Submitted by पल्ली on 3 March, 2008 - 10:01
नको विचारुस आज मला
कशी आहेस राणी?
कालच्या वादळाच्या राजा
सुकल्या नाहीत आठवणी!
निजले आहे स्वप्न माझे
माझ्याच की उशाला
बोलुन काही शब्द
मी तया उठवु कशाला?
थकुन सारे निजले आहे
ओल्या दवांत भिजले आहे
ह्या क्षणी नको अजुन काही
माझे स्वप्नं सजले आहे.......
गुलमोहर:
शेअर करा
राजा-राणी
सुंदर आहे एका राणीचे मनोगत. परंतू फारच कमी फक्त ३ कडवी, आणखी लिहा.
छान
शेवटा काही झेपला नाही.. शेवटच्या दोन ओळी ?
पहिली दोन्ही कडवी छान आहेत... मस्तच..
सुंदर
नव्या आयुष्याची सुरुवात केलीय तेव्हा त्रास देणार्या भुतकाळात डोकवायचे नाहीये --अशा भावना प्रतित होतात------सुंदर
उठव त्या
उठव त्या स्वप्नाना अन बघ पुन्हा
स्वप्ना तुनच जग कसे सुदर ते दिसते
सर्वांचे
सर्वांचे आभार
पल्ली, निजल
पल्ली,
निजलेल्या स्वप्नाला त्याच्या स्वप्नातून जागं न करण्याची कल्पना टॉप. आपल्यालाही नको असतो व्यत्यय अशा वेळी.
..........................अज्ञात
(No subject)