निसर्ग आणि मी 

Submitted by अमोल बारई कविमोल on 21 January, 2010 - 00:31

निसर्ग आणि मी 
सोबती लहानपनिचे न्यारे
उमगले नाही नाते अजुनी
जन्मोजन्मिचे सारे.
दवबिंदूंच्या गोटयांशी मी
खेळ खेळीतो कसला,
धुक्यांच्या त्या घाटामधुनी
मार्ग काढितो जरी नसला.
जिकडे पहावे तिकडे दिसतात
डोंगराच्याच माळा,
वाहते ती झुळझुळ नदी
घेऊनी तीरावरती मळा.
इवली इवली पाखरे
त्यांची किलबिलती  ही गाणी,
मधुर जीवांच्या जन्माने
ही पावन झाली धरणी.
निसर्ग आहे माझा नातलग
भावंडाहुनी वेगळा,
निसर्गाचीच सेवा करूनी
आनंद मिळतो सगळा.
कधी रागवितो असा भयंकर
कंप आणितो धरणीला,
वादळ, पाऊस सर्व भयानक
पूर आणतो सोबतीला.
अशा निसर्गाला मी
शत शत वंदन करतो,
तो आहे पाठीशी समजून
अशाच कविता रचीतो.

इति कविमोल

गुलमोहर: