डिटॉक्स.

Submitted by अमा on 20 January, 2010 - 06:33

मामीच्या मेंट्ल स्पा मध्ये आपले हार्दिक स्वागत. हे काही मेन्टल हॉस्पिटल नव्हे तर आपल्या मनासाठी एक
आरामाची, रीचार्ज होण्याची जागा आहे. आजकाल आपल्यापैकी बरेच जण जिमला जातात मग मेहनत करून झाल्यावर कधी कधी ट्रेनर सांगतो आता या वीकांताला तू फुल बॉडी मसाज घे, एक बॉडी रॅप घेऊन बघ स्किन अगदी नव्यासारखी होइल. आवडत असेल ते फेशिअल घे. दोन तीन दिवस डिटॉक्स डायेट कर. ­बघ अगदी नवीन वाटेल तुला. ताजे तवाने वाटेल. मी काल विचार करत होते. हे असेच काहीतरी आपल्या मनासाठी का नको?

जसे आपल्याला भान येते व आपण लहानाचे मोठे होतो. अनेक नाते संबंधांचा भाग होतो. कधी आपण त्यातून काहीतरी मिळवितो तर कधी काही तरी देतो. कधीतरी हिशेब चुकतात व मनाला त्रासच होतो. जसे आपले शरीर कायम आपल्या बरोबरच असते तसेच हे मन देखील आपल्याबरोबरीने सारे सुखदु:ख उपभोगत असते, आघात सोसत असते.

पण एक आहे. रोज स्नान करून शरीर सुन्दरपैकी स्वच्छ, सुवासिक होते. पण मन मात्र कितीतरी जुन्या नात्यांचे संबंधांचे हरवलेल्या मैत्र्यांचे घाव आठवणीस्वरूपात बरोबरच घेउन हिंडते. त्यामुळे ते भारावलेले, जडावलेले असते. अश्या कितीतरी आठवणी असतात ज्यांनी आपल्याला त्रास होतो, कधी रडू ही येते, का मला कोणी समजावून घेतले नाही, माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, आनंदात सहभागी करून घेतले नाही. असा आकांत मनात उसळतो. काही लोक, काही प्रसंग आपल्याला आपसुक रागाने मुठी आवळायला लावतात. कधी तिरस्काराने मन भरून जाते. तर कधी पश्चात्तापाने! या नकारात्मक भावना आपले मानसिक जीवन व्यापून टाकतात व त्यात नवे अनुभव चाखून बघायला, नवे आनंद घ्यायला जागाच शिल्लक ठेवत नाहीत.

कसे कराल आपले मन डिटॉक्स? एखादी दोन तीन दिवसांची सुट्टी बघून ठेवा व हे डिटॉक्स प्लॅन करा.
ही एक पूर्ण वैयक्तिक बाब तसेच मोठ्या माणसाने करण्याची गोष्ट असल्याने मुलांची काळजी आपल्या
पार्टनर वर सोपवा. आपल्या घरीच हे करू शकता पण शक्य असेल तर आपल्या आवडीच्या, जिथे आपल्या पॉझिटिव असोसिएशन्स असतील त्या जागी जा. जसे कोकणातील गाव/ आवड्ता बीच/ ट्रेक/ अगदी मॉल मधील गॅलरी पण चालेल. पण शक्यतो बाहेरचा उपद्रव फार होणार नाही असे ठिकाण निवडावे. थोडी शांतता अपेक्षित आहे.

ज्या वेळी आपल्याला कामाचे फोन वगैरे येणार नाहीत साधारण पणे त्या वेळी एक खोल उडी आपल्याच मनात घ्यायची आहे. लहानपणीचे अपमान, जसे हिसकावून घेतलेला बॉल, खेळातील खोटे पणे, पालकांचे वागणे, शिक्षकांचे ओरडणे, वगैरे पासून सुरुवात करून मग वयात येताना झालेले दु:खी प्रसंग, विरह,
पहिला प्रेमभंग, कदाचित काही वेडेपणे नकळत घड्ले असतील ( दिल चाहता है मधील आकाश आठ्वा)
ते सर्व आठ्वणीत आणा, आता ते काही रेलेवंट आहे का त्याचा विचार शांतपणे, तट्स्थ पणे न इन्व्हॉल्व होता करा. नाहीतर त्या आठ्वणी डिलीट करा. झाली मेमरीत जागा. हीच प्रोसेस पुढे नेत नेत मग नोकरीतील अनुभव, वैयक्तिक नातेसंबंधातील अवघड प्रसंग, तुटी त्रास, अपमान आठ्वत व प्रोसेस करत करत चालु ठेवायची आहे. एखादा कप चहा किन्वा कडक कॉफी घ्या मध्ये. मॅगी टॉमॅटो सूप पण चालेल की. हलके जेवा. व ही अंतर्मनाची सहल चालूच ठेवा. यात जसे आपण जुने चान्गले पण आता न फिट होणारे कपडे, विट्लेल्या साड्या, कॉलर वर गेलेले शर्ट टाकायला बाहेर काढतो तसे तेव्हा ज्या ने आपण खूप दुखविले गेलो होतो त्या घटना, ते शब्द, मनात आणायचे. ती व्यक्ती आता या घडीला, आपल्या भविष्यात किती आवश्यक आहे, की ती नसलीच तरी काहीच फरक पडणार नाही हे मनात पक्के करायचे.
कारण आपला प्रवास पुढे जाण्याचा आहे. ज्यांनी आपल्याला घडविण्यात मोलाची मदत केले पण जे आता जवळ नाहीत किंवा जगातच नाहीत त्यांच्या आनंदी आठ्वणी आपण एका रत्नजडित पेटीत सुरक्षित ठेवणार आहोत व ती सोबत घेऊन पुढे जायचे आहे.

इथेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कधी कधी आपण आसुसून प्रेम केलेले असते, कामात एखाद्या
विषयावर जिवापाड मेहनत केलेली असते ती वाया जाते. आपण दु:खी होतो. पण ती प्रेमाची भावना,
ते ज्ञान आपल्या जवळ असतेच की. त्या व्यक्तीपासून ती निखळ चान्गली भावना ते ज्ञान अलग करून
हलकेच आपल्या त्या पेटीत नीट ठेवायचे आहे. व उरलेली नकारात्म्क भावना मग का ओझे बाळगत फिरायचे? द्या सोडून. झाली बघा मेमरी मोकळी. आता तिथे नवे अनुभव, आनंद नवे ज्ञान येइलच. ते वाट्च बघत आहे. मन हलके झाले ना!

आता या रिकाम्या जागी एक सुन्दर दिवा लावायचा ज्यात सुगंधी तेल आहे व कधी न विझणारी वात आहे. त्याने आपले अंतर्मन उजळून निघेल. सुवासिक होइल. मग एक मोठा श्वास घ्या व आपल्याला महत्त्वाच्या व्यक्तींना( those who really love you for what you are and accept you for your strengths and with your weaknesses) फोन करा, त्यांना तुमच्या नव्या लाइट मनोव्रुत्तीचा लाभ घेउ द्या. कदाचित मुलांना तुम्हाला एखादे चित्र दाखवायचे असेल. पार्टनरला नवे गाणे ऐकून तुम्हाला सांगायचे असेल. नवी सुखे, नवे आनंद तुमच्या मनात येऊ पहात आहेत..... येउ द्या ना त्यांना.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer: I am not a trained therapist and this may not cure entrenched psychological diseases. You need to see a therapist for that.

गुलमोहर: 

खूप छान लिहिलेय मामी तुम्ही:)
मला फ.मु.शिंदेंची एक कविता आठवली मनावरची..
मनाचं मंथन वाटतं तितकं सोपं नसतं.
कितीतरी जहाल उपसावं लागतं
कितीतरी सुखद नाकारावं लागतं
काहिही कितीही कसंही असो
आहे तसं कपाळावर कोरावं लागतं
मनाचं मंथन वाटतं तितकं सोपं नसतं.

मामी चांगला लेख. Happy मानसिक आरोग्य हा आरोग्याचा केन्द्रबिन्दू असतो. अस्वस्थ मनामुळे शारीरिक आजार होतात व सामाजिक स्वास्थ्य बिघडते.

हे खरच शक्य आहे का? सोप आहे का? विस्ताराने समजावल्यास बरे राहील.

आमच्या सारख्या सर्वसामान्यांना पारंपारीक मार्ग जास्त सोपे वाटतात यापेक्षा. बुध्दीजीवी प्राणी हे कदाचीत करु शकतील.

बी चांगली माहीती दिली. Happy मी सुद्धा प्राणायाम व आसने यांनाच प्राधान्य देते.

कुटिजारिश्ट पण डिटॉक्स करतं??? Biggrin
आपण आपल्याला मानवेल एवढीच खाऊ. आणि हौसाताईपण त्यांना मानवेल एवढीच खातील. जास्त खाल्ली आपण सर्वांनी तर शवासन करावं लागेल.

मामे मी कशाला येऊ एवढ्या लांब भेळ खायला. वाड्यावर येतच असते ना तु नेहमी, येताना घेऊन ये माझ्यासाठी.

ak श्लोक सोडुन हे काय चाल्लय भलतच. Biggrin

छान.

ssy मधे हे सगळे खुप सहज पणे करुन घेतात. त्या आधी असे काही करु शकतो हा विचारही मनात आला नव्हता.

पण वर्षातुन एकदा ही प्रकिया आवश्यक आहे, नाही का मामी Happy

ak श्लोक सोडुन हे काय चाल्लय भलतच. >>> अगं हौसे, म्या नॉर्मल हाय गं त्यामुळे मला भेळ पण लागतेच मधून मधून खायला. मधे मधे ड्रेस, साड्या घ्याव्या लागतात, इथे माबोवर मित्रमैत्रिणींबरोबर खिदळावं लागतं Happy

तिचा एक्का.>>>>>>>
मामी हे काय? मला नाही बाई तुमची कॉर्पोरेट लेव्हलची भाषा कळत.

अगं हौसे, म्या नॉर्मल हाय गं >>>
काय गोळीबार करता हो तुम्ही अश्विनीबाई. तुमचा आयडी AK46 करुन घ्या.

साड्या कोणत्या घेता तुम्ही. नाही म्हणजे मी नववारी घेते ना. म्हणुन आपल सहज विचारल. Happy
मला तेवढे श्लोक शिकवा बर का. ते वाचुनच चित्तवृत्ती कशी प्रसन्न झाली बघा. मला म्हणता नाही येत बाई ते वाण्याबामणांच्या बायकांसारख. शीडी पाठवता का मला पोष्टानी.

मामी, अहो विद "ड्यु" रिस्पेक्ट नाचत असतील त्या...

आता ड्यु वर कोटी नका करु बुवा....

हौसे तू एकाच वेळी दोन दोन बोर्डावर कशी नाचतीयेस.>>> सुळावरची पोळी. Lol

दोन अश्विनीच्या कात्रीत सापड्शील गडे.
>>>>>>> कात्र्या, विळे, कोयते या सर्वांच्या पलिकडे गेलीय तुमची आक्का. विचार करा पक्का. Happy
तुम्ही नळावर या पाणि भरायला. मग बघते तुमच्याकडे. Wink

मामी तुम्हाला दिलेली माहेरची गाडी कशी काय चालते? तो भटजी त्याची खटारा कमांडरच दयायची म्हणत होता. ती गाडी जेवढी इंजिनने चालली असेल त्यापेक्षा जास्त किमी ढकलुन चालवलीय त्या भटजीने. असली फडतुस गाडी काय कामाची. त्यामुळे मी साफ नकार दिला त्या कमांडरला. मग किल्लेदाराने एक भलीमोठी लिष्ट बनवली गाड्यांची. अ‍ॅटोमॅटिक, मुन्युअल इ इ. त्यातुनच एक काढली मग 'क्वालिस' खास तुमच्यासाठी. गाडीत मागे तुमचे पप्पीज पण बसतील मजेत.

असुदे अहो ड्यू आहे म्हणून म्हट्ले रिस्पेक्ट.

हौसाक्का लै दिलदार. आपण असा टी पी केला तर याडमिन राव वराड्तील. नजर ठिवून अस्त्यात त्ये.
माहेरची क्वालिस किती भारी Happy
माझी ड्रायविन्गची बोम्ब आहे त्याहून मी तुज्याशेजारी बसून म्याप वाचीन. व तुला चुकीचा रस्ता बरोबर दावीन.
बारा जीटीजी ला जाउ गडे झणकरी.
घेउनी रंपाची टोकरी. जश्या गवळणी जाती मथुरेला.
येती मातबर सरदार, मानकरणी.
घेउनी टोप पदार्थांचे जश्या गवळणी जाती मथुरेला
भेटू बोलू गंमत करू
पाहु नाच मुला मुलींचे जसे गोप सखे कान्हाचे.
------------------------------------------
अक्का डोके डीटॉक्ष नाही पूर्ण रिकामे झाले आहे.

गो मामी, गो! साधी गोष्ट किती छान संगितली आहे तुम्ही. विचारांचं जंजाळ, शेवाळ लागेस्तोवर आपण मनात साचवत बसतो. वेळोवेळी डिटॉक्स करायला हवे खरे तर.

तुमच्या पोष्टी पण मस्त. Happy (म्हणजे याच विषयावर लिहिलेल्या, मागल्या पानावरच्या. वरच्या टीपी पोष्टी नव्हे.)

अग बाई खरच डिटॉक्स झाला माझ्या टाळक्याचा. मामी धन्स गं.!!!!!! Happy

पण मामी एक प्रामाणिक शंका आहे. डिटॉक्स या शब्दाचा शब्दशः अर्थ नाही कळला. Clear.

मामी पॉटाचा डिटाक्श एरंडेल तेलान व्हईल , पर डोस्क्याचा डिटाक्श लय अवघाड काम बघा . तुमी सांगितल्या परमान उपाय करुन बगावा म्हनतो न्हाईच जमल तर हाईच आपली हातभट्टीची पयल्या धारची नवसागर लई जालिम डिटाक्श बगा .

डि टॉक्सिफिकेशन अर्थात टोक्सिन्स म्हनजे विशारी पदार्थ. ते काढोन टाकण्याची प्रक्रिया.
मनातून वाइट आपल्याला दुखविणारे विचार काढून टाकायचे. आज स्पात कोणी गिराक नाही तू ये की
तुला तर फुकटात म्यानिक्युअर करून तुझी नखे आण्खी शार्प करून देइन. rednails.jpg

मामी, अप्रतिम. एकदमच १००% पटलं. कल्पनाच सुंदर आहे. पण जो ती अमलात आणु शकतो तो खरा ग्रेट नाही. Happy

Pages