Submitted by VivekTatke on 1 March, 2008 - 01:05
डोळ्यात कारुण्य,चेहर्यावर कणव
पाय ओढत रस्त्यावर चाललेली ती शेळी
अवघडलेली-- आईपणाने दबलेली
एकाकी-- अशी वैराण वाटेवर चाललेली
पोटासाठी,स्वतःच्या आणि पोटातील गर्भाच्या //
शोषलेली काया नि सम्पलेली माया
जीर्ण कापडात झाकलेली लाज
अशीच एकटी वळणावर भेटलेली
मनाने केव्हाच मेलेली--खुणावत होती
वाटेवरील येणार्या जाणार्यान्ना ईशार्यान्नी
पोटासाठी,स्वतःच्या आणि पोटातील गर्भाच्या //
काल परवाचे ते अल्लड फुलपाखरू
वारा पिऊन जगणार॑, मस्ती करणार॑,
फुलाच गन्ध घेणार॑, तारुण्याची धुन्दी चाखणार॑,
बन्धन्नाना झुगारणार॑, चौखुर उधळणार॑ //
धुन्दीतील चूक नकळत घडलेली एखादी
एवढी का जीवास महाग पडावी
आयुष्याच्या रस्त्यावर वाट चुकावी
अन् सारी दिशा का अन्धारी व्हावी
आईपणाचे दान अशी शिक्षा का ठरावी ??
विवेक ताटके
गुलमोहर:
शेअर करा