shakshouka शाक्षूका) केलंय
बटाटा कांदा असलेला स्पॅनिश तोर्तिया द पाताता पण बऱ्यापैकी केलं जातं
एकदा रोस्टेड पटेटो हॅश विथ एग्ज ऑन टॉप पण ट्राय केलंय

पण बटाट्याच्या काचाऱ्यांवर एग घालून ब्रिटाटा करून बघायला हवं...

Pages