तुझ्याविना

Submitted by VivekTatke on 3 March, 2008 - 05:12

तुझ्याविना जगण्याची माझी आता परीक्षा आहे
जणू माझ्या मनाला तू दिलेली एक शिक्षा आहे //

कल्पनेच्या कुंचल्याने चित्र रंगवायचे म्हटले तरी
आभासाला वास्तवतेची छटा येऊ शकत नाही
आठवणींच्या गर्दीत क्षण वेचावे म्हटले तरी
तुझ्या अस्तित्वाचा मुलायम स्पर्श कधी होऊ शकत नाही //

राधेच्या केसातील गजर्‍याचा वास जरी सत्य आहे
तरी कृष्णाच्या अस्तित्वाविना तो सारा मिथ्य आहे
संवादिनीच्या सुराला सप्तस्वरांची जरी साथ आहे
तरी मंजुळ गळ्याविना त्यांचा साज हा अधुरा आहे //

मनाच्या कप्प्यात तुझ्या रुपाचे सुन्दर अधिष्ठान आहे,
नि कधीही न ढळणारा, न झुकणारा दिपस्तंभ आहे,
शांत,गुढ,अगम्य, अंधारी कोठडीत
तेजस नंदादीप आहे
नि चेहर्‍यासमोर माझ्या
तुझा लाघवी, गोड, निरागस चांद आहे //

विवेक ताटके

गुलमोहर: 

व्वा! व्वा! फारच छान जमली आहे कविता.