Submitted by अमोल बारई कविमोल on 20 January, 2010 - 02:16        
      
    माझ्या मनामध्ये तू
तुझ्या मनामध्ये मी,
अशी स्थिती असतांना
काय हवयं आणि?
	जेंव्हा कधी बोलतेस
	किती ती गोड वाणी,
	तू अशीच बोलतांना
	काय हवयं आणि?
सुंदर तरी किती
वर्णितो जशी वाघींन ढाणी,
शब्द शब्द पडलेत कमी
काय हवयं आणि? 
	काळेभोर तुझे केस
	जसे घनघोर ढगांतून पाणी,
	त्याच पाण्यात चिंब न्हातो
	काय हवयं आणि? 
तुझे नशीले नयन
जन्म घालतात नाना गाणी,
डोळ्यांच्या खोलीत डुंबतो
काय हवयं आणि?  
	ओठ तुझे गुलाबी
	खूणवितात मला अजुनी,
	गोडीगुलाबी मिळालेली
	काय हवयं आणि? 
क्षितिजावर मिलनोन्मुख होती
जशी अंबर धरणी,
तू अशीच भेट मला....
काय हवयं आणि?  			
इति कविमोल
गुलमोहर: 
शेअर करा
 
 
कविता छान आहे हे वाचा आणि
कविता छान आहे
हे वाचा आणि सोडुन द्या
http://www.maayboli.com/node/13507
मस्तंय रे कविता आवडिया
मस्तंय रे कविता
आवडिया
छान आहे कविता..!!
छान आहे कविता..!!