समज गैरसमज

Submitted by नानबा on 30 January, 2010 - 11:55

कधी कधी स्वतःच्याही नकळत आपण मानापमानाच्या कल्पनेत कधी अडकतो ते कळत नाही. आपला अहंकार कधी कारणीभूत होतो, कधी 'अतिपरिचयात अवज्ञा' अशी अवस्था झाल्यानं, कधी आपण समोरच्याला गृहित धरल्यानं, तर कधी आपलं एखाद्या व्यक्तीवरचं अतिव प्रेम ह्याला कारण ठरतं! मग ह्या सगळ्यातून झालेले समज-गैरसमज आणि नात्याचं कोमेजणं!
'दोन गरीब' हा लेख लिहिल्यानं माझ्या फायद्याच्या अनेक गोष्टी झाल्या! एकतर 'बबई' लोकांपर्यंत पोहोचवता आल्या. अनेक ओळखीच्या लोकांनी, जुन्या मित्र मैत्रिणींनी "तुझ्यामुळे बबईची आठवण आली" असं म्हणून बबईंच्या आठवणी सांगितल्या. ह्या व्यतिरिक्त एक एकदम मोठ्ठा फायदा झालाय माझा. काय? माझी हरवलेली एक मैत्रिण ह्या लेखाचा परिणाम म्हणून मला परत मिळालीये!

-----------------------------------
सोनू आणि मी पाचवी पासून एका वर्गात. दिसायला आम्ही दोघी साधारण सारख्या - घारे डोळे, छोटे केस, त्वचेचा रंग - सगळं एकदम मॅचिंग. हळूहळू कन्याशाळेतल्या मधल्या चौकात बसून टवाळक्या करण्यात आमचा दोघिंचाही वेळ छान जायला लागला - ह्या टवाळक्यांबरोबरच उलगडत गेली ती आमची मैत्री. मग, सोनूचं घर शाळेच्या वाटेवर नसल्यानं मी उलटा रस्ता पकडून शाळेत जायला लागले. शाळेबाहेरही आम्ही एकमेकींच्या घरी 'पडिक' रहायला लागलो. वर्गामध्ये टवाळक्या करणे-अखंड बडबड करणे- विमानं करून उडवणे- तास चालू असताना डबा खाणे - ह्या आणि अशा विविध कारणाकरता शिक्षा खाणे (माझ्या आजूबाजूला न बघण्यानं- शिक्षा खाण्यात माझा वाटा सिंहाचा असायचा!)- हे सगळं सगळं नियमित व्हायला लागलं. पण ही मैत्री फक्त 'टवाळक्या' करण्यापूरती राहिली नाही - जास्त खोल झाली. आमच्या सतत एकत्र असण्यानं का सारखं दिसण्यानं माहित नाही, पण शाळेतल्या बर्‍याच मुली आम्हाला बहिणी समजायला लागल्या. मग आम्हीही 'आम्ही मावसबहिणी आहोत' अशा थापा मारायला लागलो.
बघता बघता दहावी झाली आणि मग मात्र आम्ही वेगवेगळ्या ब्रॅचेस ना गेल्यानं आमचे रस्ते जरासे वेगळे झाले. एकदा जवळजवळ दोन आठवडे वगैरे आम्हाला भेटायलाच जमलं नाही - आणि अचानक सोनू कॉलेजमध्येच भेटली! कित्ती आनंद झालेला मला! मग कळलं की कॉलेज सुटल्यानंतर पडिक रहाण्यासारखं एकमेव ठिकाण आहे - ते म्हणजे सोनूची गल्ली. ह्यावेळेस पर्यंत आमच्या 'दोघिंच्याच असणार्‍या' गृपमध्ये वर्षा नावाच्या एका सेम प्रोफाईल (अमर्याद टवाळक्या करण्याची ताकद) मैत्रिणीची पण भर पडली. मग दररोज संध्याकाळी वर्षीच्या कट्ट्यावर बसून गप्पा - वडापाव/रस्त्यावरच्या कुल्फ्या हाणणे - रुद्र शिकायला जाणे - असल्या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या.
बारावीही संपली तशी मी गावाबाहेर पडले. मग फक्त सुट्यात भेटणं! अशाच एका सुट्टीत मला माझ्या आणखीन एका मैत्रीणीबरोबर जात असताना सोनू भेटली. तोपर्यंत (माझ्या माहितीप्रमाणे) त्या दोघींची एकमेकिंशी फक्त तोंडओळख. आत्ता मात्र त्यांच्या आपापसात गप्पा सुरू झाल्या - थोड्याच वेळात मला कळलं की त्यांच्यात जे काही कॉमन होतं - मी त्याचा पार्ट नाहिये. त्यांना जे खूप मॅटर करत ते मला माहितही नाहिये. आत तुटल्यासारखं झालं. खूप वेळ खूप वाईट वाटल्यानंतर मी धिरोदत्तपणे (:D आता हसायला येतंय!) त्याला सामोरं जायचं ठरवलं. मग मी स्वतःला डिटॅच केलं सोनू बद्दलच्या विचारातून. हळूहळू जमलंच ते. मनात कुठेतरी 'व्हॉट इट कुड हॅव बीन'- आणि 'व्हॉट इट इज' ची तुलना व्हायचीच (होतेच). वाईट वाटायचच. पण ,मग कळेकळेपर्यंत मी आणि सोनू ज्या 'हाय्-बाय' गटात गेलो ते परवा बबईच्या लेखानंतरच बाहेर पडलो.
बबईचा लेख वाचल्यानंतर सोनू जीटॉकवर भेटली.. तिला बबईंबद्दलचा लेख वाचून भरून आलेलं - आम्ही दोघीही खूप दिवसांनी 'बबई' ह्या कॉमन प्रतलावर आलो. बबईंच्या आठवणीतून गाडी इतर आठवणींकडे कधी वळली हे आम्हाला कळलंच नाही - आणि मग एकएक करत एकत्र घालवलेले ८ *३६५ दिवस आठवले. (तिलाही ते सगळं आठवतय!) मी वर लिहिलेल्या गोष्टींबद्दल सोनूला कधीच काही बोलले नसते (अहंकार?) - पण somehow सोनूनच विषय काढला. मी वरती एका तिसर्‍या मैत्रिणीचा इन्सिडन्स सांगितला ना, तसाच एक इन्सिडन्स तिनंपण सांगितला. फक्त भूमिका बदलून. मी आश्चर्यचकित! म्हणजे मला जे हिच्याबद्दल वाटायचं तेच तिलाही माझ्या बद्दल वाटायचं! आम्ही विनाकारणच आता 'दुसरीला आपली तेवढी गरज नाही कारण तिला नवीन मैत्रिणी मिळाल्यात' असे समज करून घेतलेले! आणि हिंदी पिक्चरमधल्या गैरसमजामागे जसा मूर्खपणा असतो त्या तोडीचा मूर्ख पणा केलेला!
----------------------------------------------
त्यादिवशी बरेच तास बोलून आम्ही आमचे समज-गैरसमज पडताळून पाहिले. पूर्वी न बोललेल्या खूप गोष्टी कळल्या. जेव्हा एकत्र होतो - तेव्हा आम्हाला एकमेकिंबद्दल काय वाटायचं हे बोलायची गरजच नव्हती पडली कधी. आम्ही एकमेकिंच असणं गृहित धरलेलं. ह्या गृहितकाला तडा गेला तेव्हा 'तडा' खरच गेलाय का - ह्याची आम्ही शहानिशा करून घेतली नाही - कदाचित आमचा अंहकार आडवा आला - किंवा जुन्या हिंदी चित्रपटात नसायचं का की 'सगळे एकमेकांकरता त्याग करताहेत' - मग तो त्याग समोरच्या माणसाला हवाय की नकोय हे फक्त चित्रपट संपताना कळायचं- मग सगळ्ळं सगळ्ळं ठीक व्ह्यायचं.
तशा थाटात आम्ही दोघी 'त्याग (!?)' करून बसलेलो.
असो, आता गैरसमज दूर झाल्यानं आम्ही दोघिही 'फिंगर्स क्रॉस' करून बसलोय की चित्रपटाचा भाग दोन सुरू होईल. अर्थात गेलेल्या काळाची किम्मत देऊनच आम्हाला पुढे जायला लागणारे! 'जस्सच्या तस्सं' कदाचित नाही होणार - पण एक नविन नातं तयार झालेलंही आवडेल आम्हाला!
-------------------------
तुमची अशी कुठली हरवलेली मैत्री, हरवलेलं प्रेम, गैरसमजामुळे दूर गेलेले नातेवाईक नाहियेत ना?
असतील तर माझे अनुभवाचे बोल ऐका - एकदा "आपले गैरसमज खरे आहेत का" हे पडताळून पहा. गैरसमज खरे असतील तरी ते आजच्या कॉन्टेक्स्ट मधे तेवढेच व्हॅल्युएबल आहेत का ह्याची खात्री करून घ्या. विश्वास ठेवा - IT IS WORTH IT!

गुलमोहर: 

तुमची अशी कुठली हरवलेली मैत्री >>>>>आहे ना. एक कुठे गायब झालेय पत्ताच नाही. आणि एक पत्ता माहित असुन हरवलेय Sad एक दोन वेळा प्रयत्न केलेला फोनायचा पण जुजबी चौकशी पलिकडे काय बोलायच दोघींनाही कळेना. एकेकाळी आम्हाला देखील बहिणी आहेत का विचारायचे, म्हातार्‍या झाल्या तरी ह्या अशाच गप्पा मारत रहाणार म्हणायचे Sad आमची एखादी अशी "बबई" शोधायला पाहिजे आता पुन्हा समान पातळीवर यायला

माझीही शाळेमधील अशीच एक जीवश्च कन्ठ्श्च मैत्रिण हरवलीय.
दहावी पर्यन्त असेच एकत्र दन्गा मैत्रि,सुखदुख (?)share केलीत...
पण, दहावीला मी science ला गेले आणि ती art ला.
तेव्हापासुन तीने बोलणेच बन्द केले.मी फोनवरून बोलाय्चा
प्रयत्न केला पण व्यर्थ.आजुनही असे वाटते की खुप गप्पा मारायच्या राहिल्यात.
एका बबैच्या शोधात आहे तो पर्यन्त...

खर आहे छोट्या छोट्या गैरसमजामुळे आपण चांगले मित्र-मैत्रिणी हरवून बसतो. धनश्रीला १०० मोदक्.मीही बबईची वाट पाहतेय.

आता गैरसमज दूर झाल्यानं आम्ही दोघिही 'फिंगर्स क्रॉस' करून बसलोय की चित्रपटाचा भाग दोन सुरू होईल. >>>>> एवढे सिनेमे पाहून तुम्हाला हे आधीच लक्षात आलं नाही का गं , की " अगर सब ठीक नही हुवा तो समझो की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त " Lol

नानबा.. सहीच लिहीलयस..
तुमच्या मैत्रीला भरपूर शुभेच्छा.. Happy
खूप गप्पा मारा.. हसा.. हसवा.. दोघांमधला गेला काळ वजा करून टाका आयुष्यातून.. Happy

नानबा,
तुमची एव्हढी छान मैत्री दुरावल्याचे कारण इतके फालतू होते हे ऐकून कन्याशाळा सुद्धा हळहळली असेल. असो. better late than never.
ते वयच असे असते...

छान लिहिले आहेस. अश्या मैत्रीणी खूप दिवसांनी भेटल्या की खूप छान वाटतं ना? गेले ते दिन गेले... Sad

<<<<गैरसमज खरे असतील तरी ते आजच्या कॉन्टेक्स्ट मधे तेवढेच व्हॅल्युएबल आहेत का ह्याची खात्री करून घ्या. विश्वास ठेवा - IT IS WORTH<<<<<

नानबा... एकदम मस्त.....
लिहित रहा.....

खूप छान लिहिलं आहेस..

मनात कुठेतरी 'व्हॉट इट कुड हॅव बीन'- आणि 'व्हॉट इट इज' ची तुलना व्हायचीच (होतेच). वाईट वाटायचच. >>> अजूनही होतं माझं असं.. दुर्दैवाने बरेच अनुभव आलेत Sad असो. तुझी मैत्रिण परत मिळालेली वाचून बरं वाटलं! आमेन Happy

<<'सगळे एकमेकांकरता त्याग करताहेत' - मग तो त्याग समोरच्या माणसाला हवाय की नकोय हे फक्त चित्रपट संपताना कळायचं...>>
हे इतकं म्हणजे इतकं पटलय की विचारू नकोस...
ए नानबा, पण आयुष्यातले चित्रपट संपले की नॉर्मली आपण चालू पडतो का नाई...
तुझ्यासारखे विरळा, पार्ट २ साठी आपणहून बोटं पिरंगाटुन बसलेले. बाकी बहुतेक सगळे आपल्या त्या चित्रपटातल्या त्या रोलशी "कट्टी" करून मोकळे होतात...
मस्तय!

छान आहे . माझीही एक मैत्रीण आहे, आता दुरावलीये, खूप मिस्स करते तिला, IT IS WORTH IT!
कळतय पण पुन्हा मीच का ? या प्रश्नावर गाडी थाम्बते.

नानबा मस्त्.चंचला मीच का? या प्रश्नावर थांबू नको . हीच संधी समज तीला वाटले तर हा लेख पाठव. तूझी सोनू तुला परत मिळेल.

धन्स रे सगळ्यांना..
चंचला, पूनम, धनश्री, श्रावणी आणि कविता ही लिंक पाठवा तुमच्या मैत्रिणींना... त्यांना क्लू मिळेलच.. गोष्टी सोप्या होतील.

खादाडमावशी, खरय तुमचं! खुळ्याची चावडी झाली आमची!

एवढे सिनेमे पाहून तुम्हाला हे आधीच लक्षात आलं नाही का गं , की " अगर सब ठीक नही हुवा तो समझो की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त " >>> Lol

आमच्या मैत्रीला शुभेच्छा दिलेल्या आणि आमची 'ईष्टोरी' नेटानं वाचून प्रतिक्रिया दिलेल्या सगळ्यांना धन्स! Happy

आणि जे जे शोधात आहेत, त्या सगळ्यांना शुभेच्छा!

Pages