डिटॉक्स.

Submitted by अमा on 20 January, 2010 - 06:33

मामीच्या मेंट्ल स्पा मध्ये आपले हार्दिक स्वागत. हे काही मेन्टल हॉस्पिटल नव्हे तर आपल्या मनासाठी एक
आरामाची, रीचार्ज होण्याची जागा आहे. आजकाल आपल्यापैकी बरेच जण जिमला जातात मग मेहनत करून झाल्यावर कधी कधी ट्रेनर सांगतो आता या वीकांताला तू फुल बॉडी मसाज घे, एक बॉडी रॅप घेऊन बघ स्किन अगदी नव्यासारखी होइल. आवडत असेल ते फेशिअल घे. दोन तीन दिवस डिटॉक्स डायेट कर. ­बघ अगदी नवीन वाटेल तुला. ताजे तवाने वाटेल. मी काल विचार करत होते. हे असेच काहीतरी आपल्या मनासाठी का नको?

जसे आपल्याला भान येते व आपण लहानाचे मोठे होतो. अनेक नाते संबंधांचा भाग होतो. कधी आपण त्यातून काहीतरी मिळवितो तर कधी काही तरी देतो. कधीतरी हिशेब चुकतात व मनाला त्रासच होतो. जसे आपले शरीर कायम आपल्या बरोबरच असते तसेच हे मन देखील आपल्याबरोबरीने सारे सुखदु:ख उपभोगत असते, आघात सोसत असते.

पण एक आहे. रोज स्नान करून शरीर सुन्दरपैकी स्वच्छ, सुवासिक होते. पण मन मात्र कितीतरी जुन्या नात्यांचे संबंधांचे हरवलेल्या मैत्र्यांचे घाव आठवणीस्वरूपात बरोबरच घेउन हिंडते. त्यामुळे ते भारावलेले, जडावलेले असते. अश्या कितीतरी आठवणी असतात ज्यांनी आपल्याला त्रास होतो, कधी रडू ही येते, का मला कोणी समजावून घेतले नाही, माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, आनंदात सहभागी करून घेतले नाही. असा आकांत मनात उसळतो. काही लोक, काही प्रसंग आपल्याला आपसुक रागाने मुठी आवळायला लावतात. कधी तिरस्काराने मन भरून जाते. तर कधी पश्चात्तापाने! या नकारात्मक भावना आपले मानसिक जीवन व्यापून टाकतात व त्यात नवे अनुभव चाखून बघायला, नवे आनंद घ्यायला जागाच शिल्लक ठेवत नाहीत.

कसे कराल आपले मन डिटॉक्स? एखादी दोन तीन दिवसांची सुट्टी बघून ठेवा व हे डिटॉक्स प्लॅन करा.
ही एक पूर्ण वैयक्तिक बाब तसेच मोठ्या माणसाने करण्याची गोष्ट असल्याने मुलांची काळजी आपल्या
पार्टनर वर सोपवा. आपल्या घरीच हे करू शकता पण शक्य असेल तर आपल्या आवडीच्या, जिथे आपल्या पॉझिटिव असोसिएशन्स असतील त्या जागी जा. जसे कोकणातील गाव/ आवड्ता बीच/ ट्रेक/ अगदी मॉल मधील गॅलरी पण चालेल. पण शक्यतो बाहेरचा उपद्रव फार होणार नाही असे ठिकाण निवडावे. थोडी शांतता अपेक्षित आहे.

ज्या वेळी आपल्याला कामाचे फोन वगैरे येणार नाहीत साधारण पणे त्या वेळी एक खोल उडी आपल्याच मनात घ्यायची आहे. लहानपणीचे अपमान, जसे हिसकावून घेतलेला बॉल, खेळातील खोटे पणे, पालकांचे वागणे, शिक्षकांचे ओरडणे, वगैरे पासून सुरुवात करून मग वयात येताना झालेले दु:खी प्रसंग, विरह,
पहिला प्रेमभंग, कदाचित काही वेडेपणे नकळत घड्ले असतील ( दिल चाहता है मधील आकाश आठ्वा)
ते सर्व आठ्वणीत आणा, आता ते काही रेलेवंट आहे का त्याचा विचार शांतपणे, तट्स्थ पणे न इन्व्हॉल्व होता करा. नाहीतर त्या आठ्वणी डिलीट करा. झाली मेमरीत जागा. हीच प्रोसेस पुढे नेत नेत मग नोकरीतील अनुभव, वैयक्तिक नातेसंबंधातील अवघड प्रसंग, तुटी त्रास, अपमान आठ्वत व प्रोसेस करत करत चालु ठेवायची आहे. एखादा कप चहा किन्वा कडक कॉफी घ्या मध्ये. मॅगी टॉमॅटो सूप पण चालेल की. हलके जेवा. व ही अंतर्मनाची सहल चालूच ठेवा. यात जसे आपण जुने चान्गले पण आता न फिट होणारे कपडे, विट्लेल्या साड्या, कॉलर वर गेलेले शर्ट टाकायला बाहेर काढतो तसे तेव्हा ज्या ने आपण खूप दुखविले गेलो होतो त्या घटना, ते शब्द, मनात आणायचे. ती व्यक्ती आता या घडीला, आपल्या भविष्यात किती आवश्यक आहे, की ती नसलीच तरी काहीच फरक पडणार नाही हे मनात पक्के करायचे.
कारण आपला प्रवास पुढे जाण्याचा आहे. ज्यांनी आपल्याला घडविण्यात मोलाची मदत केले पण जे आता जवळ नाहीत किंवा जगातच नाहीत त्यांच्या आनंदी आठ्वणी आपण एका रत्नजडित पेटीत सुरक्षित ठेवणार आहोत व ती सोबत घेऊन पुढे जायचे आहे.

इथेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कधी कधी आपण आसुसून प्रेम केलेले असते, कामात एखाद्या
विषयावर जिवापाड मेहनत केलेली असते ती वाया जाते. आपण दु:खी होतो. पण ती प्रेमाची भावना,
ते ज्ञान आपल्या जवळ असतेच की. त्या व्यक्तीपासून ती निखळ चान्गली भावना ते ज्ञान अलग करून
हलकेच आपल्या त्या पेटीत नीट ठेवायचे आहे. व उरलेली नकारात्म्क भावना मग का ओझे बाळगत फिरायचे? द्या सोडून. झाली बघा मेमरी मोकळी. आता तिथे नवे अनुभव, आनंद नवे ज्ञान येइलच. ते वाट्च बघत आहे. मन हलके झाले ना!

आता या रिकाम्या जागी एक सुन्दर दिवा लावायचा ज्यात सुगंधी तेल आहे व कधी न विझणारी वात आहे. त्याने आपले अंतर्मन उजळून निघेल. सुवासिक होइल. मग एक मोठा श्वास घ्या व आपल्याला महत्त्वाच्या व्यक्तींना( those who really love you for what you are and accept you for your strengths and with your weaknesses) फोन करा, त्यांना तुमच्या नव्या लाइट मनोव्रुत्तीचा लाभ घेउ द्या. कदाचित मुलांना तुम्हाला एखादे चित्र दाखवायचे असेल. पार्टनरला नवे गाणे ऐकून तुम्हाला सांगायचे असेल. नवी सुखे, नवे आनंद तुमच्या मनात येऊ पहात आहेत..... येउ द्या ना त्यांना.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer: I am not a trained therapist and this may not cure entrenched psychological diseases. You need to see a therapist for that.

गुलमोहर: 

फारच जबरी लिहीले आहे हे..
कधी कधी नकळत होत असते . पण जाणीवपूर्वक बसून डिटॉक्स केल्याने मन काय रिफ्रेश होत असेल..
फार आवडले.. माझ्या १० मध्ये नक्की ! Happy

मामी , छान लिहिलय.
आणखी एक पॉईंट म्हणजे , एखाद्या व्यक्तीकडुन अगदी साधी गोष्ट जरी शिकलो असलो तरी त्याना आठवण ठेवुन अ‍ॅप्रिसिएट करण. ती गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे लक्शात रहाते आपल्या.
आणि समोरच्याला इनकरेजमेंट पण मिळते.

<<यात फरक आहे. अवॉइड करू नका. मग ते आतच राहील<<>>
१००% अ‍ॅग्रीड मामी. दमन, शमन आणि वमन आठवलं. नंतर सविस्तर लिहीनच. पण हे आवडलं म्हंणून लिहील.... Happy

केवळ सतत, प्रयत्नपूर्वक, रामनाम, रामरक्षा, इतर स्तोत्रे यांचा मनातल्या मनात जप चालू ठेवला तर रोजचे व्यवहार करताना, राग, anxiousness इ. कमी होतात. पण हे एका दिवसात, आठवड्यात किंवा वर्षातहि होत नाही. त्याला वर्षे लागतात. पण ते जमते.

त्याचबरोबर गीता, उपनिषद इ. चे वाचन, केवळ भक्ति संगीत, शास्त्रीय संगित ऐकणे हे हि उपयोगी पडते. सत्संग तर फार उत्तम, पण मला त्याचा अनुभव नाही.

अर्थात् हे माझ्या सारख्या ज्याने जगातली खरी खोटी सुखे चाखली आहेत, आता त्यावर वासना नाही, अश्या माणसाला जमते. मग सर्व काळज्या, चिंता राग आपोआप नाहीसे होतात. मायबोलीवर झालेले वादविवाद, टीका मनात क्षणभरहि टिकत नाहीत. फक्त आपण मात्र वारंवार क्षमा मागणे, दिवे देणे इ. करावे लागते, कारण इतरांना योग्य तो अहंकार असतोच. स्वतःचा अहंकार मात्र पाSर पळून जातो. कसला अहंकार? जीवन जगलात, कारण मेला नाहीत. आणखीन काय केले, जे इतर सगळे करत नाहीत, कदाचित् माझ्याहून जास्त चांगले! ?

.

फार छान आणि अतिशय महत्त्वाचा विचार तुम्ही मांडलाय. माझा अनुभव असा आहे की, बासरी/सतार अथवा तत्सम संगीत तसेच नैसर्गिक आवाजाचे (पाउस, समुद्राची गाज, वहाणारा झरा, धबधबा, नदी) संगीत पण खूप उपयोगी ठरू शकते.

झक्की आपली बट्टी ना? धन्यवाद. मला तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या उशीराने का होइना.

राजे>> मी उदबत्त्या विकत नाही. व ह्या लेखातून मला पैसे मिळणार नाहीत.
तुमच्या पोटात दुखत असेल काही कारणाने तर डॉक्टर आहेत की.
आद्ल्या दिवशी पहाटे केलेले चिन्तन काल बंद म्हणून सुट्टी मिळाली म्हणुन इथे लिहीले.
ते आधी कुठे वाचले आहे आपण?

मामी,
मी गमतीत बोललो, तुम्हाला दुखवायचा हेतु नव्हता.
तिथे आता टिंब टाकलाय.

मामी, तुमचा हा लेख मला तरी नाही आवडला. रोज एक तास योगाभ्यास केला तरी शरिर आणि मन दोघे आनंदी राहतात. तुमचे उपाय फार कठिण वाटलेत.

मामी चांगला लेख, कोणत्यातरी मार्गाने डीटॉक्स होण्याची आत्यंतिक गरज आहे यात दुमत नाही. माझ्या मते या लेखाचे 'परस्पेक्टीव्ह' या एका शब्दात सार सांगता येईल.अनेक जुने अपमान,पराभव आता तसे वाटत नाहीत त्यांच्यामुळे वाटणारी बोच नाहीशी होते,आणि नवीन धक्केही जास्त सहजतेने पचवले जातात.
'न अब वो यादों का चढता दरिया,
न फुरकतों की उदास बरखा,
यूं ही जरासी कसक है दिल में,
जो जख्म गहरा था भर गया वो.'

आपल्या पुर्वजांनी इतके चांगले आणि सोपे मार्ग सांगितल्यानंतर मला हे सर्व प्रयत्न व्यर्थ वाटतात. एक नाही हजारो उपाय शोधून पहायचे आणि तरीही जैसे थे वैसे!!!! पुर्वजांचेच मार्ग अचूक आहेत. आधुनिक उपाय फार फॅन्सी वाटतात.

मामी खरच छान कल्पना ! याचा नक्की उपयोग होतो. मलाही अनुभव आहे याचा.
>>>अवॉइड करू नका. मग ते आतच राहील. ते प्रोसेस करून बरे वाइट सेपरेट करून बाहेर काढा. द ओन्ली वे आउट ऑफ अ प्रॉब्लेम इज थ्रु इट. <<< अगदी,अगदी. मानलं मामी तुम्हाला Happy
बी -- कधी कधी अशा आधुनिक उपायांची गरज असते हो. त्यातून पुर्वजांनी सांगितलेले उपाय कधी कधी काही लोकांना काहिसे कर्मकांडासारखे वाटतात अन मग ते काहीच करत नाही , तेव्हा असे नवे उपायही काय हरकत आहेत? शेवटी मनाला मोकळे वाटणे, आनंदी अन फ्रेश वाटणे महत्वाचे नाही का? ( हलके घ्या Happy

आरती, कर्मकांड काहीही नाही त्यात. तुम्ही इतके सर्व आधुनिक उपाय करुन त्यातून तुम्हाला फक्त तात्पुरता फायदा होतो. कधी-कधी होत देखील नाही आणि आपण फार आधुनिक उपाय करतो आहे म्हणून तुम्ही समाधानी असता. तो उपाय करुन झाला की परत नवा उपाय शोधता. इथे वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करुन पाहिल्यानंतर मला त्यांचे प्रयत्न फारच केविलवाणे वाटलेत. शेवटी इतका वेळ, पैसा खर्च करायचा आणि त्यातून कायमस्वरुपी काहीही प्राप्त करायचे नाही. आपल्याच शरिरावर आणि मनावर बरे वाईट प्रयोत करुन पहायचे आणि त्यातून आपला तोटा करुन घ्यायचा. मला तरी हे सर्व प्रयत्न मुर्खपणाची लक्षणे वाटतात. आवडले नसल्यास क्षमस्व पण असे लेख वगैरे वाचून मला रहावत नाही.

मामी एक प्रश्न आहे.मनातले विचार डिलिट कसे करायचे.प्राणायामाने थोडा फरक पडतो.पण असे डिटॉक्स थोडे अवघड वाटतेय .प्लीज मार्गदर्शन कराल का ?

श्रावणी जोशी: एकेक विचार जे खूप दिवसांपासून मनात डाचत असतात. आपल्यालाच दुखवत असतात ते आपण मागे टाकत जातो व आपले इमोशनल बॅगेज तयार होत जाते. कधी तरी वेळ काढून आपणच बघायचे की तो प्रसंग, ती व्यक्ती, ते अपमान आता रेलेवंट आहेत का? नाहीतर मनातून काढून टाकायचे. ते विसरून जायला आपल्या मनाला आपणच उद्युक्त करायचे. हे लगेच नाही होत. ( कॉम्प्युटर फॉर्मॅट केल्यासारखे!) पण हळू हळू आपल्याला ते आतून जाणवते. बरेचदा आपल्याला त्रास् देणारे लोक त्यांच्या मार्गाने गेलेले असतात व आपणच ते दु:ख कवटाळून बसतो. यात तोटा आपलाच ना.

टिवल्या बावल्या: तुमच्या मित्राला एका लॉन्ग टर्म काउन्सेलर ची/ थेरपी ची गर्ज आहे. मॅरिटल काउन्सेलिन्ग ची गरज आहे. त्यांच्या मेडिकल तपासण्या केल्या आहेत का? लो सेल्फ एस्टीम आहे का? त्यांना काउन्सेलर कडे नेलेले बरे. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर डिप्रेशन सुद्धा असेल. त्यासाठी औषधे असतात की. असे प्रशन सोडवीणे याला मला जबाबदार धरू नये. तो माझा प्रांत नाही. डिस्क्लेमर वाचा प्लीज.

ते आधी कुठे वाचले आहे आपण? >>>
=======================
आधी वाचले नव्हते, पण शोध्ल्यावर कळले की हा विषय तसा नवीन नाही.
फक्त मला तरी पहिल्यांदा वेगळा वाटला.
तुमच्या लेखाशी काही अंशी साम्य असलेले हे लेख मला सापडले.
http://kwelos.tripod.com/detoxthemind.htm

मी गुगल गाय आहे,
काही नवीन दिसले की आधी गुगल देवते च्या चरणाशी लोटांगण घालतो. Happy

मामी,
ह्या विषयाचे मायबोलीकरांशी परिचय करून दिले त्याबद्दल आभार.

PS:
पण त्याने दिलेला प्रसाद सुद्धा जसा-च्या-तसा खात नाही. कोणते ही मत एकाएकी ठाम करत नाही. ते व्हायला अनुभवाला प्राथमिकता देतो. लॉजिकली किती ही पटले तरी.

पुर्वजांचेच मार्ग अचूक आहेत. आधुनिक उपाय फार फॅन्सी वाटतात.
>>>> अगदी, बी तुम्ही म्हणतात ते पटतय. पुर्वजांचे कोणते मार्ग म्हणायचे आहेत तुम्हाला? जरा स्पष्ट कराल तर बरे होईल.

हौसा, वर मी उदाहरण दिले आहे. पुन्हा एकदा देतो. आयुर्वेद, योगाभ्यास यांचा अवलंब केला तर त्याचे खूप फायदे होतात. वर अनेकांनी शरिर-मन यावर पोष्ट लिहिले आहे. प्राणायम केल्यानंतर मन सबंध दिवसभर प्रफुल्लीत राहतं. इतरांचा त्रास होत नाही. नैराश्य येत नाही. आसने केल्यामुळे प्राणवायु मुलबक प्रमाणात शरिरात खेळतो. शरिरातील नाड्या कार्यरत राहतात. थकवा, कंटाळा, जडत्व येत नाही. आपण आपल्या शरिराचे वैद्य होतो. मनाचे विकार गळून पडतात. रोज पहाटे सकाळी उठून ३० मिनिटे थोडा विहार केला तरी खूप आहे. तुम्ही इतक्या औषधी घेता. पण साध्या साध्या गोष्टी अमलात आणण्या ऐवजी वर्ज्य करता. जसे की रोज आवळा खाल्ला तर रक्त शुद्ध होत, दात किडत नाहीत, केस बळकट होतात. हे मी फक्त एक दोन उदा. इथे देत आहे. हे उपाय आधुनिक नाहीत. पुर्वजांनी सांगितलेले आहेत. तुम्ही नविन आधुनिक उपाय शोधून काढता येत ठिक आहे पण त्यापुर्वी आपल्या पुर्वजांनी या समस्या कशा सोडवल्या त्याचा कधी विचार्-विनिमय करता? माझ्यामते नाही. तुम्ही पाश्चिमात्य पद्धत जोमानी अमलात आणता. कुणी योगाभ्यास करा म्हंटले तर नाक मुरडता. हल्लीच एका काकूंना मी विचारले रविवार या तुम्ही आसने शिकायला तर त्याच वेळी आमचे टेबल टेनिस असते म्हणून लगेच रद्द केले येणे. असेच काहीसे विचार तुमच्यातही दडलेले आहेत. मी इथे पुर्वजांची सतीची चाल वगैरेचा अवलंब करा असे म्हणणार नाही. मी त्यांनी आपल्याला दिलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल म्हणत आहे. मला देखील पोथ्या वगैरे वाचणे आवडत नाही. रामनाम जप करणेही तेही मला आवडत नाही. पानेच्या पाने देवाची नावे लिहिणे तेही मला आवडत नाही. पण मला मनापासून आसने प्राणायाम आवडतो. जडीबुटीकडे माझी ओढ आहे. अन्न हे ताजेच चांगले फ्रोझन वाईट हे मला माहिती आहे. ही हेच तुम्हालाही सुचवित आहे. वेळे आणि स्थळ यानुसार हे सर्व शक्य होतेच असे नाही. पण शक्य होत असतानाही त्या गोष्टी शिकायच्या नाहीत. अंगी बाणायच्या नाहीत. आपले पाऊल उचलण्यापुर्वीच त्या गोष्टीबद्दल उलटसुलट मत व्यक्त करुन माघार. यावर माझा आक्षेप आहे. मध्यंतरी इथे वजन कमी करण्यावर केवढी चर्चा झाली. आज त्यांना विचारुन पहा की त्यांचे वजन वाढले की घटले. नक्की वाढले असेल!!! फार विनोदी वाटतात मला ते उपाय!!!! जाऊ दे..

अश्विनी , किती सुंदर लिहिलयस गं , खरच , अगदी मनापासून आवडल.. बहोत खूब्..आता वाचलं आणी आत्ताच ट्राय करणारे.. सुपर्ब आयडिया ,मेन्टल स्पा.. वा!!वा!!

धन्यवाद. मी व्यक्तिगत अनुभव टाळून, वय/ राहण्याची जागा/ धर्म किंवा लिन्गभेद टाळून कुणालाही कधीही करता येइल असे काहीतरी डेवलप करायचा प्रयत्न केला आहे. त्यात अजूनही लिहायचे आहे.( धमकी Happy ) एकटे चाचपडत अंधारात हिंडताना हातात घुन्गरू लावलेली काठी इतकेच त्याचे महत्त्व. सपोर्ट सिस्टीम असताना अश्या इन्ट्रोस्पेक्षन ची कमी गरज पडते. पण जसे आपण आर्थिक बाबींचे ऑडिट करतो, शरीराला हेल्थ चेकप करवतो तसे एकदा मनालाही मोकळे करावे ही त्यामागची कल्पना.

Pages