..... आपलं माणूस .....

Submitted by argademami on 1 March, 2008 - 18:43

आपलं माणूस किती दूर असलं
तरी आपल्या अगदी जवळ असतं.....
अगदी साता समुद्रा पलिकडे.....
खरं किती दूर असलं.....
तरी ते खरं नसतं....
आठवणींच्या गदारोळात....
रेखाचित्रांच्या वर्तुळात.....
मनाच्या गाभा-यात....
आपलं माणूस आपल्या जवळंच असतं.....
बागेत फूल फुलत असतं.....
चहुकडे सुगंध दरवळत असतो.....
आपण बागेत फिरत असतो.....
कधी कधी ते फूल नजरेआड होतं.....
तरी दिलेल्या मंद सुवासाने.....
आपल्या फूल निकटच रहातं.....

किती दूर असलं तरी.....
आठवांच्या पसा-यामुळे.....
भेटीसाठी मन सारखं......
उंचच उंच भरारी घेत रहातं.....
खरं तर आपण......
स्वतःलाच वेड्यासारखे फसवत असतो.....
पण या फसण्यामध्येही मन 'आनंदत' असतं.....
कळत नकळत....
दूरच्या या आपल्या माणसाचं मन.....
या खुळ्या मनाला.....
सततच भेटतंच रहातं......
प्रत्येक भेटीवेळी......
पुढच्या भेटीचा दिलासा देत रहातं.....
म्हणून म्हणते.....
आपलं माणूस किती दूर असलं......
तरी आपल्या अगदी जवळ असतं.....
.......तरी आपल्या अगदी जवळ असतं.....
श्रीमती लीला श्याम अरगडे, लोणावळा....

गुलमोहर: 

मामी, खूप आवडली कविता...... कल्पना.....

कविता खुप आवडली , कविता वाचुन घरची आठ्वण खुप येते

दिनेश मुळे