Submitted by पल्ली on 3 March, 2008 - 09:55
मस्तपैकी पाउस कोसळत असावा
तुझा नी माझा संग असावा
आणि एक सांगु....
रेनकोट नेमका विसरलेला असावा!
जीवाला शहारणारा गारवा असावा
हात हाती तुझा ऊबदार असावा
आणि एक सांगु....
सगळीकडे नेमका अंधार असावा!
गरम गरम कॉफीचा मूड असावा
टेस्टी भज्यांचा बेत असावा
आणि एक सांगु....
सगळा वेळ अगदी निवांत असावा!
हिरवाई भिजलेली अन निसर्ग बहरलेला असावा
नाजुकशी देखणी फुलं अन मातीचा गंध असावा
आणि एक सांगु....
थोडासा रोमँटीकपणा जागा असावा!
गुलमोहर:
शेअर करा
पाऊस
अगदि छान. असं सगळं झाल्यावर रोमँटीकपणा आपोआप येणारच. मी खिडकिच्या बाहेर पाहिले पण पाऊस नव्हता नाहितर..
सुंदर आहे कविता.
मस्त, आवडली
पाऊस आणि प्रियतमाचा प्रेमळ सहवास----हवाहवासा प्रत्येकाला