भुकंप

Submitted by पल्ली on 3 March, 2008 - 10:12

कुठे हरवलीय माणुसकी?
का पसरलंय सर्वत्र
मेलेल्या मनांचं स्मशान!
आसवाच्या एका थेंबानंही
वाहून जायची माणसं
आज थारोळं वाळून गेलं तरी
निरव आहेत डोळ्यातली वाळवंट!
कोसळलेली घरं-दबलेली शरिरं
वातावरण सगळं उदास आहे
कळत नाही मझ्या मनाला
माणुस कुठे हरवला आहे?
मातीच्या ढिगाखाली
चिरडल्या गेलेल्या प्रत्येकाला
आशा असेल आयुष्याची.
इतके दिवस सरले अजुन
नाही इथे कुणीच आलंय!
आपल्या बंगल्यांवर
कौलं चढवुन सोन्याची,
भाषा करतात
सहाय्य्-मदत देण्याची.......
मग कुठे जातं हे सारं?
बर्‍याच दिवसांपुर्वी
उध्वस्त झालेलं गाव
आताशा बातम्यामधुनही
तुरळकच दिसतंय...............

गुलमोहर: 

छान आहे भुकंपा नंतरचे वर्णन. खरोखर माणुस कुठे हरवला आहे? शेवटच्या वाक्यातील तुरळच मधला 'क' का खाल्ला? कि तुरळच बरोबर आहे.

किशोरमुंढे,
शुद्धलेखनाच्या खुप चुका झाल्यात हो....तुम्ही सांगितलेली मोट्ठी चुक आहे. तो शब्द तुरळकच असा हवा होता. तुमच्या इतर प्रतिक्रियांबद्दलही धन्यवाद.:-)
दाद, श्यामली आभार.

पल्लवी...... छान चितारलं आहेस विदारक सत्य...!!

आज थारोळं वाळुन गेलं तरी
निरव आहेत डोळ्यातली वाळवंट!
हे खूप आवडलं.....!

"कुठे हरवलिय माणुसकी?
का पसरलंय सर्वत्र
मेलेल्या मनांचं स्मशान!
आसवाच्या एका थेंबानंही
वाहुन जायची माणसं
आज थारोळं वाळुन गेलं तरी
निरव आहेत डोळ्यातली वाळवंट!"

थेट काळजापर्यंत !! छान !!!

........................अज्ञात