मायबोलीवरील लेखन तुम्ही कसे शोधता??

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

"देव एक आहे आणि त्याच्यापर्यंत जाण्याचे मार्ग अनेक आहे" असं जे म्हटलं जातं त्याचप्रमाणे मायबोलीवरील लेखन एक (तेच) आहे आणि त्यापर्यंत पोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. Happy

तर हे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी तुम्ही कुठला पर्याय वापरता? इतर मार्गांची तुम्हाला माहिती आहे का? मायबोलीवर येताना कींवा आल्यावर तुम्ही प्रथम कुठला दुवा बघता. जुने लेखन कसे शोधता? मायबोलीवर दरवेळी आल्यावर नवीन लेखन्/प्रतिसादासाठी सर्वप्रथम तपासले जाणारे तुमचे काही ठरावीक दुवे आहेत का?

मायबोलीवर बरंच काही आहे पण तीथपर्यंत पोचायचं कसं हे नेमकं माहीत नसल्याने बरेच धागे तुमच्या नजरेतून सुटले असतील. या चर्चेचा हेतु हा आहे की सर्वांना हे विविध मार्ग जर कळले तर साहित्य शोधणं सोपं जाईल.

विषय: 
प्रकार: 

मी पार्ले बीबी वर जातो , तीथे इतरत्र काय "निवडक" चाललय त्याचा अंदाज येतो Happy किंवा त्या नोड चे आकडे मिळतात Happy , कधी तरी नविन लेखन वर जाउन सुद्धा बघतो
काही दिवस हि लिंक चालत होती ती बंद झालेय
http://www.maayboli.com/top10forall

ते search नेहमी नीट चालतेच असे नाही. बर्‍याच वेळा काथ्याकूट केल्यावर मिळते. माझ्या जुन्या पाउलखुणा शोधते १० -१२ पाने.

मी प्रथम पाऊलखुणा मध्ये जाते. पण तिथे नविन लेखन शक्यतो दिसत नाही.
नविन लेखन मध्ये, माझ्यासाठी नविन, ग्रुपमध्ये नविन, आणि संपुर्ण मायबोलीवर नविन.. या धाग्यांमध्ये नविन लिखाण दिसते, मग गुलमोहरावर चक्कर, मग रंगिबेरंगीवर...
हितगुज वर नविन लिखाण शोधण्यासाठी सर्व ग्रुप मध्ये चक्कर मारावी लागते.
जुन्या मायबोलीत, ग्रुपमध्ये नविन धागा उघडला असेल तर त्याच्या पुढे "नविन" असं चिन्ह दिसायचं....

पाटील,

>> काही दिवस हि लिंक चालत होती ती बंद झालेय http://www.maayboli.com/top10forall

निवडक १० च्या ऐवजी ही लिंक आता बदलून http://www.maayboli.com/top20forall निवडक २० केली आहे. हा दुवा लक्षात ठेवायची गरज नाही. नवीन लेखनवर गेलात की त्याखालीच "निवडक लेखन" हा दुवा (submenu) आहे.

मी मायबोलीवर गेल्यावर मुखपृष्ठावर एक नजर टाकून नवीन लेखन मध्ये जाऊन वाचते.

मीही मुखपृष्ठावर नजर टाकून 'नवीन लेखन'मध्ये जाते. पण आधी 'नवीन लेखन'पेक्षा मला 'माझ्यासाठी नवीन' वाचायचे असते, कारण ते माझ्या ग्रूप्समधलं लेखन असतं. मी ते ग्रूप्स जॉईन केलेत ते अर्थातच मला तिथे काय चालू आहे त्यात जास्त रस आहे म्हणून. त्यामुळे ती लिंक माझ्यासाठी जास्त सोयीची आणि महत्त्वाची आहे. पण 'माझ्यासाठी नवीन'मध्ये मला थेट जाताच येत नाही! Sad

ही 'माझ्यासाठी नवीन'ची लिंक आधी उजवीकडे 'माझे सदस्यत्व'च्या खाली होती. ती आता तिकडून काढून फक्त 'नवीन लेखन'च्या पानावर दिसते. त्यामुळे 'माझ्यासाठी नवीन'च्या पानावर येण्यासाठी मला 'नवीन लेखन'मध्ये यावंच लागतं Uhoh 'माझ्यासाठी नवीन' (आणि 'विचारपूस'ही) ह्या लिंका पूर्ववत 'माझे सदस्यत्व'खाली आणाव्यात ही विनंती.

बाकी, 'गुलमोहर'मधून कथा, ललित इ वाचते. लेखकाचं नाव माहित असेल, तर त्याच्या पाऊलखुणांमधूनही लेखन शोधता येतं.

इथे जुने लेखन कसे शोधता हे विचारले आहे ना?
मी नवीन लेखन,
माझ्यासाठी नवीन नाहीतर पाऊलखुणा (माझ्या स्वःताच्या) बघते.

'जुनं' कुठंय? कोणतंही 'लेखन कसं शोधता?' - असं आहे असं मला वाटलं Happy

ओके, जुनंच हवं असेल तर मायबोली सर्च बर्‍याचदा काम करतं माझ्यासाठी.

हे माझे निवडक ५ उपाय. Happy

१. मी IE च्या favorites मधे "नविन लेखन" "पार्ले " या दोन लिन्क सेव्ह करून ठेवल्या आहेत. मायबोली वर आल्याआल्या दोन खिडक्या एकत्र उघडल्या की काय सुरू आहे याची साधारण खबर मिळते.

२. जरका एखादे वादग्रस्त लिखाण उडवल्या गेले आहे आणि तरी त्या बद्दल माहिती हवी असेल तर मग संबंधीत व्यक्तिंची विपु वाचल्यावर अपडेट्स मिळतात. Proud

३. अमुक एक विषयावरचे लिखाण शोधायचे असेल तर सर्वात खाली सर्चचे ऑप्शन आहे त्यात तो शब्द (कीवर्ड) लिहून आणि तेथील मायबोली.कॉम सिलेक्ट करून शोधाशोध केल्यास अनेकवेळा हवा तो दुवा मिळतो.

४. जेव्हा मी अनेक ठिकाणी पोस्ट केले असते तेव्हा तेथिल नविन पोस्टचा ट्रॅक ठेवायला माझ्या पाऊलखुणा वर जावे लागते.

५. लेखक कोण ते माहित आहे पण लेखाचे नाव माहित नाही अशा वेळेस त्या व्यक्तिच्या प्रोफाईल मधील पाऊलखुणा मधे जाऊन 'फक्त लेखन' चा टॅब वर टिचकी मारली की त्या लेखकाने उघडलेले सर्व बीबी दिसतात.

नवीन लेखन -> माझ्या साठी नवीन.
"माझ्या साठी नवीन" हा submenu, main menu मध्ये टाकावा ही विनंती. म्हणजे सरळ तिथे टिचकी मारून प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या ग्रुप मध्ये चटकन जाऊ शकेल.

आल्यावर प्रथम नविन लेखन. मुखपृष्ठ फारसे बघत नाही. नविन लेखन मधे पार्ले, वाचू आनंदे, पाककृती आणि संयुक्ताच्या लिंक्स असतील तर तिथे प्रथम जाते.
समजा संयुक्ताच्या पानावर गेले तर मग तिथुन त्या ग्रुपमधल्या सगळ्या धाग्यांवर काही नविन आहे का ते पाहिले जाते. असे सगळ्याच ग्रुप बाबत होते असे नाही पण संयुक्ता आणि पाककृतीबाबत होते.

गुलमोहोर आजकाल शक्यतो वाचत नाही. कधीतरी एखादा फोटो चित्र पाहिले तरच ... लकिली तुक्का लागला तर लागला. पण शक्यतो नाहीच. ललित वगैरे कोणी आवर्जुन सांगितले तर वाचते अन्यथा नाही.

बरेचदा रंगिबेरंगी माझ्यकडून वाचले जात नाही कारण रंगिबेरंगीच्या लिखाणाला 'गप्पांचे पान', 'लेखनाचा धागा' असे काही लिहिलेले नसते.

विपू, पाऊलखुणांमधे शोधणे वगैरे खुप नाहीच. अगदी एखाद्या आयडीचे लेखन आवडले असेल तर जाणे होते. पण विपू हॉपिंग शक्यतो नाहीच.

काही शोधायचे असेल तर खालचे सर्च बॉक्स वापरते ... जुने लेखन शिवाजी फॉन्टमधे असेल तर मात्र सापडत नाही. तो मॅकचा किंवा लिनक्सचा दोष असू शकेल. पण मला बाकीचे मिळून जाते.

मनःस्विनी,
फक्त जुने लेखनच असे नव्हे तर एकंदर मायबोलीवर आल्यावर काय वाचायचंय हे पहाण्यासाठी कुठल्या दुव्यावर जाता असा प्रश्न आहे.

मुख्यपृष्ठ, रंगीबेरंगी आणि नवीन लेखन. साधारण ह्या ३ ठिकाणी पाहिल्यावर बरेचसे मिळून जातेच. विपू, पाऊलखुणा सहसा पाहत नाही.

१. माझ्या पाऊलखुणा (favorite मधेच store केलय) (मी दिलेल्या प्रतिक्रियांवरच्या प्रतिक्रिया बघायला मिळतात)
२. माझ्या गृपमधे नविन (मायबोलीवर नवीन नाही बघत, ती लिस्ट सारखी बदलते, आणि ढिगभर कविताच असतात Happy )
३. गुलमोहर -> ललित
४. गुलमोहर -> विविध कला
५. रंगीबेरंगी

कधितरी मायबोली मुखपृष्ट...

असा खुला प्रष्ण विचारण्यापेक्षा मतदान का नाही घेत, म्हणजे कळेल किती जणं कोणत्या लिंक वापरतात!

मी मायबोलीवरील नवीन लेखन पाहतो. त्यात गुलमोहोर, रंगीबेरंगी आणि मी जॉइन केलेले गृप सगळ्यातलच नवीन लेखन किंवा नवीन आलेले प्रतिसाद दिसतात.
इतर काही पाहण्याची गरज वाटली नाही आजवर तरी.
पण एखाद्या सदस्याचा स्पेसिफिक लेख कथा वाचायची असेल तर त्याच्या पाउलखुणामध्ये जावुन बघण हे जास्त सोप असाव अस वाटतय.

नवीन लेखन मध्ये बघते... जोपर्यंत "शून्य नवीन कमेंटस" वाली पानं येत नाहीत तोपर्यंत.
एकदा शून्य वाली पानं आली की त्यांच्यामागच्या पानांवरच पहायची गरज नाही हे कळत.

मी पार्ले बीबी वर जातो , तीथे इतरत्र काय "निवडक" चाललय त्याचा अंदाज येतो >> Rofl

खाली मायबोली सर्च आहे, तो बर्‍यापैकी चालतो असे वाटते.

पण काय हो अ‍ॅडमिन? तुम्ही उपाय देण्यापेक्षा प्रश्न विचारत आहात? तुम्हाला कुठला बाफ बघायचा आहे का? Proud

१. घाईत असेल तर नवीन लेखन- पहिले पान. जरा कमी घाईत असेल, तर तीनेक, आणि आराम असेल तर पाच वगैरे. त्यापलीकडे नाही. 'कविता' दिसले की धडाधड ओलांडतो. त्या बर्‍याच असतात, त्यामुळे पाने पटकन ओलांडून होतात.
२. 'माझ्यासाठी नवीन' ही लिंक वापरल्याचे आठवत नाही.
३. 'माझे सदस्यत्व' वर साधारण दिवसातून ४-५ वेळा. विपू बघण्यासाठी.
४. हितगुज विषयावरून / माझ्या गावात- या रस्त्यावर फारसे जाणे होत नाही. नवीन लेखन मध्ये दिसते तेवढेच.
५. काही खास कारण असेल तर इतरांच्या विपू आणि पाऊलखुणा.
६. दिवसातून एकदा गुलमोहर.
७. आठवड्यातून एक-दोनदा रंगीबेरंगी.
चांगले लिहिणारे लोक फार कमी लिहितात, त्यामुळे हे. खरे तर गुलमोहर आणि रंगीबेरंगी रोज पुन्हा पुन्हा बघायला लागावे अशी इच्छा आहे.
८. काही शोधायचे असेल, तर 'सर्च'. हे वरती ठेवावे, ही विनंती.

१. नवीन लेखन मधे जाऊन 'माझ्यासाठी नवीन' पहिले आणि दुसरे पान.
२. पार्ले (काय वाचावे), पुण्यातले पुणेकर (काय वाचु नये :फिदी:).
३. कधी काही उल्लेख आला तर अ‍ॅडमिन ह्यांची विपू आणि तिथुन respective लेख.
४. माझ्या स्वत:च्या पाऊलखुणा.
५. रंगिबेरंगी होम पेज. (हे पान तिथेच सापडले :))
६. गुलमोहोर ७२ तासांतले लेखन.
७. मला आलेल्या विपूला उत्तर द्यायच्या निमित्ताने इतरांच्या विपू. मध्यंतरी रैनाला विपू टाकताना मला साजिर्‍याने कथा लिहिलीये कळले. तसेच आशुचा कालचा लेख. कोणाला तरी विपू टाकत होते तर तिथे आशुच्या लेखाचा उल्लेख दिसला. मग शोधुन काढला.

  • आल्यावर प्रथम नविन लेखन > माझ्यासाठी नविन > ग्रुपमध्ये नविन
  • लेखक कोण ते माहित आहे पण लेखाचे नाव माहित नाही अशा वेळेस त्या व्यक्तिच्या प्रोफाईल मधील पाऊलखुणा मधे जाऊन 'फक्त लेखन' चा टॅब वर टिचकी मारली की त्या लेखकाने उघडलेले सर्व बीबी दिसतात.

माबो वर आल्यावर

  • नविन लेखन आणि गृपमधे नविन या दोन लिंक्स बघतो..
  • कट्ट्यावर हजेरी लावून येतो.
  • मुख्यपृष्ठ वरील लिंक्स पहातो
  • कानोकानी त डोकावतो
  • रंगिबेरंगी, हितगुज, गुलमोहर वैगेरे लिंक्स विशेष पहात नाही.. (काही खास ( Proud ) असेल तर आपोआपच त्या नविन लेखन मधे वरती येतातच :फिदी:)

माझ्याकडे सेव्ह केलय ते सर्च पेज आहे, ते उघडुन लॉग इन होतो
मग माझे सदस्यत्व मधे जाऊन माझ्या विपुत (चुकून माकून आलेले) काही नविन सन्देश आहेत का ते बघतो
तिथुन नविन लेखन मधे जातो, इन्टरेस्टिन्ग सबजेक्ट वाटला तर तो बीबी वाचतो
अन्यथा पुढचे दोन चार तास फिरकत नाही
पूर्वी जुन्या मायबोलीवर, "ट्री" व्ह्यू दिसायचा, त्यात त्या त्या बीबी च्या पुढे लेटेस्ट लिहिणार्‍या आयडी दिसायच्या, त्या बघुन मित्रपक्षी व शत्रुपक्षी आयड्यान्ना फॉलो करता यायचे, वेळेस नेमक्या ठिकाणी वेळेवर पोचून कडोनिकडीचा सामना करता यायचा, हल्लीच्या नविन लेखन मधे तसले काही दिसत नाही, मला "उघड" मित्रपक्ष फारसा नसल्याने, व शत्रुपक्षच जास्त असल्याने आता येवढ्या शत्रुपक्षी आयड्यान्च्या सदस्य खात्यात/विपुमधे जाऊन त्यान्च्याकडे "बघुन घेणे" अवघड झालय Wink
असो
येऊन जाऊन मी झक्की, अ‍ॅडमिन वगैरेन्च्या विपु मात्र बघत असतो, न्युजर्सीवर एक चक्कर मारतो! Happy

काही विशिष्ट लेखन/बाफ शोधायचा असेल तर पानाखालचे 'सर्च' वापरतो 'मायबोली' ऑप्शन वापरून. सापडते बरोबर बहुतांशी.

बाकी प्रत्येक वेळेस 'नवीन लेखन' वरून चालू Happy

साधारणपणे नेहमी लेखन करणार्‍यांची नावं मदत-पुस्तिकेत जाऊन शोधायची
आणि त्यांच्या पाऊलखुणा - फक्त लेखन तपासायचं.. बरंच जुनं-नवं मिळतं.

१. नवीन लेखन- तीन पाने, आणि आराम असेल तर पाच वगैरे. त्यापलीकडे नाही.
२. 'माझ्यासाठी नवीन' ही लिंक वापरल्याचे आठवत नाही.
३. 'माझे सदस्यत्व' वर साधारण दिवसातून ४-५ वेळा. विपू बघण्यासाठी.
४. हितगुज विषयावरून / माझ्या गावात- या रस्त्यावर फारसे जाणे होत नाही. नवीन लेखन मध्ये दिसते तेवढेच.
५. दिवसातून एक-दोनदा रंगीबेरंगी. पन हे नवीन लेखन मध्ये दिसतेच. त्त्यामुळे फारस गरजेचे नाही.
६. काही शोधायचे असेल, तर 'सर्च'. हे वरती ठेवावे, ही विनंती.

साजीरा Happy

सर्व प्रथम नवीन लेखन आणि मग माझ्यासाठी नवीन लेखन.
कोणत्या पाककृती शोधायच्या असतील तर जरा त्रासाचं काम होतं खरं पण मी अख्खा आहारशास्त्र गृपच माझ्या आवडत्या दहा त टाकलाय.

Pages